R


RTR Expressions

माझ्या सर्व भूतकालीन / वर्तमान कालीन / भविष्यकालीन विद्यार्थ्यांना विनंती वजा सूचना :

इथे ज्या विद्यार्थ्यांचे अनुभव वा अभिव्यक्ती आपण ऐकणार / पाहणार आहात, त्यांनी ते COVID-19 सारख्या परिस्थितीमध्ये शक्य असतील त्या तांत्रिक मदतीने audio किंवा video स्वरुपात record केले आहेत. त्यामुळे ते quality ने परिपूर्ण असतीलच असे नाही. त्यांच्यामध्ये noise, audio आणि video artifacts असू शकतात. तरी पाहणा-याने त्यातल्या भावनांना महत्त्व द्यावे, अडचणींना नाही.

यापुढेही ही परंपरा अशीच चालू राहील. प्रेक्षक विद्यार्थ्यांनी त्यातील भाषा व तांत्रिक अडचणींकडे टीकाकाराच्या चष्म्यातून न पाहता असेच वा याहून उत्कट अनुभव स्वतःला कसे येतील याकडे जास्त लक्ष देऊन प्रोग्रामिंग सुधारण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करावा. बोलणारे खूप झालेत, करणारे कमी.

– डॉ. विजय दत्तात्रय गोखले

समर्थ रामदास म्हणतात “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.”

योगेश भरत जाधव

WinRT 2016, UNIX 2016, RTR 2017, RTR 2018 – as a Group Leader, RTR 2021 – as a Group Leader

आज काय नाही, AstroMediComp कडे

आज काय नाही, AstroMediComp कडे ?

बसायला एक वर्ग आहे,

टाकायला दोन तीन सतरंज्या आहेत,

एक गंजलेली खुर्ची आहे आणि

शिकवायला एक मास्तर आहे

 

आज काय नाही, AstroMediComp कडे ?

एक मोठासा कॅमेरा आहे,

जो टिपतोय सगळ्या

वसुंधरेच्या हालचाली

घडणाऱ्या आणि बिघडणाऱ्याही.

 

तसा एक कॉफी चा मळाही आहे,

जिथं कॉफी बनते आणि बरं का!

एक छोटंसं कॅफे पण आहे,

त्याच कॉफी चा आस्वाद घेण्यासाठी.

 

आज काय नाही, AstroMediComp कडे ?

एक छोटंसं मोरपीस आहे,

साक्षात श्रीकृष्णाच्या मुकुटातलं,

नुकतंच ते निघालंय,

मीरेच्या हाकेला ओ द्यायला

 

कालिदासाने पाठवलेला मेघ,

आमच्याकडे आलाय,

म्हणतोय अजूनही यक्षिणी विरहात आहे,

संदेश अजूनही पोहोचलाच नाही.

 

आज काय नाही, AstroMediComp कडे ?

चक्क! एक अणुबॉम्ब सुद्धा आहे,

आम्ही तो जपून ठेवलाय,

जुन्या पराक्रमांची आठवण म्हणून.

 

शिवाय अणुरेणूत बसलेला प्रभू श्री रामही इथेच आहे,

लाडक्या सीतेसोबत लग्न करायला आला आहे,

चला त्या सोहळ्याला हजेरी लावू या.

आकाशाशी धरणीचं नातं बांधूया…

 

इन्कलाबी भगतसिंग सुद्धा इथे आहे,

फाशीच्या तख्तापर्यंत चालला आहे,

साऱ्या देशाला जागे करतो आहे,

एक दिवा आज सूर्याला वाट दाखवत आहे.

 

fantasy चं तर खूप मोठं जग इथे आहे.

 

साक्षात हॅरी पॉटर चं Hogwards,

तिकडे जाण्याची ट्रेन आणि

त्यांचं खेळाचं मैदान,

सगळीच जादुई दुनिया इथेच आहे

 

आणि एक जंगल आहे,

मानवी मर्त्य जगापासून दूर,

निसर्गाचं स्वतःच गुपित जपणारं

रात्रंदिवस उजळणारं.

 

आणि एक ड्रोन पण आहे,

परग्रहावर जाऊन चाचण्या करण्यासाठी,

त्याचा होकार ही दुसऱ्या जगाची सुरुवात असेल

 

आणि एक स्वप्न आहे,

पाण्यामधल्या जगाचं दर्शन घडवणारं,

त्यातच कुठेतरी शेषशायी विष्णु ,

शांतपणे पहुडला आहे.

 

सगळ्याच छान छान गोष्टी नाहीत बरं इथे!

 

आमच्याच सीमेच्या थोडंसं पार,

एक शहर आहे ‘Paradise City’

उधर सब ‘अच्छे’ लोग रेहते है,

आणि आमच्यामधली दरी आता ,

हळू हळू सांधत चालली आहे

 

इथे काही आतंकवादी आहेत,

सतत दंगली घडवत आहेत,

सर्वसामान्य लोकांच्या जाणीवा,

बोथट करून देत आहे

 

अजून काय नाही आमच्याकडे?

शहराच्या मध्यभागी एक घर आहे,

त्या घरातली एकटी आई सुद्धा

आमच्याकडे आहे, ती मूकपणे पुकारतीये,

तिच्या चिमण्यांना परत फिरण्यासाठी.

