Generic Expressions

माझ्या सर्व भूतकालीन / वर्तमान कालीन / भविष्यकालीन विद्यार्थ्यांना विनंती वजा सूचना :

इथे ज्या विद्यार्थ्यांचे अनुभव वा अभिव्यक्ती आपण वाचणार आहात, त्यांनी ते माझ्या सांगण्यावरूनच त्यांना वाटण्याऱ्या भावनांच्या ओघामध्ये, “त्यांच्या” भाषेत वर्णन केले आहेत त्यामुळे ते जसे लिहिले गेले तसेच्या तसे येथे छापले आहेत, व यापुढेही ही परंपरा अशीच चालू राहील. वाचक विद्यार्थ्यांनी त्यातील भाषा वा व्याकरणावर टीकाकाराच्या चष्म्यातून न पाहता असेच वा याहून उत्कट अनुभव स्वतःला कसे येतील याकडे जास्त लक्ष देऊन प्रोग्रामिंग / कोडिंग चे व्याकरण सुधारण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करावा. बोलणारे खूप झालेत, करणारे कमी.

– डॉ. विजय दत्तात्रय गोखले

समर्थ रामदास म्हणतात – “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.”

यश राजेश सावळकर

UNIX 2022, RTR 2023

प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम 

शिरसाष्टांग  नमस्कार,
 
माझे नाव यश राजेश सावळकर  आणि मी RTR ५.० कॉम्प्युट ग्रूप चा सदस्य आहे. माझ्याकडुन काहिही चुकीचे लिहिण्यात आले असेल तर माफी असावी. हे लिहिण्याचे कारण म्हणजे, बरेच दिवसांपासून  एक इच्छा होती की आपण एक शिक्षक बनायला हवे म्हणून, मी जानेवारी २०२३ पासुन माझी लहान बहीण जी नुकतीच पुण्यात अभियांत्रिकी करायला आली होती, तिला मी C लँग्वेज आणि फंडामेंटल्स शिकवायला लागलो. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा मी सरांचा फंडामेंटल्स चा सेमिनार केला तेव्हा सरांची शिकवण्याची पद्धत आणि कंटेंट बघून मी अक्षरशः फिदा झालेलो. मी त्याच सेमिनार चा कंटेंट(सीपीयू व्यतिरिक्त) सुद्धा तिला शिकवला जो तिलाही खूप आवडला..
 
यावर्षी गुढी पाडव्‍या ला मी माझ्या एका कॉलेजच्‍या मॅम ला कॉल केला आणि त्यांना म्हणालो की “कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या मूलभूत संकल्पना शिकवण्याची संधी मला मिळू शकते का?” तर त्या म्हणाल्या की आम्ही नक्कीच बोलवू, पण तेव्हा मुलांची एंड सेमिस्टर परीक्षा सुरु होती म्हणून त्या म्हणाल्या की आम्हि तुला पुढच्या सेमिस्टर मध्ये बोलवू. त्यामुळे मी जरा नाराज झालो पण जस मॅडम म्हणतात की “प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणा साठी होते” आता माझा पण त्याच्यावर नितांत विश्वास बसला आहे, शंभर टक्के खरं आहे ते. मी त्यांना या वेळी पुन्हा संपर्क केला तेव्हा त्या हो म्हणाल्या आणि सेशन साठी १४ ऑक्टोबर हा दिवस ठरला. मी सेशन साठी त्यांच्याकडे ४ तासांची वेळ मागितली पण काही कारणांमुळे त्या तितका वेळ मला देऊ शकल्या नाही आणि साहजिकच होतं.  कदाचित त्यांना पण वाटत असेल की ह्याला आज पर्यंत कुठे शिकवण्याचा अनुभव नाही आणि तेही एवढ्या विद्यार्थ्यां समोर!  म्‍हणून, त्यांनी मला कसा बसा दीड तासाचा वेळ दिला.
 
आणि तो दिवस आला “१४ ऑक्टोबर”. त्याच्‍या आधीच्या रात्री एखादं लहान मूल ज्या उत्साहाने दिवाळी किंवा वाढदिवसासाठी नवीन कपडे घेतं अगदी त्याच उत्साहाने मी पण नवीन कपडे आणि एक ऑफिस बॅग घेतली. सकाळी १० वाजता  प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी चे मॉडर्न कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागात पोहचलो. माझ्या कडून तिथल्या मॅडमना पण जास्त काही अपेक्षा नव्हत्या आणि त्यात काहीच चूकीचे ही नाही. मी सेमिनार हॉल मध्ये गेलो त्यांनी माझा सत्कार केला आणि मग मी बोलायला सुरवात केली.त्या क्षणी मी थोडा भावूक झालो कारण मी कॉलेज मध्ये असताना मला याच सेमिनार हॉल मधून बाहेर काढलं होतं आणि आज त्याच सेमिनार हॉल मध्ये उभा राहून मी शिकवणार होतो . अभियांत्रिकी च्या द्वितीय व तृतीय वर्षाचे मिळून अंदाजे ६५-७० विद्यार्थी उपस्थित होते. सत्राच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांना या गोष्टीची हमी दिली की मी तुमच्या ह्या दीड तासाचा कचरा नाही होऊ देणार आणि समजा तुमच्यापैकी एका मुलाने सुद्धा कंटाळुन मोबाईल  बाहेर काढला तर ह्या सत्रा मध्ये मी अनुत्तीर्ण झालो. मी त्यांना संगितलं की मी एक “बॅक बेंचर” होतो आणि जवळजवळ प्रत्येक सेमिस्टर मध्ये माझे काही विषय बॅक (नापास) होते म्हणून काळजी करू नका मला पूर्ण कल्पना आहे की जेव्हा समोरचा बोलत राहतो आणि आपल्याला कंटाळा येत असतो तेव्हा आपण काय करतो.
 
मी सत्राची सुरवात १ byte हे ८ bits का आहेत हे सांगून केली, स्टोरेज डिव्‍हाइसेस मध्‍ये हार्ड डिस्क आणि थोडं फार रॅम बद्दल सांगितल, वेबसाइट स्लो का आहे आणि   बीजीएमआय(pubg) फास्ट का आहे , C मध्ये कॅरॅक्टर १ byte चा आणि जावा मधे तेच कॅरॅक्टर २ byte चा का आहे ते सांगितलं. मी त्यांना म्हणालो की जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मॅडमना मला पुन्हा बोलावण्याची विनंती करा. शेवटी त्यांचा साठी OpenGL FFP मध्ये  एक छोटासा डेमो बनवला होता तो त्यांना दाखवला. दीड तास सगळ्यांच लक्ष फक्त माझ्याकडे होत आणि कोणालाही आपला मोबाईल बघावा अशी इच्छा सुद्धा झाली नाही.
 
सत्र संपल्यावर मला तिथल्या एका मॅडम नी विचारले देखील की “अरे यश! तू एवढं कधी शिकलास?” कॉलेज मध्ये असताना मी त्याच मॅडम चा एक नावडता विद्यार्थी होतो.पण शेवटी, आज मला माझ्या टाळ्या भेटल्याच.
 
बाहेर निघाल्यावार २०-२५ मुलांनी मला गाठलं आणि माझ्याशी बोलायला लागले.  त्यांच्याकडे माझ्यासाठी बरेच प्रश्न होते .त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या. एवढच नाही तर पुढे होऊन त्यांनी मला त्यांच्या कॉलेजच्या टेक्निकल कम्युनिटी मध्ये समाविष्ट होऊन शिकवण्याची विनंती केली.
 
मी ज्‍या मॅडमना सत्रासाठी वेळ देण्याची विनंती केली होती त्यांचे मनापासुन आभार मानले. त्या मला म्हणाल्या की सगळ्यांना सत्र आवडलं आणि ते अजून एका सत्रा साठी आग्रह करत आहेत. मला काही मुलांचे मेसेज पण आले की त्यांना माझ्याकडुन शिकण्याची इच्छा आहे.
 
माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात सुंदर दिवस होता हा.
 
मी सरांना मनापसून धन्यवाद म्हणू इच्छितो कारण सरांमुळेच ही  गोष्ट शक्य झाली . सर जसं म्हणतात की शिकवण्यामुळे खूप आदर आणि कीर्ती भेटते त्याची आज अनुभूती आली. मॅडम आणि प्रज्ञा मॅडम ला पण मनापासून धन्यवाद कारण तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी शिकावता त्यामुळे जो मोठा बदल घडतो ते शब्दात सांगणं शक्यच नाही, ते फक्त अनुभवता येऊ शकतं. आणि last but not the least माझी group leader ऋतु चौगुले हीने पण मला नेहमी शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले म्हणून तिचे पण मन:पूर्वक आभार 🙂. 
 
धन्यवाद … 🙏
 
आपला ऋणी,
 
यश राजेश सावळकर

36


अमित बसवेश्वर हैलकर

UNIX 2012, RTR 2020

Art of Learning by Doing….

‘RTR’  हा शब्द माझ्या आयुष्यात आला १२ एप्रिल २०२० या दिवशी, त्याआधी मला RTR म्हणजे काय तेही माहिती नव्हते, ना मी कधी programming केले होते. तरीही या RTR ने मला म्हणजेच या batch मधील विद्यार्थ्यांना काय दिलं ते बघूयात. RTR चा full form आहे Real Time Rendering, Full form माहिती होण्यापासून या प्रवासाची सुरुवात होते आणि ही सुरुवात आपल्याला एका अद्वितीय अशा विश्वात घेऊन जाते. या प्रवासामध्ये आपण काय शिकतो..? आपण शिकतो Core Graphics Programming. खरंतर Graphics Programming हे by-product आहे. आपण शिकतो ते म्हणजे Programming कसं करायचं, त्यानंतर शिकतो कि चांगलं Programming कसं करायचं, तसंच एखादी गोष्ट एकदाच पूर्णपणे शिकली तर तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्या ठिकाणी शिकणे कसे सोपे जाते यातली गंमत आपण अनुभवतो. Computer च्याच भाषेत सांगायचं झालं तर, Windows मध्ये शिकलेला concept Linux मध्ये कसा असतो तोच Android किंवा macOS कसा असतो. या एकाच कोर्समध्ये आपण शिकतो Windows, Linux, Android, WebGL, macOS, iOS आणि DirectX. या सगळ्या गोष्टींचे मूळ Concepts आपण शिकतो आणि या सगळ्या technologies मध्ये आपण code हि करतो. Graphics हेच या कोर्स चं माध्यम असल्यामुळे इथे आपल्यामध्ये Artistic View develop होण्याच्या दृष्टीने आपल्याला Sketching पण शिकवलं जाते. खरंतर Sketching हा खूप मोठा topic झाला, त्यापेक्षाही साध्या आणि सोप्या अशा गोल काढण्यापासून याची सुरुवात होते, पुढे याच गोलातून आपण smiley वगैरे काढतो  आणि याच basics shapes मधून पुढे OpenGL मध्ये सगळे राडे  केले जातात. Sketching सुरु झालेला प्रवास पुढे अगदी 3D modelling, Lighting Models आणि एकंदरीतच सगळीकडे Artistic दृष्टिकोनातून कसे पहावे इथपर्यंत पोहोचतो. हा view आपल्याला आणखी समजण्यासाठी सर आपल्याला, चित्रपट कसे आणि कोणते पहावे, संगीत कसं ऐकावं, कसं समजून घ्यावं, पुस्तके कोणती आणि कशी वाचायची हेसुद्धा शिकवतात. या सर्व programming शिकण्याच्या process मध्ये आपण पण फक्त programming च करायला शिकतो असं नाही तर केलेल्या program ची प्रत्येक line अन line आपल्याला सरांनी समजून सांगितलेली असते, तसेच एखादी गोष्ट त्याच्या खोलात जाऊन शिकणे म्हणजे काय असते, हा अनुभव आपल्याला या course मध्ये मिळतो.

आपण programming हे Graphics च्या माध्यमातून शिकत असल्यामुळे, आपण केलेले programs पाहणाऱ्यालाही Enjoyable असतात. आपण ‘C’ सारख्या विषयाची सुरुवात त्यातल्या अगदी Variable Declaration सारख्या अतिशय basic step पासून करतो ते थेट अगदी DirectX च्या Geometry Shader पर्यंत आपली सफर घडते.

या क्लासमध्ये आपल्याला आणखीन काय मिळतं.. फक्त प्रचंड नव्हे तर महाप्रचंड knowledge. आपण दीड वर्षात जेवढा code करतो तेवढा एक हाती code क्वचितच कोणत्या कंपनीत होत असेल कारण कंपन्यांमध्ये शक्यतो libraries किंवा wrappers चा वापरत केला जात असल्यामुळे, तिथे तसाही कमीच code लिहावा लागत असेल.

या ज्ञानाव्यतिरिक्त, आपण मिळवतो, टाळ्या आणि स्वनिर्मितीचा आनंद.. कधीकधी तर संपूर्ण program नीट करूनही आपल्यासमोर screen वर येतो तो फक्त अंधार आणि अंधार.. आणि असा अंधार आपल्याला जे काही शिकवतो ना ते म्हणजे खलास असतं. याच अंधारातून आपल्या डोक्यात जो प्रकाश पडतो, तो प्रकाश पुढे कायम आपल्याला सोबत करणार असतो..

या क्लास मध्ये आपण संपूर्ण दीड वर्ष सरांच्या सानिध्यात राहतो, त्यामुळे या संपूर्ण दीड वर्षात आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट मिळते ती म्हणजे Live Motivation. आजकाल Youtube किंवा इतर social media platforms वर Motivate करण्याचा trend आहे, तिथे कोणीही – कोणालाही motivate करत असते, पण ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीच्याही थोडेसे पुढे जाऊन ‘आधी खूप-खूप केले आणि मग सांगितले’ यानुसार वागणाऱ्या सरांकडून दीड वर्ष Motivation मिळत राहणे हि खरोखर अलौकिक – अमूल्य गोष्ट आहे.

या दीड वर्षात आपल्याला सरांकडून मिळतात ‘असंख्य शिव्या’ (माझ्यासारखे काहीजण तर या एकाच कारणासाठी क्लास ला येतात, ज्याचं घोषवाक्य आहे “सरांकडून शिव्या खाणे हा आमचा ‘कर्मसिद्ध’ हक्क आहे”.) पण या शिव्या आपल्याला आयुष्यभरासाठी अमुलाग्र बदलतात.

दिड वर्षात या संपूर्ण क्लासमध्ये आपण एकाच विषयात खोलवर अभ्यास कसा करायचा हे शिकतो. एखाद्या विषयात बुडून जाणं हे कसं असतं याचा अनुभव आपण घेतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ‘शिकणं’ शिकतो. आपण हे वाचलेले अथवा ऐकलेले आहे की ‘माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, त्याने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे’ या ठिकाणी आपण ‘शिकणं शिकतो’ म्हणजेच ‘जगणं शिकतो’.

हे सगळं आपल्याला शिकवण्यासाठी सर त्यांचा घाम आणि रक्त ओतत असतात आणि हे शिकत असताना आपण पण दोन गोष्टी द्यायच्या असतात त्या म्हणजे – श्रद्धा आणि सबुरी

तसं बघितलं तर Real Time Rendering या शब्दापासून सुरू झालेला प्रवास, जेव्हा क्लास संपतो तेव्हा कोणासाठी तो Road to Richness असा झालेला असतो, कोणासाठी तो Road to Receive किंवा Road to Rejuvenate अथवा कोणासाठी तो Road to Rest in peace असाही झालेला असू शकतो.

१२ एप्रिल २०२० ला जेंव्हा हा क्लास सुरु झाला तेंव्हा सरांनी सांगितलं होतं, की OpenGL नावाचा हा एक यज्ञ मी आज सुरु करतो आहे आहे आणि या यज्ञामध्ये तुम्हाला आहूती द्यायची आहे, तुमच्या आळसाची, तुमच्या अज्ञानाची आणि तुमच्या नाकर्तेपणाची.. या दीड वर्ष मध्ये या यज्ञामध्ये ज्यांनी या गोष्टींची आहूती दिली त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला तर काहीजण मात्र स्व:ताच या यज्ञात आहूती म्हणून पडले असावेत…. असो यातला उपहास आपण सोडून देऊ पण दीड वर्षांनंतर जेव्हा हा यज्ञ पार पडतो, तेव्हा जो विद्यार्थी तयार होतो तो चांगला programmer तर झालेला असतोच पण सरांनी दिलेल्या motivation आणि guidance मुळे तो एक चांगला माणूस म्हणूनही घडलेला असतो आणि आजच्या कॉर्पोरेट जगात या विद्यार्थ्याची value काय आणि किती आहे, हे आपल्या विद्यार्थ्यांना job हे ज्या कंपन्यांमध्ये मिळतात ना त्यांची नावे पहिलीत कि ते आपोआप लक्षात येते.त्यातली महत्वाची नावे आहेत Sony, nVidia, AMD, Qualcomm, त्यानंतर Arm, intel, Philipps. या कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी हे Graphics मध्येच काम करतात, एवढेच कशाला nVidia सारख्या core Graphics कंपनीच्या CUDA samples ची GIT Repository आपला RTR 3 चा विद्यार्थी आणि RTR 4 चा Group Leader ऋत्विक चौगुले हा own करतो. हे झालं फक्त job संदर्भात, आपल्या RTR च्या विद्यार्थ्यांच्या ज्या Start Ups कंपन्या आहेत Like Void Star India, Per Pixel, या कंपन्यांशी Sony सारख्या MNCs फक्त Graphics Project साठी Tie-up करताहेत आणि त्यांना मानाने बोलावताहेत. हे घडतंय ते फक्त या सगळ्यांनी RTR ला विद्यार्थी आणि Group Leader म्हणून घेतलेल्या कष्टांमुळे. हि आहे RTR ची ताकद जी आता हळूहळू सगळ्या जगाला समजायला लागली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल जसा या कंपन्यांमध्ये त्यांना मिळणाऱ्या job आणि Tie-ups वरून दिसतो तसाच तो आणखी एका ठिकाणी पण दिसतो, तो बदल पहायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया वरचे About me किंवा तिथे त्यांनी ठेवलेले Status अथवा quotes पहा.. तिथे दिसेल You know nothing, Do one thing at a time and do it Good किंवा Entering into Void. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या कंपन्यांची नावे सुद्धा या बदलाची पावती देत आहेत.