 

त्याच शहराच्या दुसऱ्या टोकाला,

राज कपूर च्या आठवणींनी भरलेलं,

धुळ खाणारं RK Studio आहे,

म्हणे त्याला विकायला काढलंय,

आणि स्वर्गातूनही बोली लावली जातेय

 

इतकं सारं वेगवेगळं भरून ठेवलेल्या आमच्या घरात,

शेवटी सारे नवरस एकवटले आहेत,

त्यांच्या असण्यातून किंवा नसण्यातून,

एक शांतता प्रस्थापित झाली आहे,

तिमिरातुन तेजाकडे जाणारी वाटचाल

सुरु झाली आहे.

 

इतकं सगळं असूनही

आज काही नाही, AstroMediComp कडे.

बसायला एक वर्ग आहे,

टाकायला दोन तीन सतरंज्या आहेत,

एक गंजलेली खुर्ची आहे आणि

शिकवायला एक मास्तर आहे

 

 – योगेश

38


ऋषिकेश राजेंद्र काळे

UNIX 2021, RTR 2023
 
नमस्कार,

मला माझ्या ग्रुप leader चा mail आला की ज्या मध्ये माहिती भरायची होती, तर त्या मध्ये एक प्रश्न होता त्याच उत्तर देताना मी थोड मना मध्ये आहे ते व्यक्त झालो , आणि मला ते तुमच्या सोबत शेअर करू वाटले . मला हे परत कधी व्यक्त करता येईल की नाही माहित नाही सामोरा- समोर तर नाहीच म्हणून मी हे तुमच्या सोबत शेअर करू इच्छितो . कारण मी असा काही सरान समोर तर नाही बोलू शकणार मला सरांची भीती वाटती किंवा तो माझ्या देवा(विठ्ठला) बद्दल चा असणारा आदर असेल😅 म्हणून कधी काही बोलू वाटलं विचारू वाटलं you tube chat वर तर हिमत होत नाही . आणि मी हे बाकीच्या सोबत पण शेअर करू शकत नाही . यात लिहताना जर काही चुकलं असेल माझं तर मला माफ करा 

माझ्या आयुष्यात गुरूंचे असणारे महत्व हाच माझा यातून सांगण्याचा उद्देश आहे.
 
 
 
9. Your Motive behind joining RTR batch. (Marathi mdhe chalel) 
 
नमस्कार ,
 
           जर मराठी लिहिताना काही चुकत असेल तर माफी असावी मी मराठी लिहण्याची सवय करत आहे आणि शिकत आहे 
        ह्या प्रश्नाचं उत्तर थोड मोठं आहे पण सोप्पा भाषेत सागायचं झालं तर “knowledge” ( पैसा कमवायचा खरंच उदेश नाहीये 😅 तो आज ना उद्या येईलच जर माझी तेवढी पात्रता असेल तर )
            मी एक Non technical background चा मुलगा आहे. मला IT मधल काहीच माहीत नव्हत जस शेळ्या मेंढ्यांच्या प्रमाणे सगळेच सेमी इंग्रजी मध्ये जातात तसा मी पण गेलो आणि , तसाच 12 वी science ,आणि तसाच mechanical engineering मध्ये . म्हणतात IT मध्ये खूप scope आहे तसा मी पण आलो . या आधी mechanical company मध्ये कामही केलं परिस्तिथी ही काही चांगली नव्हती.
                 वडील एका साध्या कंपनी मध्ये कामाला त्यांना मदत म्हणून माझी पहिली “गुरू” माझी आई ती एका work shop मध्ये काम करत होती . तिला होणाऱ्या जखमा ह्या कुठ तरी खूप त्रास देत होत्या आणि माझ्या आईला पाहून मला प्रेरणा भेटली आणि मी ठरवलं यांना जे सुख नाही भेटलं ते देयच . आणि मी जे mechanical company मध्ये काम करत होतो ते अगदी एका हेल्पर सारख होत मला कामची लाज वाटली नाही कारण मी याच्या पेक्षा ही वेगळी कामे केलीय पण मी त्या कंपनी मध्ये Contract based वर होतो नावाला Engineer होतो . मला या सगळ्या मधून बाहेर येयच होत म्हणून मी ते काम सोडण्याचं ठरवलं आणि काही तरी वेगळं करण्याचं ठरवलं पण काय करायचं कळत नव्हत मग सगळ्यांना सारखं अभ्यास करून IT मध्ये येण्याचं ठरवलं, आणि काही माहीत नव्हत साधा laptop ON आणि OFF करता येत होता . पण ठरवलं होत आपल्याला वेगळं काहीतरी करायचय . मला जे काही शिकता येईल ते शिकायला चालू केलं पण मार्ग सापडत नव्हता . नंतर मला सरांच्या विद्यार्थी शिक्षक म्हणजेच माझे दुसरे “गुरू” पियूष sir यांच्या बदल कळल , आणि खरच माझ पण सरांच्या आयुष्यातला देवदूत सारखच झालं मला अजूनही माहीत नाही मला त्यांच्या (piyush sir च्या) class badal सांगणारा कोण होता (हे बोलण फोन वर झालं होत आणि मित्राच्या मित्रांनी सांगितलं होत) त्यांचा class लावल्यावर सगळ बदललं
               मी चांगला शिक्षक आणि चांगल शिक्षण आणि job च्या नादात 1.50 lac च loan ही काढलं आणि पुण्यातल्या एका institute ला मी हे पैसे वाया घालवले त्याच loan अजूनही फेडत आहे या सगळ्यात माझ्या बायकोचा खूप मोठा वाटा आहे कारण तेव्हा माझे लग्न झाले होते आणि मला जॉब नव्हता तिचा खूप support मला भेटला आणि नंतर या सगळ्यात मला job ही लागला तो पण माझ्याच knowledge वर जे मी पियूष सरान कडून शिकलो त्या मुळे पण त्या जॉब मध्ये पण काहीतरी चुकीचं वाटत होत आणि कंपनी मध्ये पण त्या institute सारखीच फसवेगिरी वाटत होती . पण या सगळ्या मधून शिक्षणाची किंमत कळली.
                  त्या नंतर मला सरान बदल कळलं आणि मी एक दिवस असाच you tube वर movie बघत असताना Unix च open to all चे lecture Live दिसले तर मी पाहायला लागलो , काय आहे बघू तरी अस म्हणून तर पूर्ण lecture झाल्या शिवाय उठलो नाही आणि मला सरांच्या रुपात माझे गुरू भेटले . आणि त्याच वेळी मी class लावायचे ठरवले मला खरच काहीच माहीत नव्हत Operating system काय असती, किंवा काहीच माहीत नव्हत आणि याचा उपयोग मला कंपनी मध्ये कसा होईल यामुळं जॉब लागलं का अस काहीच वाटलं नाही मला एकच गोष्ट दिसली की मला माझे गुरू भेटले यांच्या कडून शिका यच आहे बास आणि मी Unix चा क्लास लावला पण ती batch मला काही कारणं मुळे पुर्ण करायला भेटली नाही आणि मी त्या कंपनी आणि आणि घराच्या जवाबदारी मध्ये अडकलो आणि शिक्षणा कडे परत दुर्लक्ष होऊ लागलं त्या नंतर पुन्हा Unix ची batch आली आणि senier म्हणून बसायचं ठरवलं आणि ह्या वेळेस मी ती चूक केली नाही , मधून class सोडून देण्याची आणि खरच मी ती बॅच जगलो मी Unix जगलो जेव्हा जेव्हा मी lecture repeat करत होतो तेव्हा तेव्हा मला त्या system ची किंमत कळत होती अक्षरशः मी office मध्ये सुधा ते bach शिकताना पाणी येयचं डोळ्यात कसं इतकं भारी बनवलं असेल त्यांनी आणि सर जे शिकवत होते त्याने ते खूप छान कळत होत मला आणि मग सगळ्या गोष्टी clear होयाला लागल्या की कसं असत सगळ , आपण जे काम करतो ते कसं चालत किंवा सगळे गोष्टी clear होयला लागल्या शेवटी मला जड गेलं पण ते मी सारखं सारख अभ्यास करून भरुन काढील. माझ्या नशिबाने RTR 5.0 बॅच ही आली मी लगेच ह्या बॅच ला admission घेण्याचे ठरवले.
       पण आयुष्या मध्ये असलेली आणि भासलेली सगळ्यात महत्वाची कमतरता भरुन काढण्यासाठी लावलेला class ..ती कमी म्हणजे “गुरू” कडून शिकण्याची आणि खर ज्ञान मिळवण्याची . आणि मला माझे गुरू हे सरांच्या रुपात भेटले ते जे काही शिकवतील ते सगळे शिकायचं आणि या आधीही शिकलोय सरां कडून ते संस्कार असो किंवा technical 
        आधीही अस कधीच काहीच शिकलो नाही आगदी शाळेतही नाही हे सगळ मला सराना भेटल्यावर,त्यांच्याकडून शिकल्यावर कळल आणि बरेच चांगले संस्कारही झाले मला असाच सरांचा एक वेड्या विद्यार्थ्या पैकी होयचय हाच माझा RTR class लावण्याचा उदेश आहे.खरच माझं नशीब की मला सर हे गुरू म्हणून भेटले.
 
~ऋषिकेश काळे

37


Vertex Group 2021 – Group Expression

Vertex Group, Batch: RTR 2021 (RTR 4.0) – A Group Expression

*मराठी *
*********************************

नमस्कार वाचक मित्रांनो,

AstroMediComp च्या website वर (https://astromedicomp.org/students-कट्टा) आपण आपला वेगवेगळ्या courses आणि seminars मध्ये शिकण्याचा अनुभव “Expression” स्वरूपात देऊ शकतो.

RTR 4.0 पासून “Group Expression” ही नवीन संकल्पना Sir आणि Madam यांनी सुरु केली, ज्यामध्ये RTR चे विद्यार्थी आपापल्या Group Members आणि Group Leader सोबतचा अनुभव video स्वरूपात मांडू शकतात.

या video मध्ये तुम्हांला RTR4.0 च्या Vertex Group चे expression पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आम्ही सर्व Vertex Group Members आणि आमचा Group Leader कश्या पद्धतीने OpenGL, DirectX शिकलो आणि तो सगळा प्रवास कसा enjoy केला, हे मांडले आहे.

हा video आम्ही एका सार्वजनिक ठिकाणी record केलेला असल्यामुळे, यामध्ये तुम्हांला काही त्रुटी, उणिवा जाणवू शकतील. तरी कृपया त्यांना समजून घेऊन तुम्ही सुध्दा या expression चा आनंद घ्यावा, हि नम्र विनंती!