एका वाक्यात सांगायचं झालं तर ‘You know’ म्हणत आलेला विद्यार्थी  ‘I don’t know’ असं म्हणत आता ‘गुरुकुलातील विद्यार्थी’ झालेला असतो. त्याची या technology वर, त्याच्या machine वर ‘नितांत श्रद्धा’ तयार झाली असते. त्याच्यासाठी त्याचं machine म्हणजे सचिन ची Bat झालेली असते, पंडित हरिप्रसादजींना जेवढा आदर त्यांच्या बासरीविषयी वाटतो, तेवढाच आदर त्याला या क्षेत्राविषयी वाटायला लागतो, तर पंडित शिवकुमार शर्मा ज्या नजाकतीने संतूर वाजवतात त्याच नजाकतीने तो programming करायचा प्रयत्न करतो..

आणि माझ्या मते शेवटचा मुद्दा जो VIMP नव्हे तर VVIMP आहे (VVIMP च्या खाली 27 Underlines) आणि तो  म्हणजे,

RTR केलेल्या विद्यार्थ्याला आयुष्यात “वेळेची किंमत” कळालेली असते….

धन्यवाद सर…

 

अमित बसवेश्वर हैलकर

(RTR2020-026)

35


चिन्मय दीक्षित

UNIX 2020 (Online Batch), WinDev 2021 (Online Batch)
 
गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा 
सर आणि मॅडम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम  !! 
 
माझ्या कडे इतकी शब्दसंपदा  नाही की मी तुमच्या करता काही लिहू शकेन, पण माझ्या भावना आणि माझा भाव तुमच्या पर्यंत पोहोचावा म्हणून मी हे धारिष्ट्य करतो आहे, काही चुकले तर माफ करा 🙏🙏
 
गाऊ गुनन कैसे तुम्हरो
गुन नाहि मोमे !! 
गुनीदास गुनदान मांगत है प्रानपिया
तुम गुनसागर हो , गुन समुद्र 
गुनवंत जिया !! 🙏🙏
 
मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्या कडे नशीबाने सरांचं एक युनिक्सच ऑडिओ रेकॉर्डिंग आलं, आपोआप ते ‘सतत क्रिया’ ऐकलं आणि मग युनिक्सला ऍडमिशन घायची ठरवली.
‘Bach’ (बाक) चा तो पहिला दिवस, रात्री 9 चा ऑनलाइन क्लास आणि एक प्रकारची उत्सुकता !!
इतके दिवस ज्यांना मी ऐकत होतो त्यांना *लाइव* ऐकणार,  बघणार होतो !
 
आणि सर समोर आले , एक प्रकारचे चैतन्य अनुभवले !! 
हाच तो गुरूचा सहवास. सर परंपरे बद्दल बोलत होते आणि जाणवलं पूर्वीची गुरुकुल परंपरा होती ती या पेक्षा काय वेगळी असणार?
 
जशी क्लास ची lectures होत होती , तशी प्रत्येक दिवशी  माझ्या भोवतीची आवरणं गळून पडायला सुरुवात झाली. Sword can kill one at a time but words can kill many at a time .. हे वाक्य तर कोरून घ्यावं वाटलं, किती सहज बडबड करतो आपण हे समजलं. 
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ !, 
*you know* चा भोपळा 
आणि *IT* मध्ये  चालत असलेल्या poor practices *copy paste* attitude, समोर कोड चालतोय ना येड्या मग समजून काय करायचय ! 
ह्या सगळ्या गोष्टी मला समजत होत्या, खूप दिवस निद्रा अवस्थेतून बाहेर येत असतानाचा फील येत होता. 
किती सोपं होत होतं सगळंच ,
*जे कराल ते पॅशनने करा* 
*प्रत्येक नि प्रत्येक वाक्य म्हणजे अमृत वचन !!*
 
सांगितीक तालीम घेत असल्यामुळे तिथे तानपुऱ्याला दिलेला मान आपोआपच इथे कॉम्पुटर , माउस , ऑपरेटिंग सिस्टिम वापरताना येऊ लागला, पहिलं धड operating system चा End User तरी बनुया ठरवलं , फुलफॉर्म माहीत केल्यावर शॉर्ट फॉर्म वापरणे हे चालू केलं , आपोआप विकिपीडिया चा बुकमार्क ब्राउझर वर आला ,तिथे जाऊन terminology oriented study करायचं ठरवलं. 
 
सगळ्यात मोठा भ्रम दूर झाला तो म्हणजे *मला हे येतं* 
वास्तविक हे असं कधीच नसतं , चालू आहे शिकतो आहे ही एक unending process की जी infinite loop सारखी चालू राहिली पाहिजे ! 
माझ्याच resume वरती proficient knowledge मध्ये  C/C++ पाहिलं आणि स्वतःचीच लाज वाटली, आणि सरांच्या भाषेत *आपण कुठून आलो…* हे वाक्य आठवलं .
 
हे अनुभवत असताना त्या *कॅन्सर* पासून सर आपली मुक्तता करण्याकरीता आले आहेत हे समजत होते आणि एक positive approach आयुष्यात येऊ लागला. आपल्या पैश्यावर आपलं अश्रू,  स्वेद आणि रक्त असलं पाहिजे, talk is cheap show me the code हा attitude यायला हवा . आपलं नाणं खणखणीत वाजलं पाहिजे हे समजू लागले. 
Technology बद्दलचा आदर वाढत होता, जमिनीवर येत होतो आणि आपल्याला लायकी पेक्षा जास्त मिळत आहे हे समजत होतं.
माझं प्रलोभनांमागे पळणं थांबलं, ह्याची बूम त्याची बूम ची सरांनी केलेली थट्टा यातून जणू त्या हिरव्या दिव्यातून मला सर पाहु शकत आहेत आणि माझ्या मनात चालू असलेलं वाचू शकत आहेत असा फील आला. 
 
सरांची गोष्ट ऐकताना त्यांचा तो प्रवास समजून घेताना आपण किती *किडा मुंगी* आहोत आणि किती लहान सहान गोष्टीना आपण achievement म्हणतो आणि किती छोट्या गोष्टीमुळे आपण negative विचार मनात आणतो हे उमजल.
आज ही जेव्हा मन खिन्न होत तेव्हा *तो* प्रवास मी आठवतो.
 
*अग्निपथ कविता जेव्हा सरांकडून ऐकली , नटसम्राट नाटका मधलं ते स्वगत ऐकलं तेव्हा फक्त निःशब्द आणि भरून येत होतं !*
सर आयुर्वेद, कॉम्प्युटर, ज्योतिष आणि संस्कृत मधले श्लोक हे सगळं relate करून विषय शिकवत होते आणि Knowledge is interrelated म्हणजे काय, ह्याचा उलगडा मला होत होता. त्यांचं ते अवघडाला सोपं करून समजावणं आणि माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्यांला जोवर समजत नाही तोवर तितक्याच पोटतिडकीने समजावणं ,
हे सगळं आम्हाला किती सहज मिळत होतं🙏🙏
Fundamental शिकत असताना आपण BE आहोत आणि उन्नती अधोगती करून पास झालो ह्याची जाणीव झाली.
खर सांगतो त्यादिवशी  “पुरश्या फुकट हो” हे चितळे मास्तरांच वाक्य आठवलं .
 
प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य ऐकत असताना आपण किती खुजे आहोत आणि हा सगळा डोलारा कधी उन्मळून पडेल याचा नेम नाही. सर म्हणतात *इट्स नेव्हर टू लेट* तेच एक आधार देत होतं आणि अभ्यास चालू करायचा ठरवलं, 
मी पुढे किती प्रगती करू शकेन हे माहीत नाही पण इतकं नक्कीच की सरांनी दिलेली शिकवण आणि त्यांनीच दिलेला मार्ग हे मला इष्ट स्थळी पोहोचवेल हा दृढ विश्वास मात्र नक्कीच आहे. सगळं सोडून अभ्यास करावा हा प्रश्न खूप दिवस त्रास देत होता पण एका lecture ला सरांनीच उत्तर दिलं,
पाण्याचा  प्रवाह खूप जोरात येत असताना त्याला तोंड न देता हळू हळू diagonally  पार करायचं आणि योग्य ठिकाण येईपर्यंत तो प्रयास अव्याहत सुरू ठेवायचा ! 
किती सोपं केलंत सर तुम्ही !! 
आपल्या वर असलेल्या जबाबदारीची जाणीवही करून दिलीत आणि त्यातून बाहेर कसं पडता येईल याचा मार्गही दाखवलात.
 
बाहेर गाता यावं म्हणून गुरुंच नाव लावायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते, आज सरांच नाव बाहेर सांगता यावं त्या करता भरपूर रियाज करावा लागणार हे मात्र नक्की , ते करत रहाणार , tie mentality तो सगळा भंपकपणा, काय चूक आणि काय बरोबर हे ओळखण्याची दृष्टी 
हे सगळं सगळं तुम्हीच दिलत सर 🙏
गाण्या आधी भरपूर ऐकलं पाहिजे हे म्हणजे ऍडव्हान्स करण्या आधी बेसिक कर लेका , कॉपी पेस्ट, आतपाव फुल्लस्टॅक ह्या सगळ्या मधून योग्य ते निवडण्याची दृष्टी तुम्ही दिलीत.
खरच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज madam आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात.
 
कर्नल मोड मध्ये मला  हात धरुन बॅटरीच्या प्रकाशात योग्य ठिकाणी घेऊन जाणार ह्यावर निर्धास्त पणे जगणारा …………………………….
…तुमचा किडा मुंगी विद्यार्थी !
 
 
गुरुकृपा ही केवलम् 
 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌
 
 
– चिन्मय दीक्षित

34


अनुप पंडित

UNIX 2020 (Online Batch)

सर तुम्ही online आल्यामुळेच शक्य झालं….

 

आदरणीय सर साष्टांग नमस्कार,

मी Feb-DAC2010 sunbeam ला होतो. त्या व्यतिरिक्त पुण्यात कधीही राहिलो नाही. पण तेव्हापासून तुमची batch attend करायची इच्छा होती. ती केवळ तुम्ही online आल्यामुळेच शक्य झाली.
 
गमतीची गोष्ट म्हणजे class सुरू होण्यापूर्वी घरात चर्चा सुरू होती, मि म्हणालो “sunbeam मध्ये रांगायला शिकलो… तो अजुनही रांगतोच आहे… म्हणुन क्लास करायचा म्हणजे सर हात धरून चालायला शिकवतील”. पण जसजसा class पुढे जात गेला तेव्हा कळायला लागले की रांगण तर दूरच पण सध्या कड पलटायला सुध्दा जमत नाही आणि होता होता योगेश्वर सरांच्या class नंतर कळले की अरे… आपला तर जन्म सुध्दा व्हायचा आहे… मग इतके दिवस जे झाले त्याला काय म्हणायचे…???   तर “गर्भ संस्कार”.
 
खरंच सर खुप काही शिकायला मिळालं. तुमच्याकडे बघुन “निष्काम कर्मयोग” काय असेल ते बघायला मिळते.
 
तुमचा शिक्षणासाठी शिक्षण हा आग्रह. यावरून श्री गोंदलेकर महाराजांच वाक्य आठवत की ” मी इथे नामाचा बाजार मांडला पण सगळे हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक… कोणी खरा केसर कस्तुरीचा चाहता मिळाला तर मी त्याच सोन करील”. त्याप्रमाणे तुम्हीपण सांगता की पैसा मिळवण्यासाठी तर सगळेच शिकतात पण शिक्षणासाठी शिक्षण घेणारा विरळाच…. खर आहे सर तुम्ही सांगितलेल्या Cancer च्या defination मधला मी सुद्धा एक आहे.पण शिक्षणासाठी शिक्षण ही काय मजा आहे याचा अनुभव घेण्याची इच्छा आहे आणि ती तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेरणेनेच शक्य होईल.
 
Online शिकवताना तुम्हाला त्रास झाला असेल सर…पण माझ्यासारख्यासाठी ही एक संधीच होती…. संधी आहे.
 
व्यक्त होण्यासारखं खूप काही आहे सर….
 
पण पुन्हा एकदा तुम्ही online आल्याबद्दल खुप खुप धन्यवाद….!!!!
 
तुमचाच,
एक टिंब टिंब
UNIX2020-501

33


सचिन प्रविण पाटील 

UNIX 2020 (Online Batch)
 
Note by Team AstroMediComp: This is the First Expression Ever which is also available in the “Audio” form. Kindly listen to its audio to understand the feelings of the writer in his own voice.
 
Listen to the Audio Version Here:

 
 

UNIX

|| श्री ||

नमस्कार सर ,

           तसं तर UNIX चा क्लास अजून पूर्ण झालेला नाही. पण राहावतच नाही, म्हणून लिहितो आहे. क्लास सुरु होताना हि कल्पना होतीच, कि हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळणार आहे. पण चार chapters  संपेपर्यंतच जो थक्क करणारा अनुभव आला, त्याने व्यक्त होण्यास भाग पाडलं.

          सर! UNIX सिस्टिम च्या माध्यमातून तुम्ही आमची Belief सिस्टिमच हादरवून टाकलीत. एव्हडे दिवस माळ्यावरच्या बॉक्स मध्ये धूळ खात पडलेलं Bach चे पुस्तक, मला एखाद्या अद्वैत ज्ञानाने भरलेल्या ग्रंथासारखे दिसू लागले. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन, तुम्ही आयुष्याचा अर्थही समजावत आहात; हे उमगू लागले. UNIX शिकण्यासाठी जी फीस आहे, ती तर कमी आहेच.. पण UNIX शिकवता शिकवता तुम्ही जे आयुष्य शिकवताय, त्याची किंम्मत कुबेराचे नऊ च्या नऊ खजिने ओतले तरी करता येणार नाही.

          UNIX शिकताना असं कधी वाटलंच नाही, की आपण एखादा अवघड व तांत्रिक विषय शिकत आहोत. प्रत्येक लेक्चर  म्हणजे एखाद्या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेण्याचा एक अनुभव होता. आणि ही कलाकृती सर्वांचा विचार करून बांधलेली होती. जस की एका lecture ला file व process बद्दल सांगताना, तुम्ही जशी सांख्य तत्वज्ञान, प्रकृती-पुरुष अशी आध्यात्मिक उदाहरणे दिलीत. त्याचवेळी पंखा व वीज यांसारखी घरगुती उदाहरणेही हटकून दिलीत. 

          प्रत्येक थरातील विद्यार्थ्याला मनात ठेवून तुम्ही शिकवत होतात.. आणि आमच्या मनात आलेले, अथवा पुढे येऊ शकणारे असे सर्व प्रश्न, तुम्ही स्वतःच निर्माण करून त्यांचं निराकरण करू लागलात. विद्यार्थ्यांचा एव्हडा विचार करणारे शिक्षक; आणि त्यात कहर म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे विद्यार्थी काय विचार करतील हा हि विचार करून शिकवणारे शिक्षक… हे सगळं स्वप्नवत होतं.

         UNIX शिकताना जे घडत गेलं त्याचा कधी विचार केला नव्हता.. अद्भुत !!

           ” ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असू द्यावे समाधान |” या संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ ‘getblk’ नावाचा अल्गोरिथम शिकताना कळला. त्यावेळी ‘अंगावर काटा येणे’ हा शब्दप्रयोग हि कमी वाटला मला. अष्टसात्विक भाव वगैरे जागं होण्यासारखं काहीतरी होतं ते. आणि मग असे अनुभव, ही नेहमीचीच गोष्ट होऊन गेले.  

          ‘User Mode’ व ‘Kernel Mode’ शिकवताना तुम्ही जी वातावरण निर्मिती केलीत… ‘थेटर मधला तो अंधार’,  ‘बॅटरी घेऊन उभा असणारा वाटाड्या’,  आणि त्यात तुमचं ते नटसम्राट मधील स्वगत… “अनिकेत ईश्वराला मिळालं घर!”… खरंच शब्द नाहीत सर…”त्यावेळी तुम्ही नक्की कोण होतात?”… इतक्या प्रभावीपणे कलाकृती बांधणारे दिग्दर्शक?… ती तितक्याच आर्तपणे मांडणारे अभिनेते?… त्यातला गहन अर्थ पोटतिडकीने समजावणारे शिक्षक?.. तुम्ही त्यावेळी या सगळ्यांच्या पलीकडे होतात!!.. तुम्ही त्यावेळी देव होतात!!!.. नव्हे नव्हे तर त्याहूनही श्रेष्ठ…गुरु!!!!

          गुरुगीतेतही श्री शंकराने देवाहून श्रेष्ठ अधिकार गुरूंना दिला आहे.त्यामुळे तुम्ही UNIX सिस्टिम व Bach ग्रंथाला तुमच्याहून श्रेष्ठ मानत असलात, तरी आमच्यासाठी त्याहून कित्येक पटीने श्रेष्ठ तुम्ही आहात. कारण तुम्ही नसतात तर हा दैवी विषय आम्हाला कधीच समजला नसता. दासबोधात समर्थ रामदास म्हणतात…

सद्वस्तु दाखवी सद्गुरू | सकळ सारासार विचारू | परब्रम्हाचा निर्धारू | अंतरी बाणे ||

फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तु दाखवी निजसार | तोचि गुरु माहेर | अनाथांचे ||

         UNIX सिस्टिम हि सद्वस्तु, अगदी त्यातले बारकावे उलगडून तुम्ही अशी समजवायला घेतलीत की परब्रम्ह (Kernel) चा न्याय.. त्याचं प्रयोजन हे अंतरी बिंबवलं गेलं.. आणि यासाठी तुम्हाला जे शब्दांचे अंतर फोडावे लागले ( Reading between the lines in Bach ) ते आम्हाला आयुष्यात कधी उलगडले नसते. 

         UNIX बद्दल सांगावं तेव्हड कमीच आहे..त्यामुळे आता आयुष्याबद्दल तुम्ही जे शिकवलत, त्या बद्दल थोडसं सांगतो. अगदी पहिल्या दिवशी, तुमची गोष्ट सुरु झाली तेव्हापासुनच हे बहुमोल शिक्षण सुरु झालं. तुम्ही ‘connecting the dots by looking backward’ बद्दल सांगितलत सर, व तुम्ही सांगितलेले concepts मनन करत, असेच dots connect करत गेलो… आणि आयुष्यातील अनेक न सुटलेली गणिते, या सूत्रांनी सुटत गेली. तुम्ही अगदी सहजपणे म्हणुन गेलेली वाक्ये, तुकाराम महाराजांनी वाटलेल्या परिसांसारखी अमूल्य होती.. घरी जाऊन, लोखंडावर घासुन पाहिल्यावरच त्यांची किंम्मत कळेल अशी! यातली आत्ता आठवणारी दोन उदाहरणे सांगतो.

          ‘अधिक कष्ट, अधिक पैसा’ हे प्रमाण तुम्ही सांगितलत.. आणि ‘प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ दिला पाहिजे,no shortcuts’ हे तत्व तुम्ही शिकवलत. आवड म्हणुन गेली पाच-सहा वर्षे ज्योतिष शास्त्राचे अध्ययन करताना, कुठल्याच पुस्तकात किंवा व्हिडीओ मध्ये मला ‘शनी’ ग्रहाबद्दल जे कळू शकलं नाही; ते मला या एका वाक्यावर मनन करताना कळलं.

          आणि बरोबर याच्या उलट.. तुम्ही कॅन्सर ची व्याख्या सांगितलीत.. आणि खूप हादरलो!.. पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं!!.. कारण ह्याच मार्गावरून नकळतपणे, थोडा का होइना.. पण चालू लागलो होतो. आणि मग यातून.. ज्योतिष शास्त्रातील ‘राहू’ ग्रह व कॅन्सर च relation अधिक उलगडत गेलं. राहुला pressure cooker चा कारक का मानतात ते कळलं. ‘कमी कष्ट, कमी वेळ..आणि जास्त शिजवणे’.. आणि मग समुद्रमंथना नंतरची राहूची गोष्ट अशी कळली कि आधी कधीच कळली नव्हती..अमृत वाटपाची गोष्ट..!!

          ..खूप कष्ट करुन, Proper behavior आणि discipline सांभाळून, आयुष्यभर राहिलेल्या deserving लोकांना जे अमृत वाटलं जाणार होतं; ते राहूला कमी कष्टात, काहीही follow न करता shortcut ने हवं होतं. पण तो, ते पचवू शकला नाही…कॅन्सर!! अशा सर्व लिंक लागत गेल्या. आणि ‘अमृत सेविताच पावला | मृत्य राहो |’ या समर्थ रामदासांच्या ओवीचा, पहिल्यांदा उलगडा झाला.

          ही फक्त दोनच उदाहरणे सांगितली..ती योगायोगाने ज्योतिषा संबंधीत होती. पण सर, आणखी बऱ्याच क्षेत्रात अनेक गोष्टी उमगत गेल्या. आयुष्यात आपण नक्की कुठे चुकलो.. काय चुकलो.. आणि आता काय केलं पाहिजे याची clarity आली. तुमची ‘Terminology oriented study’ , ‘concentration व consistency चा मिलाफ’ ही व अशी आणखी सूत्रे आज पर्यंत कधीच कोणी समजावल्या नाहीत अशा  अत्यावश्यक basic techniques  समजावून गेली.

          आणि ‘Knowledge is interrelated’ हा तर त्यावरचा कळसच!! बलराज सहानी, अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स.. कुसुमाग्रज, पु.ल. यांसारखे साहित्यिक.. गदिमा, साहिर यांची गीते.. मॅट्रिक्स, इक्विलिब्रियम इत्यादी चित्रपट.. आणि आणखीन बरंच काही.. असं प्रत्येक जण मग UNIX शिकवू लागलं.. प्रोग्रामिंग करणं म्हणजेच ‘ढाचे से कहानी बनाना’.. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ म्हणजेच ‘Talk is cheap, show me your code’. असं सगळं एकमेकात गुंफलेलं ज्ञान समजून घेण्याची पात्रता निर्माण झाली.

          वाल्या कोळ्याला.. महर्षी नारद भेटले! पण.. आमची अवस्था आणखीन वाईट!! आम्ही वाल्या आहोत हेच माहिती नव्हतं. मी तर..वाल्मिकी ऋषी हि सोडा.. रामच समजत होतो स्वतःला.. तुमच्या भाषेत सांगायचं तर कॅन्सर..व पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर ‘लखू रिसबूड’ कडे वाटचाल सुरु होती. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ऐकलं आणि वाटू लागलं.. खरंच आम्ही अभागी!!..आयुष्यातली खुप वर्षे फुकट गेली.. तुमच्यासारखं शिकवणारं कोणी आधी का भेटलं नाही!.. पार तिशीत आलो आणि तुम्ही भेटलात..

          आणि अगदी परवा.. तुमची गोष्ट अचानक स्ट्राईक झाली.. तुम्हीही असेच तिशीत.. आणि काळाकुट्ट अंधार.. तुम्ही चाचपडत उभे असताना.. Mr. Kernel बॅटरी घेऊन आले आणि ‘Dennis Ritchie’ च C Programming च पुस्तक तुमच्या हातात सुपूर्द करून, अवघी दोन वाक्ये बोलुन निघुन गेले…

          तुमच्या वाट्याला Kernel फक्त पाचच मिनिटे आले.. आमच्या साठी मात्र दर सोमवार,मंगळवार, बुधवार कित्येक तास तुम्ही बॅटरी घेऊन उभे असता.. ‘म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत’…असं लिहून व्यक्त होणं थांबवायचं.. असं कुठेतरी मनात होतं..पण ‘भाग्यवान’ असं लिहिणं अचानक नकोसं वाटू लागलं..मन तयारच होत नव्हतं.. अजूनही तयार नाही आहे!!! इतक्या दिवसांच्या तुमच्या गुरुकुल संस्कारांमुळे, बहुतेक त्याला.. इतक्या वर्षांच्या सवयीप्रमाणे, भाग्यस्थाना भोवती रेंगाळण्यापेक्षा; ते ओलांडून कर्मस्थानाच्या अग्निपथावर चालण्याची कल्पना अधिक आवडू लागली आहे…

तुमचा विदयार्थी ,

सचिन प्रविण पाटील

(UNIX2020-314)

 

ऋणनिर्देश –  येथे बऱ्याचदा आम्ही शब्द आला आहे कारण ..हा अनुभव घेताना मी एकटा नव्हतो… ‘UNIX क्लास करायचाच !  हा फायनल डिसिजन घेणारा व रात्री लेक्चर संपल्यावर, सरांनी सांगितलेल्या भन्नाट संकल्पनांवर फोनवर माझ्यासोबत तासन्तास discussion करणारा’  विजय भोसले (UNIX2020 -365) हा हि या सगळ्यात माझ्या सोबत होता. 

32


Onkar Mate

 
UNIX 2020 (Online Batch)
 

UNIX ची बॅटरी आणि जीवनदर्शन

 
सर आणि मॅडम
साष्टांग नमस्कार,
 
सर, ३ फेब्रुवारी २०२१ रात्री ११:३० ला getblk algorithm झाला आणि
अंगावर काटा काढलातच (२७ Underline)
झोप तर उडवलीच… 
आणि डोळ्यातून पाणी पण काढलत.
 
Unix सारखा दैवी विषय, बॅटरी सारखी simple उदाहरणं देत, knowledge is interrelated हे सिद्ध करत , “You know” वाल्याना चिमटे घेत आयुष्य शिकवण्याची तुमची पद्धत…. थक्क करून टाकते.
 
Ken Thompson, Dennis Ritchie, Brian Kernighan ह्या आधुनिक ऋषींनी जगाला कलाटणी दिलेली OS, दैवी ठरते.
Great people do simple things simply.
पण माझ्यासाठी, Great OS simplify करून शिकवणारे दैवी ठरतात.
 
तुमच्या Knowledge is interrelated या वाक्याचा प्रभाव इतका झाला आहे की अंतर्मनाला relate करायचा जणू छंदच लागला आहे.
त्यातून आयुष्यातले dots connect व्हायला लागले आहेत.
 
आयुष्यातील काही अप्रिय गोष्टींमुळे, हे असं का? असे बरेच प्रश्न मला पडायचे ज्याची उत्तर माझ्या पालकांकडेही नव्हती. मनोबल वाढवण्यासाठी मी motivational books, thoughts , अध्यात्मिक पुस्तक वाचायला लागलो. माझ्या बुद्धिनुसार त्याचे अर्थ लावले (चूक बरोबर माहीत नाही) त्यातले  छान छान वाक्य एका डायरी मध्ये टिपून ठेवली.
 
Buffer cache च्या lecture मुळे त्यातील reading between the lines समजले.
 
काही लोक प्रयत्नांना सर्वस्व मानतात 
“प्रयत्नांती परमेश्वर “, 
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” etc.
 
 
काही लोक नशिबाला/प्रारब्ध ला सर्वस्व मानतात
यात आळशी लोक पण आले आणि प्रयत्न करून थकलेले आणि शेवटी नशीब म्हणणारे पण आले
 
आळशी लोकांनी corrupt केलेलं तुकाराम महाराज यांचं वाक्य आठवतं
“ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान”
 
यात प्रयत्न की प्रारब्ध नक्की कशावर विश्वास ठेवावा नक्की कोण superior या कित्येक वर्ष माझ्या मनात चाललेल्या द्वंद्वाला पूर्णविराम मिळाला. Period.
 
आपलं आयुष्य एक process आहे हे समजलं.
तुकाराम महाराज kernel mode बद्दल बोलतायत असं लक्षात आलं.
kernel ने जसे ठेविले तैसेचि समाधानाने sleep मध्ये राहावे आणि मग continue(कर्म/प्रयत्न) करावे.
 
सुमित्रा भावे यांच्या ‘नितळ’  चित्रपटात विजय तेंडुलकर यांचा dialogue हा  user mode आणि kernel mode यांचं सह-अस्तित्व अधोरेखित करतो.
नियती आणि इच्छाशक्ती यांचा प्रवास जोडीने होतो…”
आयुष्याचा output काढायला इच्छेचा user program आणि नियतीचा kernel दोन्ही महत्वाचे.
 
Kernel runs in the context of process
भगवंत भक्तांच्या माध्यमातून जगतो.
अशी तुमची एकावर एक वाक्य ऐकताना अंगावर काटा आणणे हे  function recursive execute होताना वाटत होतं(काट्यावर काटा).
 
वडीलधारी माणसं सांगतात,
तुमच्या कष्टातून तुम्ही बरंच काही साध्य करू शकता , परंतु आयुष्यातले कलाटणी देणारे महत्वाचे क्षण , काही अप्रिय गोष्टी,वैगुण्य  हे तुमच्या हातात नसतात ते विधी लिखित असतात
 
इथे विधी लिखित म्हणजे kernel चा code जो process ला follow करावाच लागतो तो कितीही आपटलं तरी नाही बदलणार
हे असं सगळं मनात उमटलं.
 
 
श्री गोंदवलेकर महाराजांनी साधकाला केलेला एक उपदेश Unix मुळे सोपा झाला
यत्न कसून करीन मी , यश दे रामा
न दे तुझी सत्ता , राम हा सर्वथा कर्ता
 
यत्न कसून करीन मी ,
(user mode मधले सगळे कष्ट जे तुमच्या हातात आहेत ते करा)
यश(buffer) दे रामा, 
(यशासाठी प्रार्थना system call करा)
न दे तुझी(kernel) सत्ता ,
(यश (buffer) लगेच मिळेल याची guarantee नाही, ते kernel च्या सत्तेत आहे)
राम(kernel) हा सर्वथा कर्ता
 
हे असे सारे dots जेंव्हा connect झाले तेंव्हा त्या आनंदामुळे नाचावस वाटलं
 
भक्ताने आर्ततेने हाक मारली की भगवंत हाकेला साद देणारच
I requested for ANY free buffer but kernel gave me
GEOPBYTE sized buffer of Dr.Vijay Gokhle…
 
 
जेंव्हा अपयश येत (buffer मिळत नाही), दुःखी, निरुत्साही वाटत असतं तेंव्हा स्वतःचा मनोबल वाढवण्यासाठी एक शब्द getblk algorithm ने दिला
 
Continue (कर्म करत राहा)
भगवान(kernel) के घर देर है पर अंधेर नही (जिते रहो काम करते रहो)
इतका common शब्द पण त्यामागचा इतका मोठा अर्थ तुमच्यामुळे समजला.
 
बॅटरी च्या उदाहरणातुन तुम्ही kernel समजून 
सांगत असता , पण खरं तर Unix ची बॅटरी घेऊन आमचा हात धरून तुम्ही जीवनदर्शन घडवत असता.
 
आपल्या सारखे गुरू लाभल्यामुळे , ज्ञानाच्या दारिद्र्य रेषेखालील माझ्या सारखे सुदामे समृद्ध होऊन ‘आनंदा‘ने ‘आश्रमा‘तून बाहेर पडत राहतील.
 
तुमचा नम्र विद्यार्थी,
ओंकार मते
 
(ता.क. – माझ्या आयुष्यात तुम्हाला आणणारे माझे वरिष्ठ आणि तुमचे विद्यार्थी श्री. उत्तेज पाटील यांचा मी सदैव ऋणी राहीन)

31


Anagh Bajpai

UNIX 2019, RTR 2020, WinDev 2020,

युनिक्स डिझाइन शिकणे म्हणजे आयुष्य शिकणे – self-realization

Respected Sir,

Just a couple of days back I was having a conversation with my mother and father about rebirth and संचित कर्म.

My parents as they always say, said that “मनुष्य का प्रारब्ध उसके पूर्व जन्म के संचित कर्मों द्वारा निर्मित होता है, मनुष्य स्वयं के कर्मों से अपने प्रारब्ध को बदल सकता है पर अगर मनुष्य सचेत नहीं है तो वो इस कर्मों के चक्र में घूमता रहता है और 84 लाख योनियों में फिरता रहता है | “

Now me being as naïve as I am, said that.

“हमें इस जन्म में अपने कर्मों को इस तरीके से करना चाहिए कि कोई संचित कर्म मृत्यु के बाद न रहे और हमारी आत्मा खाली हाथ परमात्मा के पास जाए |
अब अगर ईश्वर को हमें वापस मृत्यु लोक में भेजना ही होगा तो ठीक है कम से कम हमारे प्रारब्ध में कुछ पुराना तो नहीं लिखा होगा, और हम इस जन्म में अपने नए कर्मों से अपना प्रारब्ध लिखेंगे|”

Just after saying this, आपके शब्द ध्यान में आए की “UNIX System Design शिकणे म्हणजे आयुष्य शिकणे “.

And I just thought as soon as a Computer system is powered on its life starts and it is alive until powered off.

As a system administrator and as a programmer it is our duty with every keystroke to keep in mind that we do not do something malicious, same as we do not have to do anything malicious in our life or it will one way or another reflect in this life or next.

I will surely keep this in mind from now onwards.

After this thought came to my mind I was smiling for a while because of two reasons.

1) How ignorant I am that after a year of studying UNIX from you, I now realized this.
2) And just before I am planning to learn UNIX again from you this thought came to my mind.

सर मेरा मानना है की सत्संग विवेक को जन्म देता है |
विवेक चिंतन को |
चिंतन ही हमारे विचारों को नया आयाम देता है |
विचार ही शब्दों के रूप में मुख से बाहर आते हैं |
शब्द से ही क्रिया बन जाती है |
क्रिया से आदत |
आदत से चरित्र |
और चरित्र से प्रारब्ध |

गोस्वामी तुलसीदास जी ने ‘रामचरितमानस ‘में लिखा भी है – बिनु सत्संग विवेक न होई। रामकृपा बिनु सुलभ न सोई ।।

सत्संग मिलना आसान नहीं, अगर शिक्षक अच्छा है तो एक विद्यार्थी के शिक्षक का शिक्षण ही उसके लिए सत्संग है |

सर आपका शिक्षण सत्संग है और सत्संग आज नहीं तो कल आत्मज्ञान की शुरुआत करा ही देता है , बस कोई सत्संग को जीवन से जाने न दे, यानि की आपके शिक्षण को याद रखे |

Thank you sir for teaching in such a manner that people like me are able to understand life and Computers in the same way, and also in the way they are supposed to be learned.