स्थळ : छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे ४११००४
दिनांक : २६-०३-२०२३

 

*English*
*********************************

Hello Dear Readers,

As you may know, at AstroMediComp (https://astromedicomp.org/students-कट्टा) website, we can give our learning experience of different courses and seminars in the form of an “Expression”.

From RTR 4.0, Sir and Madam introduced a new concept of “Group Expression”, in which RTR students can present their experience with their fellow group members and group leader in video format.

In this video, you will get to see the expression of RTR4.0’s Vertex Group, in which how all Vertex Group Members and Group Leader learnt OpenGL, DirectX and enjoyed the whole journey is presented.

Since we have recorded this video in a public place, you may find some errors and shortcomings in it, but please understand them and enjoy this expression.

Location : Chhatrapati Sambhaji Maharaj Garden, Pune 411004
Date: 26-03-2023

 

36


Matrix Group 2021 – Group Expression

Matrix Group, Batch: RTR 2021 (RTR 4.0) – A Group Expression

•••• मराठी ••••

अस्ट्रोमेडिकॉम्प च्या वेबसाईटवर (astromedicomp.org) “Expressions” म्हणून टॅब आहे. त्यात विद्यार्थी RTR, Class, सर यांच्याबद्दलचे त्यांचे अनुभव वा भावना व्यक्त करतात. अशीच आपणही आपले expression द्यावे ही विचारणा मॅडमनी आमच्या ग्रुप मध्ये (RTR 4.0, Matrix Group) केली असता असे लक्षात आले की ग्रुप मधील प्रत्येकालाच खूप काही आणि भरभरून बोलायचंय. तेव्हाच मॅडमनी असं सुचवलं की आपण प्रत्येकाचं वेगळं expression देण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन हे केलं तर ! आणि तिथूनच “Group Expression” ची संकल्पना पुढे आली व ती आटोपशीर आणि मुद्देसूद होण्याकरिता प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणायचे ठरले. हेच “Group Expression” आज आम्ही सर्वांसाठी घेऊन आलो आहोत..

ता.क. : आमच्या ग्रुप चा एक प्रतिष्ठित सदस्य ‘सागर राठोड’ काही कारणांनी expreasion record करतेवेळी आमच्यासोबत नव्हता, म्हणून त्याचे व्हिडिओ expression शेवटी जोडण्यात आले आहे.

•••• English ••••

We have an “Expressions” tab on AstroMediComp’s website (astromedicomp.org), where students share their experiences and express their feelings regarding the Real-time Rendering (RTR) course, AstroMediComp in general and Gokhale Sir.
Rama Gokhale Madam asked our group (RTR 4.0 Matrix Group) to express our feelings as well, but everyone had so much to say! So Gokhale Madam, being a group member herself, suggested the idea of a “Group Expression”. So, here we are, coming up with AstroMediComp’s very first “RTR Group Expression”, which we have deliberately made in a ‘Question-Answer’ format, so as to cover as many important points and details as we could in a short span of time.

Note : One of our respected group member ‘Sagar Rathod’ couldn’t join us at the time of recording due to some reasons, hence his expression video is recorded separately and added at the end .

 

35


अतुल बलभीमराव फुलसुंदर

RTR 2021

…आणि प्रकाश (स्पॉटलाईट) पडला.

 
 
नमस्कार सर आणि मॅडम,
 
माझ्यासोबत झालेली एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती म्हणून हा ई-मेल लिहीत आहे. 
काही चुकलं असेल तर आणि खूप मोठा ई-मेल लिहिला म्हणून आधीच माफी मागतो सर आणि मॅडम.
 
आपला क्लास चालू होण्या आधी मिथुन मला एक वाक्य बोलला होता “की या क्लासला ज्यांना काहीच येत नाही ते पण लोक येतात, कारण सर एकदम बेसिक पासून शिकवतात आणि तुम्हाला काहीही माहित असायची गरज नाहीये.”
 
मी RTR लावावा का नाही हा विचार चालू होता तेव्हा या क्लास चे काय काय फायदे असू शकतात याची एक यादी मी बनवली होती. त्यात एक मुद्दा मी लिहिला होता, की आजपर्यंत आपण कॉम्पुटर प्रॉपर असं शिकलोच नाहीयोत. जर कोणीतरी शिकवणार असेल आणि आपल्याकडून कोणीतरी करून घेणार असेल तर नक्की फायदा होईल. आजपर्यंतच्या क्लास चा अनुभव तसा चांगला नव्हता कारण तिथे त्यांचा स्पीड ठरलेला असायचा आणि आपल्याला कळलं नाहीतरी आपल्याला एकदम बेसिक पण येत नाही असे वाटायचे आणि त्यामुळे काही विचारायची भीती वाटायची आणि शांत राहायचो.  
 
सर आणि मॅडम, क्लास तर भारी आहेच पण सोबत ग्रुप लीडर आहेत त्यामुळे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला खूप आधार मिळाला आहे. खरंच ग्रुप लीडर तुमचा अंश आहे ते तंतोतंत खरं आहे.  
 
मी आज हे का सांगतोय?
मी PP मध्ये Spotlight इफेक्ट करत होतो, खूप दिवस झटत होतो कारण काही गोष्टी मला कळत नव्हत्या. माझ्या ग्रुप लीडर शी बोलणं चालू होतं, ती म्हणायची तू करत रहा तुला जमेल. कमीजास्ती १५ दिवस प्रयत्न चालू होता पण इफेक्ट येत नव्हता, थोडं टेन्शन यायला लागलं होतं. पास्ट पॅटर्न  रिपीट होईल अशी भीती वाटायला लागली होती. त्याच वेळेस ग्रुप लीडर म्हणाली, अतुल तु प्रोसेस एन्जॉय कर आणि आउटपुट वर लक्ष नको देऊ. तिचं हे वाक्य खूप बळ देऊन गेलं आणि वापस येणारा पास्ट पॅटर्न कुठल्याकुठं पळून गेला. सर तुम्ही म्हणाला होतात मुली ह्या  ग्रुप च्या आई होतात, तो अनुभव परत एकदा काल मला माझ्या ग्रुप लीडर च्या बाबतीत आला. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हाच अनुभव सगळ्यांनाच किंवा कमीत कमी माझ्यासारख्या इतर ग्रुप च्या मेंबर्स ना त्यांच्या ग्रुप लीडर बद्दलही आला असेलच. 
 
हे घडत असताना मला खूप मोठी अनुभूती पण आली आणि माझा स्वतःचा इगो गळून पडला. घडलं असं कि, मला वाटायचं कि आई-वडील असो किंवा नवरा-बायको प्रत्येक वेळेस दोघांचा वाटा हा ५०-५०% असतो. तो कमी जास्त होऊ शकतो हे मानायला मन तयार नव्हतं कारण बऱ्याच वेळेस आपला समाज स्त्रीला श्रेष्ठ ठरवतो पुरुषापेक्षा. माझ्या मनाला हि गोष्ट खटकतं होती त्यामुळे ती मानायला मी माहित असून सुध्दा तयार नव्हतो. पण आज ग्रुप लीडर मुळे जिवंतपणी मला ते टक्के कमी जास्त होऊ शकतात याचा अनुभव घेता आला आणि तो मी मान्य केला. कदाचित इथून पुढे मला आता कोणी कमी किंवा जास्त वाटणार नाही. 
 
माझ्या सारख्या विद्यार्थ्याला सांभाळून घेणारी ग्रुप लीडर खरंच भारी आहे आणि तिचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि तिला तयार करणाऱ्या गुरूबद्दल बोलण्यासाठी तर माझ्याकडे शब्दही नाहीयेत आणि बोलून मला त्यांना बंदिस्त हि करायचं नाहीये.  
 
काल जेव्हा माझा इफेक्ट पूर्ण झाला तेव्हा मनापासून वाटलं की ग्रुप लीडर च्या रूपाने तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्यामुळे नक्कीच माझं पण भलं होईल. अतिशयोक्ती वाटेल सर पण जसा तुम्हाला देवदूत भेटला ना तसंच मला माझ्या ग्रुप लीडरच्या रूपाने तुम्ही देवदूत म्हणून भेटला आहांत असं मनापासून वाटलं. शेवटी एकच गोष्ट सर, ग्रुप लीडर हि कन्सेप्ट खूप छान आहे आणि ती अशीच चालू राहावी हीच इच्छा. माझ्यासारख्या खूप जणांना याची नितांत गरज आहे.  
 
तुमचा आशीर्वाद असाच राहो हीच प्रार्थना!!! 
 
ता. क. – माझी ग्रुप लीडर श्रुती कुलकर्णी (डोमेन ग्रुप) आहे आणि RTR३ ची ती बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट कोणकोणत्या गुणांमुळे झाली असेल त्यातला एक गुण आज मला कळला असं वाटतंय. 
 
अतुल बलभीमराव फुलसुंदर 
दिनांक – १२ नोव्हेंबर २०२२

34


विशाल रंजना जाधव

SDK 2013, UNIX 2013, WinDev 2021 (Online Batch), RTR 2021

दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान्प्रवर्धयन्।

 
 

दशपुत्रसमा कन्या दशपुत्रान्प्रवर्धयन्।

यत्फलं लभते मर्त्यस्तल्लभ्यं कन्ययैकया॥

 

या वेळेस पहिल्यांदा प्रज्ञा कडून शिकायची संधी मिळाली . तसं तिला fundamental seminar मध्ये शिकवताना पाहिलं होतं पण प्रत्यक्ष तिच्याकडून शिकायचा अनुभव हा पहिलाच . 