चरण स्पर्श
Anagh Bajpai

30


मोहित धर्माधिकारी

UNIX 2019, WinDev 2020 (Online Batch)

|| श्री ||

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

 

प. पू. श्री गोखले सर आणि मॅडम साष्टांग प्रणाम,

 

आपल्या क्लास बद्दल किंवा सरांबद्दलचे भाव ( हो कारण भाव आणि भावना ह्या मध्ये खूप फरक आहे. एकाबद्दल भावना तयार होणे हे परिस्थितीजन्य असल्यामुळे ती तात्पुरती असल्याची शक्यता दाट असते, नव्हे ती असतेच २७ underline आणि भाव हा शाश्वत स्वरूपाचा असतो कारण तुमची नुसती शिकवण्याची नाहीच तर विद्यार्थ्याला घडवण्याची असलेली तळमळ) शब्दात मांडणे हे खरे तर माझ्यासाठी खूप अवघड असणार, कारण मुळात काही मांडणी करण्यासाठी वाचन, मनन आणि चिंतन या सर्व गोष्टींचा संबंध असणे खूप महत्वाचे असते आणि या सर्वांचा आणि माझा दूर दूर  पर्यंत संबंध नाही.

माझ्या भाग्याने लहानपणी पासून घरातील वातावरण तसे गुरु परंपरेतील असल्यामुळे म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकामुळे नकळत काही संत चरित्र वाचण्याचे पुण्य पदरी पडले असावे आणि त्यात गुरुपौर्णिमा ही कॅटॅलीस्ट म्हणून का होईना त्यामुळे ही शब्दसेवा गुंफण्याचा प्रयत्न करतोय.

खरं तर शब्दपूजा हा योग्य शब्द आहे पण ते म्हणण्यासाठी पूजेचा संबंध असावा लागतो आणि त्यात परत मग संकल्प आला आणि सध्या फक्त बाकच (OS) व्यवस्थित (? अरे मोहित तुला आरपार म्हणायचे आहे का इति बायको) केल्यामुळे, कीर्तनाचा आणि वाती वळणे हे माझ्या सद्य परिस्तिथीचे वर्णन आहे हे तुम्हाला न सांगता पण कळणार आहेच. तसा doer होण्याचा प्रयत्न सुरु केला आहे आणि SDK च्या बॅचला ऍडमिशन घेतली आहेच.

ऑगस्ट २००६ ला Sunbeam कराडच्या DAC ला ऍडमिशन पासून, मी माझ्या BE इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशनच्या (न सांगता येणारी डिग्री! ) ज्ञानाच्या (?) धक्यातून सावरत नाही तेंव्हाच क्लासच्या नोटीस बोर्ड वर एक सूचना लागते, ती तुमच्या पहिलं lecture ची आणि तेही रात्री १२:३० ते २:३०. आणि मग तुमच्या व प्रशांत लाड सरांच्या नावाने आम्ही शंख वाजवतो. ( आता १२ वर्षाचा पुणेरी भाषेचा अनुभव त्यामुळे डिसेन्ट लिहायला जमतंय ) पण तेंव्हा खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे संगीतात आम्ही टिम्ब टिम्ब बोलून गेलो. कृपया त्याचा मनात राग मानू नये आणि आज त्या अपराधाची क्षमा मागतो. कदाचित त्यावेळच्या DAC कोर्स च्या schedule (सकाळी ७ ते रात्री १२ हो तेच ते ऑपेरेशन Successful  patient डेड) च्या अवधानामुळे हा एक घोर अपराध नकळत घडून गेला.

पण त्यानंतर सुरु झालेला एक चित्त थरारक आणि मंत्रमुग्ध होणारा प्रवास! dx / dt (डेरीवेटीव्हस) काय, exponential काय त्याचा आणि मायक्रोप्रोसेसर (up म्हटलं तर तुम्ही लॅपटॉप मधून येऊन तलवार चालवलं तर) चा आणि त्याचा संबंध काय. मधेच नर्तकी येऊन raw device ड्राइवर आणि fine grained device ड्राइवर चे झालेले ज्ञान आणि मधेच “सोचलो ठाकूर” म्हणून विद्यार्थ्यांचे आत्ताच्या दशेच्या वास्स्तवाचा आरसा दाखविणारा तिखट संदेश .NET ची १३ कारणे आणि .NET च्या प्रोग्रॅमचे execution आणि  CLR ( कॉमन language runtime ) चे  लोंडींगचा शेवटचा क्लास झाल्यानंतरची धन्यता! आणि तुम्हाला कराड वरून निरोप देतानांचे पाणावलेले डोळे! 

आणि त्यानंतर पेटून उठलेला मी (?) (झुंजूमुंजु का होईना ), तेंव्हा  Java  नीट कळले नव्हते पण तुम्ही सांगितलेले खालिद मुघल DAC चा schedule पूर्ण करून रात्री १ ते ३.३० वाचन करण्याचा ध्यास घेतला आणि ७ दिवसात पूर्ण केले. तुम्ही सांगितलेले CLR ( सर याच्या आधी फुल्ल फॉर्म लिहिला आहे ) चे loading, प्लेसमेंट साठी तयारी करत असलेल्या माझ्या batch च्या सर्व विद्यार्थाना शिकवले आणि ते आजही लक्षात आहे!

परंतु BE मध्ये झालेलं YD चा इतिहास कपाळावरचा पुसल्या जात नव्हता. सत्यम, HSBC , जॉन डिअर आणि सिग्मा या सर्वांचे interview crack करून पण HR मध्ये मार्कशीट दगा देत होती. परंतु तुमच्या प्रेरणेनें SNS ( सर फुल्ल फॉर्म नाही आहे) आत्ताची ForgeAhead  ने Java ची subjective टेस्ट घेतली आणि तब्बल ४२ interview नंतर ऑफर लेटर हातात आले.

त्यानंतर इच्छा असूनही म्हणा तर कधी कंपनीच्या कामाच्या वेळेमुळे म्हणा ( खरं तर हातात येणाऱ्या छम छम  मुळे) क्लास लावता आला नाही. परंतु बिद्युत सोबत कराड ला मॉक interview साठी जाताना मनात एक चपराक बसत होतीच. पुढे ऑस्ट्रेलिया ला जाण्याची संधी मिळाली आणि २०१४ ते २०१९ जवळपास ५ वर्षे कामाचा छान अनुभव आला. बाकीचं जरी सगळे सोडले, परंतु तिथे तुमच्या कामाची आणि मेहनतीची कदर होते. मॅनेजर हा तुम्हाला विचारून क्लायंट सोबत गोष्टी फायनल करतो आणि तिथे कोणी तुमचा क्रेडिट खात नाही. हा माझा अनुभव होता. असो असेही असले तरी मूळ उद्देश हा पैसा आणि कर्ज फेडून येणे. If you dont love your job, take home loan, You know! .(सर You know वाले पण हे एक्स्प्रेशन वाचतील तर त्यांना पण थोडं बर वाटेल) 

पेरेंट्स मुळे पण परतीचे प्रयत्न सुरु होतेच आणि RTR च्या एका youtube वरील कार्यक्रमाने मनाचा परत एकदा वेध घेतला. श्रेणिक सोबत व्हाट्सअँप आणि ई-मेल वरून यूनिक्स च्या dates ची माहिती घेत होतोच. ७ डिसेंबरला २०१९ बरोबर सकाळी १० वाजता पुण्यात पोहोचलो आणि यूनिक्स ची ऍडमिशन फायनल झाली.

जणू काही १२ वर्षांच्या एक कॅन्सरमय (हो, तो असतो आपल्याला कळत नाही यूनिक्स ला येई पर्यंत ) तपश्चर्ये नंतर ती संधी मिळाली होती. अरे मोहित तू तर .Net मध्ये काम करतो मग यूनिक्स करून काय फायदा? (इति अतिपरिचयात अवज्ञा). मग मला DevOps कडे जायचा आहे अशी कधी वेळ मारून उत्तर देणे किंवा .Net core ला कामी येईल असे सांगून त्यांच्या प्रश्नाचे समाधान व्हावे. ५ वर्षे on-site  नंतर पुण्यात कार चालवणे हे किती किचकट आहे हे पण शिकलो. १० तास जॉब करून यूनिक्स अटेंड करणे ते पण मिड-life क्रायसिस असताना तसा टिकाव लागणे कठीण आहे हे स्पष्ट दिसत होतं. परंतु तो सगळा थकवा एकदा का तुम्ही आनंदाश्रमात पाऊल टाकलं कि कुठे पळून जायचा त्याचा थांग पत्ता पण लागत नव्हता. असा धरी छंद | जेणे तुटतील रे भवबंध ||

 

आनंदाश्रमातलं वातावरण, तिथली स्पंदन आणि विद्यार्थ्यांवर तिथे घडणारे संस्कार या सगळ्यांच्या तिहेरी मिश्रणा मध्ये आपल्यातला मनात कुठे तरी साठलेला अहंकार, अनुभवाची ताठरता आणि ऑन साईट रिटर्न चा गर्व सर्व विरून जातो. गुरु ऐसा सुरमा | नख शीख मारे पूर | बाहर घाव दिसत नई | अंदर चकनाचूर ||

 मग त्याची जागा गुरुकुलातील विद्यार्थी घेतो , मेहनत, रक्त आणि घाम यांच्यावर परत विश्वास बसायला सुरवात होते आणि अभ्यासात, शिकण्यात आणि जाणण्यात काय समाधान आपल्याला मिळतेय ते आपल्यालाच कळत ,उमगत. येथोनि आनंदु रे आनंदु. आणि मग ये दिल कि बात है मुरली इसे सिर्फ दिलवाले ही समझ सकते है याचा अनुभव यायला लागतो (एक्सपेरियन्स! Mr. वॉटसन )

आणि जेंव्हा आम्ही सगळे विध्यार्थी एका लयीत येतो ( कोण कुठल्या बॅकग्राऊंडचा आहे, कुणाला किती अनुभव आहे हा फरक तिथे उरत नाही ) तेंव्हा पुन्हा सुरु होतो परत एक मंत्रमुग्ध आणि मनाला समाधान देणारा प्रवास!

हार्ट बीट मधून कळणार OS बूटिंग, रिअल मोड, प्रोटेक्टड मोड आणि अ२० द्वार , थिएटर मधील बॅटरी वाला कर्नल , पोळी भाजी आणि इडली सांबर मधून कळणार buffer cache , लाल हिरवे आणि पिवळे दिव्यामधून व्यक्त होणारी प्रोसेस , लाल आणि हिरव्या दोऱ्यावरून उकलत जाणार iNode चे डेटा structure .  गर्भधारणेतून कळणारी प्रोसेस ची life सायकल आणि इव्हेंट मधून समजणारे सिग्नल. च्यायला ९ वा चॅप्टर (इति गुह्यतमम शास्त्रं!) लय घाण ( परत भेटूच repeater म्हणून! )

सर आपण टेकनॉलॉजि मधील असे प्रॉडक्ट झालात की जे कॉम्पुटर मधील एक मानांकन (स्टॅंडर्ड) झाले आहे आणि या स्टॅंडर्ड मधून बाहेर निघणारे प्रॉडक्ट ( प्रज्ञा, योगेश्वर सर , पियुष सर, शशी सर, सोनाली मॅडम, जितेंद्र सर आणि योगेश सर, श्रेणिक, निहारा )  हे पण एक स्टॅंडर्ड म्हणून आज आपलेच कार्य पुढे चालवत आहेत .

संत रामदास स्वामींनी सांगितल्या प्रमाणे, शिष्यास गुरुत्व प्राप्त होये | सुवर्णे सुवर्ण करिता नये || किंवा as per सेंट मॉरीस बाक Unix is a Product which later become standard. It became such a standard whose product later become स्टॅंडर्ड.

Knowledge is Inter-releated.

व्यक्त होण्यासारखं बरंच आहे, सांगण्यासारख खूप आहे पण हा सांगण्याचा विषय नसून अनुभवण्याचा आणि जाणण्याचा मार्ग आहे. हे सगळे व्यक्त होत असताना माझ्या हातून नकळत चुका झाल्या असतील नव्हे असाव्यातच पण मी ही सेवा केवळ एक लेखणी म्हणून करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याचे प्राकट्य माझ्या जवळचे काही नसून सरांच्या सिद्ध वाणीतून आलेले आहेत, त्यामुळे सुज्ञ वाचकांनी झालेल्या चुका पोटात घेऊन हे बोबडे बोल स्वीकारावे अशी प्रार्थना करून लेखणीस विराम देतो.

 

सर, मॅडम आणि सर्व विद्यार्थाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. :pray: :pray: :pray:

 

                                              आपलाच सदैव ऋणी,

                                              मोहित धर्माधिकारी.

 

किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम्

29


महेश जोशी

UNIX 2018, WinRT 2019, RTR 2020
 
सर, शिरसाष्टांग नमस्कार.
 
‌मी महेश जोशी.  मी आताच्या RTR2020 चा विद्यार्थी आहे. मला १२ वर्षांचा टेस्टिंगचा experience आहे. पण मला यामध्ये काही समाधान मिळत नव्हते. कंपनी मध्ये चांगले काम केले म्हणून अवॉर्ड सुद्धा मिळाले पण एक खूप मोठी खंत होती, आणि ते म्हणजे आपण फक्त चुका काढतो. आपण काही विशेष करत नाही means development/programming/coding  करत नाही हे मला जाणवत होते पण काही करू शकत नव्हतो. आपण स्वतः काही develop करत नाही … आणि त्यामुळे मी समाधानी नाही या field मध्ये असे मी माझ्या ऑफिस च्या मित्रांसोबत सुध्दा सांगत असत मग एक दिवस मला माझा मित्र अभिषेक देशपांडे याचा कडून तुमच्या विषयी कळाले आणि मी मग डिसेंबर २०१८ मध्ये UNIX च्या batch ला admission घेतले. आनंदाश्रम मध्ये  UNIX चा क्लास सुरू झाला. ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच सर्व language ची आई माता जननी माय हे हळू हळू गोष्टी रुपी कळू लागले. अभ्यास कसा करायचा हे सुद्धा कळू लागले. पुस्तक कसे वाचायचे हे सुध्दा कळाले. Topic काही न समजता फक्त परीक्षेसाठी पाठ करून मार्क्स मिळवले याची लाज वाटू लागली. प्रत्येक टॉपिक समजून घेताना जर आपल्याच रोजच्या जीवनातले उदाहरण घेऊन लक्षात ठेवले तर ते कायम लक्षात राहते हे खूपच मस्त कळाले. Unix क्लास ला गुरू कसे असतात हे समजले. सर तुम्ही आमच्यावर केलेले संस्कार कधीच विसरू शकत नाही. कोणताही विषय कसा deep मध्ये जाऊन शिकायचा हे unix च्या क्लास मध्ये कळाले. RTR बद्दल तुम्ही UNIX च्या क्लास मध्ये सांगायचा त्यावेळीच मी पक्के केले होते की काही ही झाले तरीही RTR करायचेच. थोडा मी upset होतो की मला coding/प्रोग्रामिंग चा काही experience नाही आणि मग मी हे graphic प्रोग्रामिंग कसे करणार ? पण एक विश्वास होता की सर आहेत ना मग आपण नक्की च करू शकतो. सर तुम्ही जे सांगाल ते करायचे एवढे मी ठरवले. RTR चा क्लास सुरू झाल्यानंतर जे काही मी ऐकले पाहिले शिकले ते सर्व स्वप्नातील आहे का असे वाटत होते. सर तुमचे ते Picture / movie विषयी चे अथांग समुद्राएवढी माहिती ऐकल्यानंतर मी खूपच भारावलो. तसेच आता प्रज्ञा जे काही C language शिकवत आहे खूपच अप्रतिम. या आधी मला coding ची भीती वाटत होती पण प्रज्ञा चे lectures ऐकल्या यानंतर ती भीती तर दूर झालीच पण खूप कॉन्फिडन्स आला की आपण प्रोग्रामिंग नक्की करू शकतो. Assignments तर खूप विचार करून design केल्या आहेत माझ्या सारख्या programming चा झिरो experience असलेले माणसाला सुद्धा त्या कळत आहेत. प्रज्ञा ने अप्रतिम शिकवले त्यामुळे बरेच concept clear झाले. Assignment करताना सुध्दा कॉपी paste करायचे नाही, कॉपी type करायचे हे मनाशी पक्के केले आहे. माझी एक प्रकारची श्रध्दा बसली आहे तुमच्या वर, जर मी काही चुकीचे करायचे ठरवले तरी सुद्धा माझे मन तसे करून देत नाही. Window चा first native प्रोग्राम run केल्यानंतर Output window दिसल्यानंतर मी त्या विंडो ला नमस्कार केला. Output दिसल्यानंतर फार आनंद झाला. खूप खूष झालो. Coding विषयी आवड निर्माण झाली आहे आता. मी तो विंडो चा प्रोग्रॅम 5 वेळा type करून run केला. प्रत्येक वेळी काही तरी वेगळे कळाले काही तरी वेगळी error आली ती solve करून प्रोग्रॅम रन करून पाहिला. काही तरी जमतंय असे असे वाटू लागले आहे आता. 
ऑफिस मध्ये Developer लोकांच्या coding विषयी गप्पा ऐकताना मी एक काही वेगळा आहे आणि आपल्याला काही समजत नाही ही खंत आता माझी नक्कीच दूर होईल. 
 
हा सर्व बदल सर तुमच्यामूळेच झाला आहे. मी फार असमाधानी होतो career विषयी त्यात तुमच्या सारख्या गुरुंमूळे तुमच्या संस्कारांमूळे एक प्रकारचा नवीन जोश निर्माण झाला आहे. सर तुम्ही जे सांगाल ते नक्की  करणार. आपल्या गुरुकुल मध्ये खूप खूप शिकायला मिळाले आणि अजुनी ही मिळणार आहे . त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏
 
महेश जोशी

28


योगेश नातू

UNIX 2019
 
सर,
नमस्कार ,काल UNIX ची  Batch पूर्ण झाली आणि मी तुमचा Official विदयार्थी झालो.  या पुढे मी आता स्वतःला डॉ विजय गोखले सरांचा विद्यार्थी आहे, असे अभिमानाने म्हणू शकतो.

मी माझा थोडासा परिचय देतो. मी तुमच्यापेक्षा दोन वर्ष व दोन महिने लहान आहे.  १९९२ साली मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची  डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण केली.  त्यानंतर लगेचच मी माझ्या मित्रांबरोबर इलेक्ट्रॉनिक्स development चा  व्यवसाय सुरु केला. मधे एक वर्ष मी जॉब पण केला. १९९६ साली मी माझी छोटी कंपनी सुरु केली. त्यात मी Custom built developments  कामे सुरु केली. त्यात मी embedded systems design & develop  करत होतो. १९९६ साली मी Turbo C  वापरून आणि embedded  system interface करून पूर्ण Testing  & Automation System design  केली.

२००१ साली मी VB६ आणि  २००८ साली मी .net पण शिकलो. काही SPM  मी .net आणि PLC वापरून केली. पण माझा main focus  हा embedded  systems  हाच होता. २०१७ पर्यन्त मी फक्त assembly  language  वापरूनच प्रोग्रॅमिंग करायचो. त्यानंतर मी embedded  C वापरायला सुरवात केली. तेव्हापासून मला मोठ्या व complex embedded systems ची requirement  यायला सुरवात झाली. त्यात OS  ची गरज होती. तेव्हापासून मला OS  शिकायची होती. परंतु कामाच्या load  मुळे, आज करू उद्या करू असे करत त्याला कधीच मुहूर्त सापडला नाही.

माझी मुलगी २०१९ साली BE ( E &TC) झाली. तिला लगेच JOB मिळाला.  सगळयाना हा प्रश्न पडतो कि स्वतःची कंपनी असताना तिनं बाहेर का जॉब करायचा?. पण मी तिला सांगितले आहे कि किमान ५ वर्षे बाहेरचा अनुभव घे आणि नंतर काय ते ठराव.  माझ्या  मुलीला तिच्या कंपनी मध्ये तुमच्या बद्दल कळले तेव्हा तिनें या क्लास बद्दल सांगितले. मी नेटवर search केले व मला इंटरेस्टिंग वाटले. मी आधी मुलीला विचारले कि जर क्लासनी मला ऍडमिशन दिली तर मी तिथे आलेले तुला चालेल का? तुला awkward  होणार नाही ना? तिची काही हरकत नसल्यामुळे मी admin  ला मेल पाठवून माझ्याबद्दल वय आणि व्यवसाय याची पूर्ण idea  दिली. Admin  कडून OK  असा रिप्लाय आल्यावर मी व मुलगी क्लास ला जाणार हे नक्की झाले. माझा पुतण्या डिप्लोमा कॉम्प्युटर  २ऱ्या  आहे. त्याला पण हा क्लास करायचा होता.

७ डिसेंबर २०१९ ला आमच्या तिघांची Admission Process complete  झाली. अतिशय organized  पद्धतीने Admission झाली.

१६ डिसेंबरला तुमचे पहिले Lecture  सुरु झाले. त्यानंतरची पहिली ६ Lectures मी कधीच विसरणार नाही. खूपच inspiring  आणि motivating lectures होती ती.त्यानंतर तुमची शिकवायची पद्धत खूपच आवडली. कधी विषयात आत गेलो हे कलेचं नाही. कदाचित दुसरे कुणी असते तर मी क्लास, कामाच्या लोड मुळे मधेच सोडू शकलो असतो. तुमची दोन सेमिनार Attend केली. दोन्ही सेमिनार मधून खूप नवीन शिकायला मिळाले. Corona नंतरची सगळी Lectures  मी, पत्नी व मुलीने मोबाइल कास्ट करून TV  वर बघितली, व मुलगी दोघांचा Attendance लावायची.

तुम्हाला Personally  भेटायची खूप इच्छा होती, पण दुसऱ्या दिवशी पुतण्याचे कॉलेज व मुलीची कंपनी असल्यामुळे रात्री क्लास झाल्यावर लगेच निघायला लागायचे. असे वाटले होते के मधे कधी तरी भेट होईल, पण corona  मुले ते शक्य झाले नाही. एकदा परिस्तिथी normal  झाल्यावर या UNIX  च्या batch  चे छोटेसे Get together आनंदाश्रममधे  झाले तर बरे होईल.

अजून एक छोटा अनुभव, लहानपणी शाळा, कॉलेज मध्ये मला कधीही शिक्षा झाली नव्हती.  एक दिवस मी I -Card विसरलो. नियमाप्रमाणे मला १० उठाबशा काढाव्या लागल्या. याबद्दल Admin  चे कौतुक केले पाहिजे. त्यांनी सर्व स्टुडंट्सला सारखी Treatment  दिली. तिथे कोणीही Special नव्हतं.

साधारणतः दर २/३ वर्षांनी मी एखादा नवीन Technical  Course करतो. पण कॉलेज नंतरचा हा शिक्षणाचा अनुभव,सगळ्यात “लै भारी क्लास होता येड्या”, असेच म्हणता येईल. खरोखर आम्ही सर्व स्टुडंट्सनी हा क्लास एन्जॉय केला.

तुमच्या सारखेच  मला ज्योतिषमध्ये रस होता . मी मध्ये काही वर्षे ज्योतिष्य  शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण तुमच्या सारखा गुरु या विषयात मिळाला नाही (मला जमले नाही त्याचे हे ‘कारण’ आहे).

मला SDK चा क्लास लावायला खूप आवडला असता, पण माझा फोकस embedded  मधेच आहे. २०१४ नंतर मी PC software फक्त इंटर्नल टेस्टिंग पुरते करतो. त्यामुळे जसा मला OS  चा उपयोग होईल, तसे SDK चे अँप्लिकेशन होणार नाही. हे कारण म्हणजे १) You  know  Sir  २) वेळ नाही आणि ३) सर, मी कि नाही, माझं कि नाही , या प्रकारातले असू शकते. त्याबद्दल Sorry … पण माझी मुलगी आणि दोन पुतणे हा क्लास जॉईन करणार आहेत.

हा क्लास अतिशय चांगल्या पद्धतीने Organize  केल्याबद्दल श्रेणीक, निहारा आणि मॅडम याचें खूप आभार. तसेच मयूर, अमेय आणि सहकारी यांचे पण आभार. सोवनी, शेवाळे यांची ओळख व्हायला सुरवात झाली होती, पण तेवढ्यात Corona ब्रेक झाला.  तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे, पण SDK ची पहिली ३ Open to all lectures  नक्कीच बघणार आहे.

तुमचा विद्यार्थी,

योगेश नातू
(UNIX2019 Batch, ID-050)
🙏🙏
 

27


निकिता राजिवडे

WinRT 2017, UNIX 2017, RTR 2018

दंडवत प्रणाम सर,

मी सरांचं पहिलं seminar केलं ते Unix Seminar. त्यानंतर सर्व seminars व Unix, Win32 SDK batches पूर्ण केल्या.

मग OpenGL seminar भाग १, भाग २, भाग ३ असे सगळेच पूर्ण केले. त्यात जे काही शिकले त्याच्या basis वर एक साधा Doraemon cartoon चा demo तयार केला.

सरांनी केलेले OpenGL चे demos पाहून असे चमत्कार code ने करता येतात हे उमझले आणि ते coding आपण शिकायचं हे ठरवलं.

त्याचा पुढे काय आणि कसा उपयोग होईल, so called scope काय असेल, या skillset मध्ये आपलयाला job मिळेल का , असे कोणतेही प्रश्न मनात आलेच नाहीत कारण code करून असे output screen वर पाहणे यातच खूप समाधान मिळणार होते.

मस्त शिकून coding करूयात ते पण across multiple platforms, असे भारी demos करून Hawa करायची, shining मारायची बस हेच लहानसं स्वप्न.

Class ला admission घेतली. Class आणि Job सोबतच सुरु झाले.

१ वर्ष होत आला OpenGL शिकत होते. Office मध्ये team ला माहित होते कि मी Graphics Programming करतीय ते पण इतके पैसे व वेळ invest करून. त्यांनी मला समजावलं कि तू याच क्षेत्रात काम मिळवण्याचा प्रयत्न कर. मनात सरांच वाक्य आठवलं,

“Don’t learn to earn, but try to earn from whatever you learn”.

आपल्या हातात प्रयत्न करणे असतं बाकी जे मिळायचा ते मिळेलच मग ठरलं तर Graphics programmer job साठी apply करायचे.

एक विशेष बात म्हणजे Resume मध्ये Education Section open करून त्यात आपलं Real Time Rendering at AstroMediComp add केलं होतं.

पहिलं तर Resume shortlist झाला त्या company चा फोन आला कि 5 Rounds होतील, म्हटलं ठीक आहे नसीब आजमाते है.

पहिला Round होता General aptitude ते solve करून दिले.

दुसरा Round होता Technical assignments, त्यात एक OpenGL आणि बाकी C++ असे code करून द्यायचे होते.

OpenGL assignment होती ती म्हणजे एक curve generation करायचे, त्या geometry ला extrude करायचे आणि त्याला texture लावायचे. आधी भीती वाटत होती कि जमेल कि नाही, पण code करायचाच, कमीतकमी त्यातून एक अनुभव येईल कसे प्रश्न सोडवायचे ते तरी कळेल म्हणून केले सुरु काम.

त्यांनी सांगितलेले कि C किंवा C++ based Graphics API म्हणजे OpenGL , DirectX इत्यादी वापरून code करू शकता आणि extrusion चे main logic स्वतः लिहायचे.

आधी तो curve काय आहे ते वाचलं विकिपीडिया वर, तिथे मग थोडं गणित समझून घेतले आणि code करायला सुरुवात केली. पहिला आठवला तो tessellation मध्ये केलेला आपला Bezier curve त्यालाच base code म्हणून घेतले. पुढील काम सुरु केले curve तर दिसत होता पण आता texture कसे लावायचे याचे प्रयत्न सुरु झाले थोडे अडथळे यायला लागले म्हणून तो बाजूला ठेवला आणि नवीन code करूयात using simple 2D Colored Shapes as a base code असे ठरवले यामध्ये algorithm लिहून, मग geometry extrusion, आणि मग त्याला texture लावून code पूर्ण केला. दुसऱ्या बाजूला cpp चे code पण पूर्ण केले आणि दुसरा round संपला.

भारी वाटत होते… मी code enjoy केला होता आता result काहीही आला तरी tension नव्हतं.

Result आला ते बोलले congragulations you have cleared second round.

पुढचा round होता technical question and answers

First question होता दुसऱ्या round मध्ये केलेला code कसा केला ?

आपण सरांचे विद्यार्थी, code मध्ये केलेली line आणि line समझलेली पाहिजे, तुमचा code तुम्हाला सांगायला plus शिकवायला हि जमला पाहिजे ?

Code template आपलाच असल्यामुळे मग काय घाबरायचं !!!

Geometry extrusion चे logic त्यांना समझावले. ते बोलता बोलता texcoords वर आम्ही आलो, मी extruded geometry draw करताना 3 curves वापरले होते, त्यात middle main curve, up curve and down curve असे बाकी 2 curves यांचे vertices घेऊन quads काढले. एक quad बनला होता 2 triangles ने एका triangle ला texcoords जसे देतो तसे इथेही दिले.

मग actual code open केला .cpp file त्यामध्ये घुसलो सर्वात पहिला प्रश्न असा कि data कसा पाठवला किंवा data वर operations कसे केलेत ?

मी सांगितले vertex array objects(vao) वापरून data कसा आपण vertex buffer objects मध्ये GL_ARRAY_BUFFER या target ला bind करतो . सरांनी शिकवलेला vao म्हणजे initialize मध्ये केलेले recorded cassette आणि तीच cassette draw मध्ये वाजवली कि drawing होणार मग vao नसेल तर आपल्याला त्या 4 lines glBindBuffer, glBufferData, glVertexAttribPointer and glEnableVertexAttribArray या draw मध्ये वारंवार लिहाव्या लागणार.

Data तर ठेवला vbos च्या आत, पण आता shaders आले त्यात attribute आणि uniform मध्ये काय फरक आहे असे विचारण्यात आले,

for an vertex it’s attribute can be position, color, texcoord, normal which changes per vertex but uniform remains same for all vertices in a every draw call, then how do we get this location? answer was using glBindAttribLocation for attributes and glGetUniformLocation for uniforms.

असाच code scroll होत असताना मधेच त्यांनी थांबवले glVertexAttribPointer काय आहे ? ……………………………

( खरंच हे प्रश्न उत्तर चालू असताना मागचे 1.5 वर्ष डोळ्यासमोर येत होते, कसली भीती नाही काहीही विचारा आमचाच code आहे आम्ही सांगू शकतो हा confidence जो आपल्याला सरांनी मिळवून दिलाय तोच मला पुढे नेत होता.

केलेल्या सर्व assignments आठवत होत्या,

” याजसाठी केला होता अट्टहास ।

शेवटचा दिस गोड व्हावा ।। ”

सतत क्रिया करत राहिलो त्याचं फळस्वरूप सर तुम्ही आम्हाला जी अभ्यासाची शिस्त लावलीत त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. )

चला …. glVertexAttribPointer is used to provide format of data which includes it’s type, glBindAttribLocation ने जे attribute location मिळवले ते द्यायचे , no of components for that attribute like for position 3 (x, y, z), त्यानंतर data वाचताना किती ढांगा टाकायच्या तो stride आणि कुठून start करायचं तो offset, तर normalized data आहे कि नाही अशी सर्व parameters द्यावे लागतात.

मला इतकं समझलं होतं कि interviewer check करतायेत कि code copy paste तर केला नाहीये ना

मनात आले कि, विचार बाबा विचार, जणू काय माझ्या मागच्या १ वर्षात मी काय केले त्याची परीक्षा चालू होती.

मग गेलो draw मध्ये draw arrays आणि draw elements वर चर्चा जमली तेव्हा सांगितले कि जिथे heavy models load केले जातात तिथे vertices नाही वापरायचे तर त्या vertices ला indices लावून ते model draw करायचे म्हणजेच memory wise उत्तम तर data repetition पण होत नाही.

मग आलं glUniformMatrix4fv, प्रश्न होता सगळे parameters explain करा, मी 3 बरोबर सांगितले आणि 4th मला on the spot नाही आठवला.

Uniform ची value shader ला पाठवण्यासाठी हे function वापरतात असे सांगितले, तर integer uniform ला value कशी पाठवणार असे विचारले त्यांनी, आपले उत्तर ready glUniform1i.

Normals म्हणजे काय? आपल्या diffuse light on cube या assignment मधे surface normals जे आपण वापरलेत ते कसे घेतलेत सांगितले.

OpenGL चा प्रवास संपला आणि C++ वर बरेच प्रश्न विचारले त्यांचीही उत्तरे दिली

थोडे logical problems code ने सोडविले.

हुश्य …. ! हा round १ तास २० मिनटात संपला.

या round मध्ये मझ्या आली, खूप आनंद होत होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरांचे lecture आणि assignments यांमध्येच मिळून गेले.

आता पुढचा round होता detail indepth technical

Resume मध्ये मी 3 personal projects mention केलेले, त्यातला एक म्हणजे shadowing special effect, interactive object वाला.

पहिला प्रश्न आला shadowing कसं केलंय ? उत्तर दिले LightSpaceMatrix वापरून प्रत्येक vertex ची z value that is depth हि LightSpaceMatrix मध्ये बसत नसेल तर त्याची shadow पडणार आणि त्याचा depthmap / texturemap तयार करायचा.

Then while drawing use 2 different shader program objects, One for generating shadow and another for regular drawing. For shadow map use framebuffer as drawing destination and for regular drawing use color buffer as drawing destination.

असं मला जितके समझले hote ते सर्व बोलले next question असा होता कि volume shadows काय असतात ? वाजली डोक्यात टणटण, मी अजून volume shadows केले नाहीये असं स्पष्ट मी त्यांना केले.

OpenGL Pipeline सरांनी आपल्याला शिकवली होती आता त्यावर प्रश्न सुरु झाले …

आलो pipeline वर , खालील pipeline explain केली vertex shader->tessellation control shader->tessellation evaluation shader->Geometry shader->Primitive Assembly->Clipping->Rasterisation->Fragment shader

आणि पुढचा शब्द भार उचलला तो rasterization ने rasterization म्हणजे काय तर सोप्या भाषेत 3D pyramid 2D screen वर कसा दाखवायचा.

Input for rasterization is updated primitives which have undergone clipping in previous stage and output of rasterization is collection of pixels called as fragment तर या पुढच्या stages मध्ये per fragment operations perform केले जातात. Vertex shader and fragment shader are compulsory, tessellation and geometry shaders are optional.

All of above shaders, process the data associated with each vertex. मग येते primitive assembly which assembles these vertices to make a geometric primitive from it.

आता विषय निघाला तो front and back buffers चा मला इतकं झटकन नाही आठवलं पण नुकतेच आपले iOS झालेले शिकून, त्यात आपल्याला front and back buffers, double buffering ची concept clear झालेली. तीच explain करायला घेतली एक buffer मध्ये आपण rendered image तयार ठेवतो आणि दुसरा buffer म्हणजे जो screen वर दाखवतो. म्हणून जर rendered image वाला buffer screen वर दाखवायचा असेल तर आपण buffers ला swap करतो.

Next question असा होता कि culling काय आहे मी त्यांना back face culling चं example घेऊन concept explain केली.

OpenGL चे प्रश्न विचारून झाले होते नंतर cpp चे प्रश्न विचारले आणि हा round आमचा जवळपास २० मिनटात संपला.

हा round ठीकठाक गेला काही प्रश्न जमले काही नाही जमले. पण एकूणच चांगला गेला.

१ दिवसातच त्यांचा मला फोन आला कि you have cleared all rounds आणि salary discussion चा एक शेवटचा round झाला.

As a fresher with 1 year hands – on experience in Graphics programming, त्यांनी मला Graphics Developer च्या Profile साठी select केलं.