मी सरांच्या संपर्कात आलो २०१३ मध्ये तेव्हापासून तिला पहातोय. कट्यावर ती  आमचे बरेच प्रश्न हाताळायची. सुरवातीला सरांच्या गोष्टींमधून आम्हाला तिची ओळख झाली. कॉम्पुटर चा mouse गरा गरा फिरवणारी मिठू ते आता मला multi OS सेमिनारला असिस्ट करणारी प्रज्ञा (इति सर ). मला आजून आठवतंय सरांनी तिच्या तयारी बद्दल सांगितलं होतं. रात्रभर ती मॅक OS च्या installation च्या तयारी मध्ये होती. तशी तिची तयारी सरांनी बरीच आधीपासून सुरु केली होती. पण त्या आधीही मॅडम आणि सरांनी तिच्यावरच्या संस्कारांची तयारी सुरु केली होती. आज वयाच्या या वेळीही आम्हाला सगळी नक्षत्र सांगता येणार नाहीत ते ती ५ व्या वर्षी सांगत होती आणि आत्ताही सांगू शकते. इंग्लिश मेडीयम मधून शिकून सुद्धा सगळी उत्तम अशी आणि अवघड अशी मराठी पुस्तक तिला वाचता येतात आणि समजतात हे हेच सांगून जात की तुम्ही तिच्यावर किती कष्ट घेतले आहेत. IMac पाहतानाचा तिचा निरागस आणि भावूक चेहरा मला अजून आठवतोय. त्यावेळी तो कॅमेऱ्यामध्ये capture नाही करता आला हे आत्ता आठवताना बरं झालं नाही केला कारण तो काढलेला फोटो system मध्ये कुठेतरी ठेवला गेला असता आणि कदाचित परत पाहिला ही गेला नसता, पण मनामध्ये मात्र कायमचा print झालाय आणि नेहमी डोळ्यासमोर येतो जेव्हा ती म्हणते पण system ला का त्रास द्यायचा.

आणि प्रज्ञा गोखले …स्त्रीरूपातल सरांचा version 

… आमचं C च एक पर्व संपलं. १७ दिवसांचा प्रवास अगदी सुंदर होता. ज्या हातोटीने तू fundamental च्या वेशीला शिवून तू C च्या Pointer पर्यंत नेलंय आह्माला ते अगदी अतुलनीय होतं. या १७ दिवसांमध्ये अगदी so called experience असणारे आम्ही सुद्धा अगदी मुळापासून हललोय. तू शिकवलेल्या ८०% गोष्टी अगदी आह्माला सुद्धा माहित न्हवत्या. तू शिकवताना रिची असं म्हणतो, त्याने असं लिहिलंय असा रिचीचा एकेरी उल्लेख हेच दाखवतोय कि तू त्या टेकनॉलॉजिचा किती जवळ जाऊन पोहोचली आहेस. आमची तर अजून सुद्धा हिम्मत होत नाही असं बोलायची. तुझ्या शिकवण्यातून एक मात्र जाणवलं आपण सर सांगतात तसं एक क्रिया सतत केल्याचे काय फायदे होतात. तू आम्हाला दिलेले प्रोग्रॅम्स या आधी तू कैक वेळेस केले असशील पण आता देताना सुद्धा तू ते नव्याने आणि त्याच उत्सहाने करतेस आणि आम्ही ते करताना सुद्धा रडतो आणि उगाच हा प्रोग्रॅम जरा असा केला असता तर एक प्रोग्रॅम कमी झाला असता, का दोनदा दोनदा करावा लागतोय म्हणतोय. अशा वेळेस स्वतःला कानफाटात मारून सांगतो कि अरे पावट्या आधी तू का केले नाहीस, आयत्या पिठात काय रेघोट्या मारतोयेस. करून दाखव ना, कोणी अडवला आहे का तुला? जेव्हा माझ्या C च्या सगळ्या assignment झाल्या तेव्हा तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आठवला,

अणुरणीयां थोकडा | तुका आकाशाएवढा ||

गिळुनि सांडिले कळिवर | भव भ्रमाचा आकार ||

सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटी ||

तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता || 

C शिकून मिळालेल्या  ब्रम्हैक्यत्व किंवा जीवन्मुक्तता याचा अत्यानंद . 

तू दिलेले प्रोग्रॅम खरोखरच अप्रतिम आहेत. त्यातल्या फक्त कंमेंट्स जरी नीट वाचल्या तरी परत दुसरं काही वाचायची गरज नाही. मला तू शिकवलेला खास आवडलेला पार्ट म्हणजे Pointer. अगदी तारे जमीन पर झालं. मी कॉलेज मध्ये खरोखर Pointer option म्हणून ठेवला होता. नंतर WINDEV च्या batch नंतर मनाची तयारी करून परत वाचायला घेतला काही समजला पण Pointer to Pointer, व्हॉइड Pointer बाजूलाच ठेवला होता. पण जेव्हा तुझ्याकडून शिकलो तेव्हा कळलं पॉईंटर हा अप्रतिम, अगादि, अतुलनीय, अद्वितीय असा आहे. म्हणजे मला मृत्युंजय मधला एक ओळ आठवली. “ज्याला पॉईंटर कळला तो हलक्या फुलक्या पोग्रॅमिंग language मध्ये कधीच अडकणार नाही आणि आणि ज्याने तो डावलला तो कितीही मोठ्या एक्सपेरियन्स चा असो धुळीत(खास करून मंदी मध्ये) मिळाल्याशिवाय राहणार नाही. या Pointer च्या ३ दिवसांमध्ये तू आम्हा IT च्या रेड्यांकडून अक्षरशः Pointer वदवून घेतला आहे जो कधीच विसरणार नाही.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये म्हणतात कि लहानाच्या पाया पडू नये पण आम्ही ठरलो सरांच्या शिक्षण वारीचे वारकरी तिथे वयाचा काही संबंध नाही. तुमचं ज्ञान किती आहे ते महत्वाचा, म्हणुनच माझा तुला त्रिवार नमस्कार आणि वयाने मोठा आहे म्हणून खूप खूप शुभेच्या.

विशाल रंजना जाधव.

33


मोहित धर्माधिकारी

UNIX 2019, WinDev 2020 (Online Batch), RTR 2021

RTR ची पूर्व तयारी!!!