हे सर्व कसे शक्य झाले ते मात्र एक कानमंत्र जो सरांनी आपल्याला दिलाय –

“ bhavabhyasanam abhyasah Silanam satatam kriya “

तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला असेच निरंतर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– धन्यवाद सर

सरांना नमन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. माझे काही चुकले असेल तर कृपा करून क्षमा असावी.

तुमची कृतज्ञ विद्यार्थिनी,
निकिता राजिवडे

26


अमेय विलास महाडदळकर

UNIX 2018, WinRT 2019    

!!श्री !!

आदरणीय  सर ,

तुम्हाला भेटुन , बघुन अनुभवायला लागुन  एक वर्षापेक्षा जास्त  काळ झाला. तुमच्याविषयीच्या भावना शब्दात मांडणं खरंतर कठीणच आहे आणि तुमच्याविषयी काही लिहावं एवढी माझी पात्रता / कुवत (खरंतर लायकीच म्हणायला हवं , पण तुमच्याच संस्काराचा भाग म्हणून भाषा जपून वापरायचा प्रयत्न करतोय.) अजिबात नाही . पण तरीही वारंवार तुमच्याबद्दल वाटणारं प्रेम, माया, आपुलकी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदर हे कुठंतरी, कधीतरी लिहून  ठेवावंसं वाटत होतं म्हणून हा एक तोकडा प्रयत्न.

सर , खरंतर तुम्हाला भेटायच्या आधी जेंव्हा केंव्हा समाजातील काही खूप यशस्वी व्यक्तींना बघायचो तेंव्हा त्यांच्याकडं बघुन मला खूप भरून यायचं कारण त्यांनी केलेले अफाट कष्ट, अविरत मेहनत, आणि त्यांची त्याच्या कलेवर ,कामावर असणारी  श्रद्धा , निष्ठा , प्रेम दिसायचं . जसं तुम्ही आम्हाला नेहमी सांगत असता की computer हा तुमच्यासाठी सचिनची bat , लतादीदींचं गाणं,पं . हरिप्रसाद चौरासियाजींची बासरी होऊ द्या मग बघा जादू. अगदी तसंच काही मला आशाताई ,महेश काळे , राहुल देशपांडे , सचिन तेंडुलकर , विराट कोहली अशा लोकांना बघितलं कि वाटतं . या सगळ्यांचं अवलोकन करताना मला अजून एक गोष्ट आढळली जी ह्या सगळ्यांत साम्य दर्शवते ती म्हणजे या प्रत्येकाचे आपापल्या गुरूंवर नितांत प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे गुरूसुद्धा खूप, खूप  ताकदीचे, सिद्धहस्त आणि पूजनीय होते /आहेत.

हे सगळं बघितल्यावर मनात सारखं यायचं की आपल्याला असे सिद्धहस्त गुरु भेटले तर किती बरं होईल आणि आज मला हे सांगताना ऊर खूप भरून येतो (अर्थात अभिमानानं ) की हो मलापण माझे , स्वतःचे असे सिद्धहस्त गुरु भेटलेत आणि साक्षात दैवतासमान आहेत ज्यांचं नाव डॉ . विजय दत्तात्रय गोखले . सर मला तुम्ही भेटलेल्याचा आनंद तर आहेच पण त्याहून जास्त आनंद तुम्ही डॉक्टर असूनसुद्धा माझ्या क्षेत्रात (मी शिक्षण घेतलेल्या ) आहात आणि तुम्ही सर्वकाही मायबोलीत (आई माईच्या भाषेत ) शिकवता याचा आहे . 

सर, गेल्या वर्षभरात तुमच्याकडून उदंड गोष्टी मिळाल्या , त्या अजून मिळतायत आणि त्या मिळतच राहतील. त्यातीलच मला आत्ता आठवणाऱ्या ठळक गोष्टी म्हणजे संस्कार, पालकत्व (parenting), कला, coding चं महत्व आणि आयुष्यातलं fundamentals चं असणारं अनन्यसाधारण स्थान. मग ते computer fundamentals असोत वा life fundamentals.

सर , तुम्ही तुमच्या प्रेमानं , मायेनं आणि आपुलकीनं अनेक विद्यार्थ्यांना अक्षरशः विकत घेतलंय आणि तुमच्यासोबत मॅडमनीसुद्धा ते लीलया साध्य केलंय. खरंतर मॅडमनी आमच्याशी एवढ्या प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं वागण्याची काही गरज नाही पण त्यासुद्धा तुमच्याच पत्नी , त्या कशा जीव लावण्यात मागं राहतील? विद्यार्थ्यांचा जेवढा जीव सर तुमच्यावर आहे ना तेव्हढाच तो मॅडमवरसुद्धा आहे आणि मला तर त्यांना “गुरुमाय ” म्हणून मिरवताना खूप आनंद होतो. (मी तुमच्यासोबत मॅडमचं नावपण प्रौढीनं मिरवतो). सर हे असं घडण्याचं कारण माहितीये? ते म्हणजे तुम्ही आमच्याशी ज्या हक्कानं , अधिकाराने आणि जबाबदारीनं हे सगळं आमच्या पचनी पडता तो हक्क, अधिकार आणि ती जबाबदारी.

सर , तुमच्याविषयी भारी वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे तुम्ही तयार केलेले तुमचे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक. योगेश्वर सर , पियुष सर, स्वप्नील सर , शशी सर यांच्याकडं बघितलं कि कळतं की तुम्ही फक्त उत्तम शिक्षक तयार करण्याचं ध्येयच ठेवलं नाही तर त्याला अत्यंत संयुक्तिक आणि अभिमानास्पद असं मूर्त स्वरूपसुद्धा आलंय आणि अजून येत राहील. सर तुमचे खूप खूप आभार , तुम्ही आम्हाला या साऱ्यांना भेटण्याची , अनुभवण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची संधी दिलीत .

 सर, धन्यवाद . तुम्ही आम्हाला अशा अनेक गोष्टी शिकवल्या ज्या आम्हाला माहिती होत्या पण  विचारच केला गेला नव्हता. जसं कि देशप्रेम . तुमचं आपल्या देशावर असणारं प्रेम आणि तेच तुम्ही आमच्या मनात पुन्हा एकदा प्रज्वलित केलंत. देश सोडून जाताना तुम्ही तुमचा best effort दिलात का?हा मनाला चिचरायला लावणारा प्रश्न, तसंच देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो अथवा आजवर दिलं हा विचार म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचंच उदाहरण आहे आणि हे प्रश्न तुम्ही ज्या पोटतिडकीने आमच्यासमोर मांडता ती भावना नक्कीच आमच्यापर्यँत पोहोचते आणि गांभीर्यानं विचार करायला लावते. त्यातुन तुमचा आमच्यातही ती राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा उद्देश काही अंशी किंबहुना बहुतांशी सफल होतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे योगेश्वर सर. (जो माणूस आपल्या कष्टाच्या पैशांवर पाणी सोडून परत आपल्या मायदेशात येतो त्याला बघून खरंच तुमचे सर्व प्रयत्न आणि ईच्छा सार्थक होताना दिसतात.)  

सर, तुम्ही आम्हाला दिलेला अजून एक विचार जो मनात असाच आयुष्यभरासाठी घर करून गेला तो म्हणजे, आपलं आपल्या संस्कृतीवर प्रेम असावं. आपणच ती जपली, अंगिकारली आणि वृद्धिंगत केली पाहिजे. यासाठी तुम्ही दिलेली दोन उदाहरणंपण प्रकर्षानं आठवतात. एक म्हणजे South Indian मुली अथवा स्त्रीया IT मध्ये असूनही कपाळावर कुंकू आणि केसात गजरा माळून आपली संस्कृती जपतात आणि दुसरा उदाहरण म्हणजे आपली मिठु (प्रज्ञा) जी एकटीच टिकली लावून कॉलेजला जाते आजही. कारण तिला तिच्या दिसण्यापेक्षा (ती तसंही छानच दिसते) कामावर, क्षमतेवर (coding) खूप विश्वास आहे आणि तुम्हीसुद्धा तेच शिकवत असता. हे दोनच नाही तर अशा अनेक विचारांचं बीज तुम्ही आमचं मनात पेरलंय पण या दोन विचारांनी थोडं जास्त अंतर्मुख केलं म्हणून त्यांचा उल्लेख इथं केला.

सर, तुम्ही आम्हाला समाजातील, आपल्या क्षेत्रातील महान व्यक्तींचा आदर करायला आणि मान ठेवायला शिकवलंत, म्हणजेच तुम्ही आम्हाला स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकवलंत.  पण त्याचवेळी आपल्या कक्षा कशा रुंदावतील हे सुद्धा शिकवला आणि त्यासाठी नेहमीच पंखात बळ दिलंत. तुमच्याकडून ही गोष्ट आपसुकच शिकण्याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतः ती आचरणात आणता आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटणार आदर पदोपदी व्यक्त करता. जसा तो तुम्हाला Dennis Ritchie , Ken Thompson, Maurice  J  Bach, Bjarne Stroustrup  या आणि अशा अनेक व्यक्तीबद्दल वाटतो. नाहीतर, आम्ही पूर्वी या सगळ्यांची नावं एकेरी घायचो आणि मनात आदर होता कि नाही याबद्दल साशंकता आहेच. पण तुमच्याकडे शिकल्यावर ती साशंकता दूर झाली आणि आदर वाढला.

आजपर्यंत सर माझं नुसता जगणं सुरु होतं म्हणजे आलेला दिवस संपेपर्यत समोर जे येईल ते करणे. त्यात काहीही विचार नसायचा. मग एकेदिवशी अचानक असा वाटलं कि आपण काय करतोय आयुष्यात? काही हेतू तर नव्हताच पण आयुष्य भरभरून जगणंसुद्धा घडत नव्हतं. पण सर तुमचा आयुष्यातला प्रवास बघितला की आयुष्य भरभरून कसं जगायचं याचं एक उत्तम उदाहरण मिळतं आणि प्रेरणासुद्धा मिळते. जसं की मी म्हणालो आयुष्य जगण्याचा हेतू मिळालाय की नाही माहिती नाही पण आयुष्य पुरेपूर जगण्याची उमेद नक्की मिळालीये. ती कुठे हरवू नये इतकंच वाटतं. तुमचा प्रत्येक क्षेत्रांतील वावर आणि प्राविण्य हेच दर्शवत असतं कि प्रत्येक क्षण भरभरून जगा.

सर, तुम्ही आम्हला नाती जोडायला, जोडलेली नाती जपायला, टिकवायला आणि समृद्ध करायला शिकवलंत. नात्यातली आपली जबाबदारी ओळखण्यासाठी तुम्ही दिलेलं नवरा बायकोचं उदाहरण न विसरण्यासारखं आहे. जिथं तुम्ही असं म्हणता की, लग्नानंतर नवऱ्यानं त्याच्या बायकोचा बाप आणि बायकोनं तिच्या नवऱ्याची आई व्हावं. हे त्याच्या नात्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारंच वक्तव्य आहे.याचबरोबर तुम्ही पालकत्वावर खूप बोलता आणि आपणच कसे आपल्या पाल्याचे Hero / Heroine  असायला पाहिजे ते सांगत असता. त्याचवेळी तुम्ही हे मिठुच्या बाबतीत लयिवेळा करून दाखवलंयत.

बोलताना कसं भान ठेवून बोलावं, बोललेल्या वक्तव्यांची जबादारी कशी घ्यावी हे तुम्ही ” A  sword  kills one person at a time, but a word can kill millions at a time” या एका वाक्यातून सांगता ते कधीच विसरण्यासारखं नाहीये.  तुम्ही केलेला अजून एक संस्कार म्हणजे “अन्नाचा आदर”. अन्न कधीच वाया घालवू नये ताटात वाढलेला प्रत्येक कण संपवावा.

UNIX शिकताना झालेला नव्हे तुम्हीच घडवलेला अजून एक बदल म्हणजे की, तुम्ही आम्हाला नम्र व्हायला शिकवलंत. आपल्याला काही येत नाही, आपण किती खुजे आहोत आणि असं असताना पण आपण उगाच किती प्रौढी मिरवतो हे तुम्हीच प्रेमानं, रागानं, आपुलकीनं आणि प्रसंगी डोळ्यात अंजन घालून दाखवून दिलंत. आज अंगी जो काही नम्रपणा आलाय विशेषतः system (computer) विषयीचा तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच सर. अजूनही बऱ्याच बाबतीत तो नम्रपणा तुम्ही शिकवलात पण system विषयीचा नम्रपणा आणि आदर आता अंगवळणी पडू लागलाय हे नक्की.

आपल्या गुरुंवरचं निस्सीम, नितान्त, आणि निस्वार्थ प्रेमपण या गुरुकुलातच अनुभवायला मिळालं. गुरूंसाठी काहीही करायची प्रेरणा आणि तयारी तेही विना मोबदला आणि कुठल्याही वेळी गुरूंच्या एका शब्दावर फिदा होणारे विद्यार्थी हे आजच्या जगातील एक दुर्मिळ नातं आम्ही खूप भरभरून जगतोय आणि याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे (तशी असंख्य आहेत पण दोन जी आपल्याला रोज भेटतात) आपली निहारा आणि श्रेणिक. दोघंही इतकी वर्षं अव्याहतपणे Admin ची जबाबदारी इतक्या लीलया पार पडतायत कि त्यांचा हेवा वाटतो.  त्याच्या या अविरत व्रतामध्ये गुरुंवरची श्रद्धा, माया, प्रेमतर आहेच पण त्याच गुरूंनी केलेला एक संस्कार आहे तो म्हणजे ” उतू नका, मातु नका घेतला वसा टाकू नका . “

सर, निहारा तर रोजच आमच्यासाठी, तुमच्यासाठी धावपळ करत असते मग तिची तब्येत बरी असो व नसो तिची ती धावपळ, पळापळ थांबत नाही. पण यावर्षी मला UNIX २०१९ च्या Admission process मध्ये volunteer होता आलं आणि तिथं अनुभवलं की श्रेणिकसुद्धा तितक्याच तन्मयतेनं, आपुलकीनं आणि जबाबदारीनं सगळं सांभाळत होता आणि आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्यांचं नीट निर्वहन होतंय ना याची खबरदारी घेत होता. खरंतर श्रेणिक हे सगळं गेली चौदा वर्ष करतोय पण दरवर्षी त्याचा उत्साह आणि उमेद अगदी पहिल्या वर्षीसारखीच असते. प्रसंगी या दोघांना काही कणखर भूमिका घ्याव्या लागतात आणि आमच्यासारख्या  विद्यार्थ्यांना त्यांच्या वागण्या बोलण्याचं वाईटही वाटतं पण नंतर लक्षात येतं की जर ते त्या प्रसंगात कठोर वागले नसते तर परिस्थिती हाताळणं अशक्य झालं असतं. पण एकूणच काय निहारा आणि श्रेणिकचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटतं.

सर, तुमच्याकडून आजपर्यंत उदंड गोष्टी, संस्कार मिळाले आणि ते यापुढेही मिळत राहतील यात शंका नाही. तुमच्याविषयी लिहिण्यासारखं खूप  काही आहे.  पण सगळ्याच भावना शब्दात बांधणं शक्य नाही आणि खरंतर माझी तेवढी पात्रतापण नाही म्हणून मी माझं हे छोटेखानी मनोगत इथंच थांबवतो

आणि पुन्हा एकदा , मी तुमचा आजन्म ऋणी आहे.

           “खूप खूप धन्यवाद सर.

तुमच्याकडून आजवर मिळालेल्या आणि इथूनपुढे मिळणाऱ्या प्रेम, माया, आपुलकी, आणि प्रत्येक व्यक्त आणि अव्यक्त गोष्टीसाठी.  English मध्ये सांगायचं झालं तर,

         “Really Very Thank You Sir for Everything.”

 
आपलाच विद्यार्थी,
अमेय विलास महाडदळकर.
(Batch: UNIX २०१८, SDK २०१९)

25


स्वप्नाली बाळासाहेब पाटील

WinRT 2019

|| श्री ||

सन्माननीय सर,

     सर्वप्रथम नमस्कार, खरं तर मी तुमच्याविषयी माझ्या मित्राकडून ऐकलं आणि तुमचे youtube वरचे video पाहिले. पण तोपर्यंत UNIX-२०१८ ची batch सुरु झाली होती आणि मी उशीर केला होता. कारण मी जे काही त्या विडिओ मध्ये पाहिलं ते सार स्वप्नवत होतं.

     कसं कुणी आपलं यश-अपयश, चुका, त्यांवरचे मार्ग इतकं खुलेआम बोलू शकतं. कसं कुणी आमच्यात बसून आमच्यापैकीच आपण आहेत, हे करू शकतं. खरंच पटत नव्हतं, कारण आयुष्यात कुणीतरी असं भरभरून देणारं भेटेल, असं कधीच वाटलं नव्हतं, आणि तुम्ही भेटलात सर.

     खरतरं काही गोष्टी या शब्दात सामावत नाहीत, पण तरी माझ्या भावना व्यक्त करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. काही ओळींमध्ये आपला उल्लेख एकेरी झाला असेल, त्याबद्दल माफी असावी.

गीत तेच चाल निराळी,
गंध संस्कृतीचे दरवळत जाई,
ज्ञानामृताची जिथे रोषणाई,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

असंख्य दिवे उजळीत जाई,
संस्कारांची सरिताही वाही,
ज्ञानोत्सवांची जणू पंढरी ही,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

कलागुणांची मैफिल साजरी,
जगण्यास मिळे नवी उभारी,
हर पैलूची कथा आगळी,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

आभाळाची मिळे सावली,
कधी गरजली कधी बरसली,
दातृत्वाची गोष्ट ही न्यारी
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

धन्यवाद सर.