 

प. पू . सर आणि मॅडम ,

सादर नमस्कार. 🙏

हा ई-मेल लिहावा की नाही या संभ्रमात होतो . परंतु आपणापासून काही लपवून किंवा पडदा ठेवून कुठल्याही कार्याची सुरुवात करू इच्छित नाही .

तसा RTR हा कोर्स मागच्याच batch मध्ये का नाही केला याची सल आहेच , या कोर्स ला ऍडमिशन न घेण्यासाठी माझी २ प्रमुख कारणं (सेल्फ Pity) होती.  

त्यातली मुख्य म्हणजे कि आनंदाश्रमाच्या वातावरणात मी जवळपास १२ वर्षांनी आणि ते पण विदेशात छान चैन करून फक्त ९ ते ५ ऑफिस आणि मग सगळा वेळ फॅमिली  सोबत असा छान संसार सुरु होता.
यूनिक्स ला आल्यानंतर खरं तर माझे ओव्हरऑल schedule हे नॉर्थ साऊथ पोल प्रमाणे बदलले. खरं तर भारतात कंपनीत काम करण्याने चिडचिड  खूप वाढली होती आणि रस्ते आणि ट्रॅफिक ने त्यात आगीत तोल ओतल्या सारखे झाले. तुमचे ६ lecture अटेंड केले आणि जवळपास मनाशी हे पक्कं झालं होतं कि मी काही इथे टिकणार नाही. पण मला माहित नव्हतं कि नियतीच्या मनात काही वेगळे असेल आणि ज्या प्रकारे आनंदाश्रमातील वातावरणानी माझ्यातला भीती आणि चिडचिड घालवून एका खऱ्या आनंदाचा मार्ग दिला कि २-३ दा असं पण हुन गेल असेल कि गुरुवारी पण ऑफिसमधून निघताना अरे मी इकडे कशी गाडी टाकली आज तर क्लास नाही.

क्लास मध्ये RTR बद्दल तुम्ही बोलतांना मला असं आठवतं कि मला झेपेल का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हा माझ्यासाठी एक शाल जोडीतील मार्मिक सत्कार होता. पण त्या दिवशी तुम्ही पुढे बोलतांना त्यात नेहमी प्रमाणे एक धीर आणि प्रेरणा देऊन गेला. ते म्हणजे कि इतकी मोठी झेप घेऊन मी काही आरंभशूरता तर दाखवत नाही ना तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी SDK आणि COM करा आणि मग विचार करा RTR कशाशी खातात ते.

तसंही C आणि C ++ CDAC नंतर पहिल्यांदाच बघणार होतो. त्यात तुम्हाला गंडवून आलेल्या यादी मध्ये पण होतो . बालगुरुस्वामी न वाचता SDK आणि कॉम  चे धाडस केलं आणि जणू काही नियती परत माझ्या मदतीला धावली तुमच्या इतक्या वर्षांच्या शिकवणीच्या कारकीर्दी मध्ये हि पहिली ऑनलाईन batch होणार होती . त्यामुळे मी लॅपटॉप सोबत बसून सर्व assignment करतं गेलो . आता SDK आणि कॉम छान येतं हे म्हणणार नाही, पण मी आता या विषयांना मुळीच घाबरत नाही हे अभिमानाने सांगू शकतो.
Repeater म्हणून करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि मी ज्या चुका केल्या त्याच चुका मी आता छान ओळखू शकतो आणि पहिल्यांदा करताना जे समोर  येईल आणि जस येईल ते तस घ्यायचे आणि repeater म्हणून आलं कि कोडचे  बारकावे अजून छान बघून समजून घ्यायचे .

दुसरे प्रमुख कारण म्हणजे की पर्सनल लेवलवर माझ्यातला होणार अभूतपूर्व बदल, की सकाळी ८;३० ला जो लॅपटॉप उघडला कि तो रात्री १ शिवाय बंद होत नव्हता. कारण मला कसंही करून क्लास कसा नं बुडवता येईल आणि त्या साठी कंपनीत काय काय फिल्डिंग लावावी हे सर्व मोहिनी (बायको ) नीट लक्ष ठेवून होती आणि तुमची त्यात RTR लावण्यासाठी ची अट कि बायकोची परवानगी हा एक चांगला कंट्रोल तिच्या हातात गेला ,आणि मागची RTR batch न जॉईन करण्याचं सल्ला दिला आणि तिला आनंदाश्रमात घेऊन येण्याच्या फांदात मी पडलो नाही.  कारण भारतात आल्यापासून तुला फॅमिली आहे हे तू सपशेल विसरला आहेस आणि जणू काही घर म्हणजे एक हॉटेल आहे असा तुझा वावर आहे असं सर्व काहीस आंतरिक युद्ध सुरु होत. आणि मग माझा पण जो राग होता तो मी यूनिक्स आणि WinSDK मध्ये परत admission घेऊन व्यक्त केला जिथे तिच्या परवानगीची गरज नव्हती.

बघता बघता कोविड ने उग्र रूप धारण केलं आणि तिच्या मनातील विकेंड प्लँनिंग पुरते फसत गेले. repeater म्हणून खूपदा मी क्लास TV वर लावायचो  आणि तिने यूनिक्स ची पहिली ६ lecture अटेंड केली. मग अचानक मला एक दिवस तिनेच येऊन म्हटलं की कर RTR. आणि हो सर हे पण म्हणाले आहेत की घर आणि  ऑफिस सर्व सांभाळून क्लास करायचा आहे आणि कुठल्याही कारणांनी नोकरीतून ब्रेक न घेता करणार असशील तर पुढे जायला हरकत नाही.

अजून २ महत्वाचे मुद्दे म्हणजे मला बंगलोर ला किंवा परदेशात (शॉर्ट टर्म ) जावं लागू शकत अर्थात एकंदर covid परिस्थिती पाहता ट्रॅव्हल हे निदान एक वर्ष तर शक्य नाही असंच स्पष्ट दिसत आहे . पण पुढे काय होणार आहे याचा विचार करून मला आत्ताच आनंद घालवायचा नाही .

सर आणि मॅडम,
एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता तुमचा कोणताही क्लास करण्याची योग्य वेळ म्हणजे जेंव्हा समोर येईल आणि शक्य होईल तितक्या लवकर करून घेणे. घरून परवानगी मिळाली याचाही आनंद सर्वतोपरी आहे. माझ्यासाठी मी ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत कि मी खूप चमत्कार करील कि नाही हे मला माहीत नाही पण तन , मन ओतून जितकं शक्य असणार तितकाच हा प्रवास एन्जॉय करण्याचा यथार्थ प्रयत्न नक्की करेल यात शंका नाही.

मुळात मला तरी तुमच्या कडे क्लास करण्यासाठी असा प्रश्नच पडत नाही कि काय मिळणारं आहे. भारतात आल्यापासून क्लास हे माझ्या आनंदाचं एक कारण आहे आणि तो नाही केला गेला तर हाय कंबख्त तुने पी ही नाहीं असं वाटण्याच दुःख माझ्या वाटेला येऊ नये.

सर आणि मॅडम,
माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे कि या २ वर्षात माझा एक छान फ्लो तयार झाला आहे आणि माझी भूक आणि तहान संपलेली नाही. माझं मन मला असं सांगत आहे कि RTR करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि समजा कुठलाही फ्लो मध्ये ब्रेक झाला तर नंतर सेल्फ Pity मध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढची बदली किंवा प्रवास या गौण कारणांपेक्षा माझ आनंद सर्वतोपरी आहे.

शेवटी तुम्ही गुरु माउली आहात आणि लेकराचं हित कशामध्ये आहे हे तुम्हाला जास्त समजत.
त्यामुळे मला ऍडमिशन मिळेल ही आशा उराशी बाळगतो आहे, तसेच विशाल जाधव, मानसी तन्ना यांच्यासोबत कोण जास्त शिव्या खाणार व  कश्यप च्या एक पाउल पुढे कोण जाणार, आणि काही जणांच्या मेंदूला calculation चे काम  पण मिळावं, १.५ वर्षे गुणिले इतके म्हणजे पेट्रोल आणि क्लासची फिस चे sarcasm याचे पण स्वप्न रंगवतो आहे. 😂 😊😂

🙏🙏🙏

आपलाच एक पावट्या ,
मोहित.

32


Rutvij Kolhapure

WinRT 2017, RTR 2018, UNIX 2019, RTR 2020 – as a Group Leader

 

31


Aparna Patil

RTR 2020, WinDev 2020

 

30


Sanchit Gharat

RTR 2020, WinDev 2020

 

29


Rohit Kulkarni

UNIX 2018, WinRT 2019, RTR 2020

 

28


Ankit Agrawal

RTR 2020

 

27


Pravin Shedage

SDK 2008, UNIX 2008, RTR 2020

 

26


Shruti Tiwarkar

UNIX 2018, WinRT 2019, RTR 2020

 

25


Aniruddha Vanjari

UNIX 2018, WinRT 2019, RTR 2020

 

24


Anand Jawadwar

UNIX 2005, SDK 2006, RTR 2020

 

23


Abhishek Shah

RTR 2020

 

22


Pooja Waghmare

RTR 2020

 

21


Gaurav Ostwal

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

20


Sonali Kale

RTR 2020

 

19


Shreyas Borle

UNIX 2018, WinRT 2019, RTR 2020

 

18


Shruti Kulkarni

RTR 2020

 

17


Ripudaman Singh

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

16


Rahul Borkar

RTR 2020, WinDev 2020, UNIX 2020

 

15


Deep Lalwani

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

14


Gaurav Gunjal

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

13


Pratik Nashikkar

UNIX 2019, RTR 2020

 

12


Sumer Raipurkar

UNIX 2019, RTR 2020

 

11


Kshitij Badkas

UNIX 2019, RTR 2020

 

10


Devendra Ghadge

UNIX 2019, RTR 2020

 

9


Rahul Mankar

UNIX 2016, RTR 2020

 

8


Bhavesh Joshi

UNIX 2019, RTR 2020

 

7


Hrituja Hedau

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

6


Somshekhar Karle

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020

 

5


Taufik Mohammed Amir Sayyed

UNIX 2009, RTR 2020

 

4


Dr. Ambrish Naik

RTR 2020

 

3


Bharat Mazire

UNIX 2017, WinRT 2018, RTR 2018, RTR 2020 – as a Group Leader

 

2


Amit Hailkar

UNIX 2012, RTR 2020

 

1