आपली विद्यार्थिनी,
स्वप्नाली पाटील
(२५-११-२०१९)

24


From Grateful Parents

Dear Madam/Sir

Jai Gurudev!
 
This is a thanks giving to a person who is by real means a GURU. There are plenty of teachers around, but not all are Vijay sir the real Guru.
Our only son was totally a lost and depressed child when he did not perform well in his BCS course. For him his life/his years were wasted and hopes lost.  For us we had lost our beloved boy. 
But after meeting Vijay sir, there was a positive impact, a wonderful influence on him. Sir has empowered him to chase his dreams. The subject he hated most are now challenging and developing curiosity in him. 
He has been motivated by Sir to be a life long learner. His way of looking towards his own life has totally changed. Our son has changed into a more responsible, caring and a focused person now.
He is blessed to have a Guru like Vijay sir. The power of every word and action of Sir has changed our son. Sir has made a great difference in his life. 
From the bottom of our heart we thank you Vijay sir for bringing back the lost happiness in our lives and a heartfull thanks from a mother who says,” I have got my son back “
 
 
A never ending Thank you 
from grateful parents -Rahane’s

23


Omkar Langhe

WinRT 2018, UNIX 2018
 

माझं नाव Omkar Langhe , नुकताच passout झालोय आणि एका company मध्ये internship करत आहे .मी सरांन ला SDK 2018 Batch मध्ये पाहिलं. तस सर बद्दल बरच काही ऐकल होत पण class लावायचा विचार कधी आला न्हवता.

सरांन कडे येण्या आधी मी सरांनचे एक विद्यार्थी Jeetendra Sir कडे C-DS-C++ शिकत होतो. Jeetendra Sir कडे शिकत असताना मला जाणवलं की आपण जे C/C++ शिकलो ते काहीच नव्हतं.

Jeetendra Sir कडे batch संपली आणि मला programs जमायला लागले, पूर्वी सारखी programming ची भीती कमी झाली. मला हळू हळू जाणवायला लागल की मी जे समजत होतो की – “MALA C YETA, DS YETA, C++ YETA” ह्यातल काहीच येत नव्हतं. म्हणजेच CANCER झ्हाला होता. 
अश्या प्रकारच्या Cancer ची treatment करायची म्हणून मग मी 19 june 2018 ला SDK batch join केली .Batch मध्ये अधिक संख्या UNIX चा विद्यार्थ्यांची असल्या मुळे मला हा सवाल आला होता “मला हे जमेल का ??” कारण COM ची भीती मी माझा मित्रांकडून ऐकली होती ज्यांने पहिलं सर कडे  SDK केल होत. मग मी सरांनला विचारल की मी UNIX केलं नाही, तेव्हा सर बोलले काही हरकत नाही, SDK कर आणि नंतर UNIX कर.

SDK ला सुरवात झाली आणि Coding चा नवीन प्रवास सुरु झ्हाला .सर ने सांगितलेल Event Driven Architecture, Polymorphism, Compilation kasa hota, आणि बऱ्याच concepts समजायला लागल्या. Pure virtual functions, Interface सांगताना Rajesh Pradhan च example आता मी कधीच विसरणार नाही. Win 32 शिकत असताना सगळं मस्त वाटत होत. Assignments पण KADAK होत होत्या आणि मग जेव्हा COM आलं , तेव्हा हळू हळू तेचे चटके बसायला लागले (TO BE VERY HONEST).

COM चालू असताना C++ चा बऱ्याच  concepts समजायला लागल्या e.g. pure virtual functions, abstract classes, pure virtual base class, interface, classes, objects, polymorphism, Inheritance, etc. चांगल समजले. COM ला सगळे का अवघड म्हणतात ते Aggregation आणि Automation चा flow आल्या वर समजलं . Automation करताना खूप त्रास झाला. Automation चा flow मी 2-3 वेळा करून सुद्धा run होत न्हवता तेव्हा एका क्षणी give up करायचा विचार आला होता. पण Run तर करायचाच होत.

Notes वाचत, Recordings ऐकत ऐकत परत एकदा Automation ला try दिला. सांगितल्या सारखे सगळे configurations केले. आता वाटलं मस्त कडक Run होणार automation आपलं, पण तो काय run झाला  नाही.

अश्या वेळेस एवढे प्रयत्न करून सुद्धा Success मिळत नाही, तेचे frustration मला जणू लागल. खूप वेळा असं वाटलं की मी सगळं बरोबर केलय तरी का होत नाही, तेव्हा सर ने सांगितलेले “तो कधीच चुकत नाही” हे आठवायचं. मग खूप प्रयत्न केल्या नंतर मी माझा एका मित्रा ला सांगितलं माझं  automation रन होत नाही म्हणून. सगळं बरोबर वाटत आहे. सांगता सांगता एक configuration केलं आहे का त्याने विचारले. आणि मी ते configuration केलं न्हवत. रात्री घरी आल्यावर ते configuration केलं आणि माझा पहिला client आणि दुसरा IDispatch चा client Run झाला. तो run झाला आणि समाधान जाणवलं, आणि तोंडावर एक smile आली. आणि परत एकदा सिद्ध झालं “तो कधीच चुकत नाही “, प्रत्येक वेळेस आपणच चुकतो. Automation नंतर pending असलेल्या SDK project ला सुरवात केली. Automation ने माझा मध्ये काही test केलं असेल तर मात्र माझे Patience.

COM चे assignments successfully केल्या नंतर मला बाकी assignments आणि project करताना काही अवघड वाटल नाही. आणि मी SDK 2018 batch चे सगळे assignments आणि project successfully complete केले.

SDK ने मला काही गोष्टी शिकवल्या, coding चा hands-on experience, patience आणि computer sathi Respect.
COM मधे coding केल्यावर coding करायचा confidence आला.

सरांन कडे शिकत असताना सरांचे Principles शिकलो आणि आता मी ते follow करण्याचा प्रयत्न करत आहे, ते म्हणजे:

1.   Do One Thing, Do it Well,

2.   माझा सगळ्यात आवडता principle, “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.” (Let your code speak),

3.   Never Forget the basics,

4.   जे करा, वेड्या सारख करा

आणि सगळ्यात महत्वाचं books कश्या वाचायचा ते समजल.

आता UNIX ला admission घेतल आहे आणि अजून खूप काही शिकायचं ठरवलंय. SDK चा बऱ्याच concepts इथे Map होयला लागल्यात. 
असो अधिक काय बोलणे..असं बरच काही आहे सरांन बद्दल सांगण्या सारखं ,अर्धविराम देतो आहे..!

LOVE YOU SIR AND ALL ASTROMEDICOMP FAMILY

22


योगेश भरत जाधव

WinRT 2016, UNIX 2016, RTR 2017, RTR 2018 – as a Group Leader, RTR 2021 – as a Group Leader

पंढरीचे भूत मोठे..

पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||

“ बाळ्या तू करणारेस का तो OpenGL चा क्लास, नवीनच सुरु होतोय तो ?”

“ हो मला वाटतंय करावा, कारण आपण तसंही काही करत नाही, सरांसोबत करू काहीतरी. “

“मला नको वाटतोय रे! अधीच UNIX चालूये त्यात फी पण एवढी ठेवलीये. जाऊदे नकोच. ”

“करू रे फी चं काहीतरी, ते  होईल हळू हळू.”

असं हो नाही करत करत आमचं OpenGL  सुरु झालं. त्याला नाव सरांनी ‘Real Time Rendering(RTR)’ असं दिलं होतं. काय असतं  हे OpenGL ? कशाशी खातात ? हे तितकंसं माहित नव्हतं. सरांचे Animation असलेले demo तेवढे बघितले होते याआधी. काहीतरी भारी असेल असं वाटत होतं पण थोडी धाकधूक होतीच. विश्वास आणि आधार एकच होता सर. क्लास सुरु झाला, एक दिवस सरांनी फक्त movies ची नावं आणि music albums ची यादीच सांगितली, आणि सांगितलं ‘हे सगळं पुढच्या १ वर्षात बघायचं आणि ऐकायचं, इथून तुमचं खरं शिक्षण सुरु झालं’. जाम खुश झालो म्हटलं काहीतरी कामाचं वाटतंय हे. सर म्हणायचे, ज्यांना coding  शिकायचंय त्यांना हा क्लास उत्तम आहे, माहित नव्हतं आम्हाला कितपत जमेल. सर अस पण बोलले होते, ‘क्लास १ वर्षाचा असेल आणि प्रत्येक महिन्यातले दोन शनिवार रविवार होईल’,’job guarantee नाही, झालंच तर असलेला जॉब जाण्याची शक्यता जास्त’. ‘कोर्स खूप rigorous असेल. don’t take this lightly’, ‘आज पर्यंतच्या माझ्या सगळ्या क्लास पेक्षा हा क्लास वेगळा असणारे, ह्याची fee पण वेगळी आहे, लग्न झालेले सावधान, सोडचिट्ठीची तयारी ठेवा’, इथपर्यंत सगळं ऐकून झालेलं. असे खूप काही उपदेशाचे डोस पाजून सरांनी क्लास ला सुरुवात केली, ९६ जण आलेले. कसं काय माहित पण सरांकडे बघून वाटायचं नक्की की सरांनी खूप मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे, आणि आपण त्याचे पहिले साक्षीदार आहोत. मैफिलीतला गायक एखादा राग सादर करण्यापूर्वी असतो तसा भास व्हायचा. वेगळं म्हणजे ह्यावेळी सरांनी मॅडम ना समोर आणून बसवलं होतं, विद्यार्थी म्हणून, त्यांचा उत्साह तर केवळ अवर्णनीयच. तसे सर बोलले होते सुरवातीला, ‘महिन्यातले चार शनिवार रविवार माझ्या फॅमिलीचे होते, आता त्यातले दोन तुम्हाला देतो. पण हळू हळू लक्षात आलं, सरांनी ते सगळेच शनिवार रविवार आम्हाला दिले आणि आपल्या फॅमिलीलाच आमच्यात आणून बसवलं.

प्रत्येक weekend एक नवी गोष्ट घेऊन येत होता, Windows वर windowing  सुरु झालं होतं. अचानक सरांच्या डोक्यात विद्यार्थ्यांचे groups पाडून प्रत्येक group ला एक group leader ठरवून द्यायचं आलं होतं. ते group  leaders आमच्याकडून जातीने सगळ्या assignments करून घेतील. मग अभ्यास,संस्कार आणि OpenGL सुरु झालं. अजूनही आठवतं Windowing करता करता OpenGL मध्ये जाणारा bridge सरांनी, ऋतुसंधीकालाचं उदाहरण देऊन इतका सुंदर सांगितला होता, की मी सगळ्या code मध्ये त्या call च्या आधी ‘Bridge to connect OpenGL’ अशी comment लिहिली होती. Windowing नंतर Full Screen चा code सरांनी वर्गात अचानक शिकवला. हातात बघायला code नाही, सगळं काही स्वतः imagine करून लिहायचं होतं. वर्गात code झाला, क्लास सुटला, सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं. तसा थोडा overdose च झाला होता. पण डॉक्टर होतेच सोबतीला. लवकरच त्याचा antidose दिला गेला, परत परत शिकवून. पण त्या एका झलकीत आम्ही जमिनीवर आलो. पुढं काय वाढून ठेवलंय याचा अंदाज आला. हळू हळू एक एक concept संपत होती, एक एक assignment मिळत होती. आता आम्ही dot, line ,triangle, square, color असे basic shapes code नी काढायला शिकलो होतो.

आणि तेवढ्यात मॅडम नी सांगितलं सरांचा पन्नासावा वाढदिवस येतोय ३० सप्टेंबर २०१७ च्या दसऱ्याला, तिथीनुसार. त्यावेळी प्रत्येक group नी एक छोटा प्रोजेक्ट, present करायचा होता, सरांना वाढदिवसाची भेट म्हणून. मग काय, उत्साहात सुरु झाले सगळे. त्याआधी काही जणांनी छोटे छोटे demo आजपर्यंत शिकवल्या गेलेल्या गोष्टींवर बनवले होते . त्याचं एक छोटं प्रदर्शन वर्गात झालं होतं, विशेष म्हणजे त्यामध्ये मॅडम नी सुद्धा एक demo बनवला होता. जे बघून खूप जण भानावर आले आणि आपणही काहीतरी करायला पाहिजे ही भावना जन्माला येऊ लागली होती. अशा सगळ्या लोकांसाठी हा group project ही आयती चालून आलेली संधी होती. मग groups च्या मीटिंग सुरु झाल्या, विषय ठरले जात होते. काही दिवसात हळू हळू सगळ्यांचे projects आकार घ्यायला लागले होते. सरांचा वाढदिवस म्हणून आम्ही सगळ्या groups नी तसेच काही विषय निवडले होते. आमचा विषय होता सरांचे यशस्वी होण्याचे पाच नियम. आमची धावपळ चालली होती आणि प्रत्येक दिवसागणिक उत्सुकता ताणली जात होती, कारण हे सगळं जे चाललं होतं ते सरांपासून लपवून, त्यांना surprise देण्यासाठी.

बहू खेचरीचे रान | बघ हे वेडे होय मन ||

शेवटी तो बहुप्रतीक्षित दिवस आला. त्यादिवशी सगळे जण पारंपारिक वेशभूषेत होते. सरांच्या स्वागताची तयारी झाली होती. सर वर्गात आले, त्यांची खुर्ची त्यांच्या जागेवर नव्हती, ती प्रेक्षकांमध्ये ठेवण्यात आलेली होती, फळ्याच्या वर screen लावली होती. सर थोडे अचंबित झाले असावेत पण त्यांच्यातला कसलेला नट ते चेहऱ्यावर दाखवत नव्हता. एक एक project चं  सादरीकरण झालं. सर कौतुकाने बघत होते, ‘वा वाह’ करून दाद देत होते, टाळ्याही वाजवत होते. पण खोल आत मात्र काहीतरी जन्माला येत होतं. आमचा एकंदर उत्साह आणि आम्ही केलेलं काम बघून सर भारावून वगैरे गेले असावेत, कारण नंतर सरांनी आपल्या भाषणात आमचं खूप भरभरून कौतुक केलं. नंतर त्यांची लाडकी हरिवंशराय बच्चन यांची ‘बुद्ध और नाचघर’ ही कविता म्हणून दाखवली आणि आम्हाला नाटकातले सर बघायला मिळाले. ते दिवस एकदम भारलेले आणि भारावलेले होते. आपल्या कोर्सचं एकदम सार्थक वगैरे झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं होतं. सर मात्र नेहमीप्रमाणे शांतच होते. पुढं काय येऊ घातलंय याचा केवळ त्यांनाच अंदाज होता. कारण आता सुरु होणार होतं ‘Programmable  Pipeline’

जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी |

Programmable  Pipeline, सर सुरवातीपासून बोलत होते अवघड आहे, एकदा घसरलात की सावरणं अवघड आहे. आणि खूप नाही पण आम्ही गाफील होतो. कारण तोवर ‘Fixed  Function Pipeline’ हातात बसलं होतं, त्यामुळे वाटलं की असं काय असणारे वेगळं अजून, पण .. पण .. Programmable pipeline येऊन आदळलंच. code चा आवाका वाढला, assignments चा भडीमार सुरु झाला. बरेच जण धापा टाकू लागले. काहींनी सरळ क्लास ला राम राम ठोकला (अर्थात बरीच वेगवेगळी करणं देऊन). हे आपल्याच्यानी होणार नाही असं लोकांना वाटू लागलं होतं. आणि क्लास गडगडू लागला. बरेच जण वर्गात सरांना आरपार पाहू लागले.  सर मात्र अजूनही खंबीरच होते. सर्वाना धीर देत होते, घसरलेल्यांना सावरत होते. group leaders ना हाताशी धरत होते. हळू हळू सगळे मार्गावर यायला लागले. जे गेले ते कायमचेच गेले, नंतर क्लास कडे फिरकले पण नाहीत. पण जे टिकले आणि करत राहिले त्यांनी मात्र चमत्कार केले. हळू हळू मोठे codes हाताळायची सवय लागली, एका एका error साठी २-२ दिवस घालवायची तयारी झाली. कामाचा व्याप वाढलेलाच होता मात्र त्याची आता सवय झाली. मग आम्ही सगळ्या assignments android वर केल्या, web वर केल्या, mac ,iPhone, linux  सगळीकडे केल्या. assignments बघून तरी वाटायचं आपल्याला जमतंय काहीतरी. दरम्यान एका वर्षात संपणारा कोर्स दीड वर्षावर गेला. ६ महिने वगैरे राहिले असताना सरांनी वर्गात घोषणा दिली, “जसं माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला थक्क केलंत, तसंच surprise द्यायची वेळ आता आली आहे, कुणाला? जगाला !!! जगाला कळू द्या की पुण्यात असा एक क्लास आहे जो सगळ्यांना अवघड वाटणारा विषय मन लावून शिकतोय आणि त्यामध्ये चमत्कार करून दाखवतोय, उत्तम संस्कार सोबत घेऊन.”

तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी ||

सर बोलले आणि परत क्लास मध्ये गदारोळ सुरु, सगळ्या groups च्या meetings सुरु झाल्या, विषय ठरले जाऊ लागले. हा project म्हणजे एक अवघड काम होतं कारण तो Programmable  Pipeline मध्ये करायचा होता. सगळ्यांचे विषय ठरले, सरांनी नेहमीप्रमाणे deadlines दिल्या. विशेष म्हणजे हा क्लास कधी संपणारे- मुळात संपणारे की नाही- आणि हा event होणार कधी हे कुणालाच स्पष्ट नव्हतं. तरी सगळ्यांनी उत्साहात सुरुवात केली होती. आणि लक्षात आलं, सीतेच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलायला गेला आणि तो अंगावर पाडून घेतला, असा रावण झालाय आपला. एक तर हे असं groups नि एकत्र बसून काहीतरी करणं हे सरांच्या स्वभावात नव्हतं आणि त्यामुळं ते क्लास च्या संस्कारातही नव्हतं. बरं coordination हा मुद्दा जरी वगळला तरी महत्वाचा मुद्दा होताच, अंगावर येणारा code. कारण सरांच्या assignments , copy type करायच्या असल्याने तो code आमच्याकडे होता पण आता जर वेगळं काहीतरी स्वतःहून करायचं ठरलं तर पुस्तके उघडून वाचायची गरज होती, आणि मग एक नवीन शिक्षण सुरु झालं.तिथं परत धडपडणं,जमणं, न जमणं सुरु झालं. आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याची कसोटी लागत होती. शिवाय सरांचं शिकवणं आणि assignments चा सपाटा चालू होताच. ह्यातून मग काहींनी सरळ सांगून टाकलं project मधून आम्हाला वगळा, हे प्रकरण अवघड होत चाललंय. मग group leaders नी उरले सुरले गोळा करून खिंड लढवायला सुरुवात केली. सरांची सक्त ताकीद होती ‘Project च्या कामामुळं assignment राहिल्या हे चालणार नाही. आधी assignments मग project.आधी शिक्षण मग event’. project च्या deadlines जशा जवळ येत होत्या तशी सगळ्यांची जागरणं वाढली. ध्यास होता काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा आणि अविरत कष्ट उपसण्याची तयारी पण होती. ह्या वेडापायी काहींनी नोकऱ्यांना राम राम ठोकला, बाहेरगावच्यांचं घरी जाणं कमी झालं. सरांनी वर्तवलेल्या बऱ्याच शक्यता खऱ्या व्हायला लागल्या होत्या. अर्थात सरांसकट सगळेच झपाटले गेले होते. त्रास होताच पण तो प्रसूतीचा होता. सगळ्याच groups मध्ये अशी परिस्थिती होती, काही जण डेंग्यू मधून उठून काम करत होते, कुणी आपली लहान मुले सांभाळत करत होते , कुणी हॉस्पिटल मधून काम करतंय, कुणाचे वडील गेल्याची बातमी देखील याच काळात आली. भावभावनांचे कल्लोळ सगळीकडूनच उठत होते, एकमेकांना धीर देत,सांभाळत सगळेजण वाट चालत होते. आता मात्र सगळे group एकमेकांशी घट्ट बांधले गेले होते. एक मात्र खरं, ध्येयवेड्या (खरं तर वेड्याच!) मास्तर नी आपल्या विद्यार्थ्यांना पण कामाचं वेड लावलं होतं. अर्थात ही तपश्चर्या ज्यांना जमली त्यांनाच वेदनेतून कळणारा वेदांचा अर्थ जाणवला.

अशाच सगळ्या धावपळीत तो दिवस आला, तो होता ३० सप्टेंबर २०१८, मागच्या वर्षी ह्याच दिवशी सरांच्या मनात जन्माला आलेली कल्पना आज बरोबर एक वर्षानी मूर्त रूप घेऊन आली होती. एक एक करत सगळ्या projects चं प्रदर्शन झालं. टाळ्यांच्या गजरात आमच्या दीड वर्षाच्या कष्टाला दुजोरा दिला जात होता. बाकी groups चे demo बघून अजून आपलं काय काय करायचं राहिलं आहे हे कळत होतं.  एकीकडे आपण केलेल्या कष्टाची पावती मिळत होती तर दुसरीकडे अजून काय काय करायचं बाकी आहे हे लक्षात येत होतं. प्रत्येकाचीच अवस्था event च्या शेवटी आम्ही म्हटलेल्या श्लोकातील वर्णनाप्रमाणे झाली होती. संपुर्णातून काहीसा अपूर्णतेचा अनुभव.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते |पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||

क्लास  संपला. मला भयानक रिकामपण यायला लागलं होतं. facebook आणि watsapp वरचे लोकांचे status आणि त्यातून दिसणारी त्यांची ‘Pretending life’ बघून तर जास्तच भीती वाटत होती, आपणही असेच होऊन जाऊ काही दिवसात. क्लास परत करण्याची सरांची युक्ती पण ह्यावेळी वेगळी होती, “फक्त group leader बनूनच क्लास repeat करता येईल आणि प्रत्येक lecture ला attendence compulsory.” पुन्हा पुढचं दीड वर्ष!! आलेल्या रिकामपणावर हा जबरदस्त उपाय होता पण आता जबाबदारी जास्त होती, आणि घर ? त्याकडे तर मागचे दीड वर्ष दुर्लक्षच झालं होतं. मग सगळ्यांशी चर्चा सुरु झाल्या, सगळ्यांनीच वेड्यात काढलं, ‘वेडा झालास का?’,’किती दिवस नुसताच क्लास करणार?’ इथपासून ते ‘लग्नबिग्न करायचंय का नाही, म्हातारा होऊन जाशील’ इथपर्यंत सगळं ऐकून झालं. पण का काय माहित जितका विरोध होत होता तितकाच माझा निर्णय पक्का होत होता, आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं माझं घर, माझी फॅमिली, आई वडील. शेवटी त्यादिवशी रात्री २ वाजता बाळ्याला message केला, “माझा निर्णय झालाय..”

तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||

– योगेश

21


Shashi Bagal

SDK 2013, UNIX 2013, WinRT 2015

 

20


Suvrat Apte

SDK 2016, UNIX 2016, RTR 2017

प्रिय, आदरणीय, सर,
Computer Fundamentals चं सेमिनार केलं आणि एके काळी “मी Windows वगैरे असल्या गोष्टी वापरत नाही. मी Linux user आहे.”, असं म्हणणाऱ्या मी, डोळे मिटून Win32 च्या class ला admission घेतली. Cancer cell असल्याची जाणीव झाली होती; अजून आहे. खरं सांगायचं तर computer क्षेत्र हे पाश्चात्य असल्यामुळे या क्षेत्रात कोणी “गुरू” असेल अशी अपेक्षा तर सोडाच, कल्पना पण केली नव्हती. पहिल्या दिवशी class ला आलो. भारतीय बैठक. मुलं गर्दी करून मांडी घालून बसलेली. हे दृश्य सवाई गंधर्वच्या भारतीय बैठकीसारखा वाटलं. समोर एखाद्या कलाकाराचा solo होईल एवढी जागा सुद्धा होती. इथे सर computer कसा काय शिकवतात हे काही केल्या कळत नव्हतं. पाहिलं lecture संपलं तेव्हा कळलं की इथे सर computer शिकवायचा solo च सादर करतात. पहिली 3 lectures झाली आणि computer मध्ये गुरु मिळाल्याचं फार मोठं समाधान मिळालं; MS करायचा plan cancel झाला. भारतीय शिक्षण पद्धती ला नावं ठेवणारे खूप लोक पाहिले होते (मी सुद्धा त्यातलाच एक), पण ती शिक्षण पद्धती सुधारचयचा प्रयत्न करणारा माणूस मात्र पहिल्यांदाच पहिला. सध्या जर मला कोणी विचारलं कि “MS करायचा काही plan नाही का?”, तर मी सांगतो, “बाजीराव रोडला एक one man university आहे, तिथे MS करायचा plan आहे”.
पण सर, माझ्या इतर गुरुंमध्ये आणि तुमच्यामध्ये एक खूप मोठा फरक आहे. बाकी गुरूंनी मला बरयापैकी advanced level चं यायला लागल्यावरच accept केलं. तुम्ही मात्र आम्हा सर्वांना जसे आहोत तसे accept करता. त्यामुळे तुमच्याच कडे grooming आणि तुमच्याच हाताखाली advanced training असं एक unique combination होतं. जगामध्ये असं दुसरीकडे कुठे होत असेल असा नाही वाटत. तुमच्या मुळे माझी computer कडे बघायची दृष्टी पूर्ण पणे बदलली. Computer कडे एक “सजीव” म्हणून बघायला तुम्ही शिकवलंत. त्याला त्रास नं देता programming करावं हा विचारच नव्हता केला कधी. Programming ही एक कला आहे हेही तुम्हीचं शिकवलंत. आता जेव्हा मी “अल्लाउद्दीन खान”, “रवी शंकर”, “झाकीर हुसेन” हे लोक १८-१८ तास रियाझ करायचे असं ऐकतो, तेव्हा, “आमचे गोखले सर सुद्धा २० तास computer चा रियाझ करतात” हि गोष्ट मनात आल्याशिवाय राहात नाही. तुमच्या मुळेच मला programming च्या रियाजाची गोडी लागली व तबल्या प्रमाणेच computer उघडताना त्याला नमस्कार करून उघडायची सवय झाली. सर, Win32 चा class संपल्यावर मी माझ्या तबल्या च्या group मधल्या मित्रांना म्हणत होतो, “सर म्हणजे माझ्यासाठी computer मधले झाकीरभाई आहेत.”. पण UNIX ची बॅच झाल्यावर मात्र “सर computer मधले झाकीरभाई आहेत” का “झाकीरभाई तबल्यातले गोखले सर आहेत” असा प्रश्न पडला आहे!

ऑफिस मध्ये तुमच्या बद्दल सांगितल्यावर माझा एक मित्र खूप छान वाक्य बोलला होता, त्याने शेवट करतो. “बाबा आमटेंनी जसं “आनंद वनात” कुष्ठ रोग्यांना बरं केलं, तसंच गोखले सर “आनंद आश्रमामध्ये” technical कुष्ठ रोग्यांना बरं करत आहेत!”
सर, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या जन्मात नक्कीच खूप चांगलं काहीतरी केलं असलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला तुमच्यासारखा गुरु मिळाला!

19


Abhijeet Deshmukh

UNIX 2016

माझे नाव अभिजीत देशमुख. 8+ वर्षांचा Experience. तुमचा विद्यार्थी होण्याचे भाग्य Feb-2008 मध्ये Sunbeam,Pune येथे DAC ला असताना मिळाले. ज्ञानाची गोडी तुमच्या कडून शिकायला मिळाली.
Job मिळाल्यानंतर मित्र व नातेवाईक जे B.E. passout होऊन job शोधात होते त्यांना तुमच्या बद्दल व Sunbeam बद्दल सांगुन DAC ला ऍडमिशन घेण्यासाठी मदत केली. उद्देश एकाच होता कि त्यांनी तुमचे विद्यार्थी होऊन ज्ञानार्थी व्हावे.
असे जवळपास ५-६ जणांनी मग DAC ला admission घेतले व आज ते सर्व Well settled आहेत. ऑफिस मध्ये काम करताना शिक्षण क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून Pune University साठी “External Examiner” म्हणून पण काम करतोय.
“External Examiner” म्हणून काम करताना बऱ्याच Colleges ला भेट दिली. तेव्हा एक गोष्ट लक्ष्यात आली कि Industry ला अपेक्षित असे विद्यार्थ्यांचे knowledge आणि विद्यार्थ्याला असलेल्या knowledge या मध्ये खूप तफावत आहे. Colleges म्हणजे concentration camp हे अनुभवले. हि स्थिती पुण्यातील colleges ची. पुण्याच्या बाहेरील colleges ची स्थिती न सांगण्यासारखीच. हि परिस्थिती पाहून मनात चलबिचल सुरु झाली कि अशी परस्थिती बदलण्यासाठी आपण थोडा तरी काडीचा हातभार लावावा. पण कसे ते कळत नव्हते. पैसे केवळ donate करून आपले समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण होत नाही हे एव्हाना समजले होते. अश्या पारिस्थितीत तुमच्या Unix,2016 च्या class ची date समजली व class join करायचे ठरवले. सोबत चुलत भाऊ हर्षद (MCA – 1st Year, MIT Kothrud ) व मित्र वैभव झोडगे यांना विचारले आणि आम्ही तिघांनी class join केला.
Unix class ला आल्यावर जस जसे तुमचे विचार कानावर पडू लागले तस तसे मन शांत होऊ लागले. Unix ची व्याप्ती पाहून Computer ची नव्याने ओळख होऊ लागली. Fundamental गोष्टीचे ज्ञान मिळत असताना ते केवळ आपल्या पुरते मर्यादित न ठेवता ते इतराना हि दिले पाहिजे असा विचार मनात सुरु झाला. जेव्हा तुम्ही सांगितले कि शिक्षक व्हा तेव्हा पक्के केले कि आपण पण शिक्षक होऊन ज्ञानाचा प्रचार केला पाहिजे व त्या दृष्टीने सुरवात केली. Office मध्ये जे विद्यार्थी नवीन join होऊन support चे काम हेच सर्वस्व मानू लागले त्यांना coding चे महत्व पटवून development project कडे वळवायला सुरवात केली. त्या मधील बऱ्याच जणांनी आता coding ला सुरवात केली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेरणेतुन अजून एक विचार मनात आला कि “Computer Fundamental” चे session घ्यायचे ते पण थेट दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी, कुठलेही शुल्क न घेता.
“Computer Fundamental” session चे content बनविले व त्यासाठी तुम्ही घेतलेला seminar चा आधार घेतला. दहावीचा वर्ग जाणीव पूर्वक निवडला. कारण कोवळ्या मनावर चांगले संस्कार झाले तर त्याचा परिणाम हा अधिक चांगला असेन असे वाटले. दहावीच्या विद्यार्थ्यांना Computer सारखा विषय केवळ File create करण्यापुरता मर्यादित ठेवला तर त्यांना त्या विषयाची गोडी लागणार नाही. पण जर त्यांना थोडे जास्त knowledge दिले तर ते त्या विषयाचा आनंद घेऊन शिकू शकतील अशी अशा वाटत आहे.
असे session, 22 मे, 2017 ला ज्या शाळेत मी शिकलो त्या बीड शहरातील “चंपावती विद्यालय” मध्ये घेतले. Summer vacation साठी आलेली 60-70 विद्यार्थी व 5 शिक्षक (जे माझेही शिक्षक होते) अशा जनसमुदाया समोर शिकवायला सुरवात केली. Session च्या सुरवातीला Lord Macaulay चे सन 1835 मधील भारतीय शिक्षण व्यवस्थेवर विचार सांगून session मराठी मध्ये घेण्याचे कारण सांगितले. Human body चे व Computer चे interrelation कसे आहे, मानवी पंचेंद्रिये व Computer चे input devices सारखे कसे आहेत, मेंदू मधील nervous system ला व computer ला current च का लागतो असे एक एक मुद्दे सांगत गेलो. जस जसे session पुढे जात होते तस तसे विद्यार्थ्यांचे चेहरे अधिक बोलके होऊ लागले. “Knowledge is inter-related” हे सांगायला विसरलो नाही. जेव्हा microprocessor मधील pins ह्या सोन्याच्या असतात हे सांगितले तेव्हा विद्यार्थ्यांचे डोळे वेगळेच चमकले. विद्यार्थ्यांचा खूप छान response मिळाला. Session ला बसलेल्या एका शिक्षकाची प्रतिक्रिया बोलकी होती. ते म्हणाले कि “आज परेंत computer हे फक्त machine म्हणून पाहत होतो आता त्याला मनुष्य म्हणून पण पाहीन.” शिकवण्याचे समाधान तेव्हा अनुभवले.
हे सगळे शक्य झाले ते केवळ तुम्ही केलेल्या संस्कारामुळे. ह्या पुढेही जसे जमेल तसे असे session घेत राहण्याचा मानस आहे. त्यासाठी गरज आहे ती फक्त तुमच्या आशिर्वादाची व मार्गदर्शनाची..!!

18


Chaitanya Bapat

UNIX 2016, WinRT 2017

आहेत एक गोखले,
UNIX शिकवतात खास ।
विचार सुरू होतो मग,
लावावा का त्यांचा क्लास ?
स्वतः आहेत डॉक्टर,
अन् शिकवतात मात्र कंप्युटर ।
आपण आहोत इंजिनियर,
मग करावी का त्यांची लेक्चर ?
कंपनीतील उन्मत्त आम्ही,
उडवतो मग त्यांचा उपहास ।
चिडून एखादा माजी विद्यार्थी,
मग सांगी त्यांचा जीवन प्रवास ।।
ऐकून तो सार प्रवास,
मग बसतो थोडा फार विश्वास ।
ठरते शेवटी एकदाचे,
लावूया सरांचा UNIXचा क्लास ।।
प्रवेशासाठी येता,
दिसते विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ।
आम्हीही जावून लावतो,
त्या गर्दीत आमची पण वर्दी ।।
वेळ येता प्रवेशाची,
चेक फाडतांना येई जिवावर ।
” न आवडल्यास पैसे परत “,
कळता आनंदास न राही पारावार ।।
प्रवेश घेऊन झाल्यावर,
जमतो आम्हा मित्रांचा कट्टा ।
हळूहळू सूरू होते मग,
मॅडमनी दिलेल्या सूचनांची थट्टा ।।
माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा,
ओढवतो आमच्यावर प्रकोप ।
वातावरण तापायच्या आत,
आम्ही घेतो एकमेकांचा निरोप ।।
उगवतो तो दिवस,
अन मग सूरू होतो क्लास ।
पहिले चार पाच दिवस,
सगळ्यांनाच भयंकर त्रास ।।
कुणाच्या पायाला मुंग्यां,
तर कुणाचा गुदमरतो श्वास ।
थक्क होती मात्र सारे,
ऐकून सरांचा जीवन प्रवास ।।
तरीही काही शहाण्यांना,
सरांचे चरित्रगान वाटते वटवट ।
आशेवर असतात बिचारी,
संपतीलच ही सहा लेक्चर्स पटपट ।।
शेवटी पूण्यातलेच गोखले ते,
का शिकवतील सहा लेक्चर्स तरी फुकट ?
असा विचार करतो मग,
पुण्यातल्याच पेठेतील मी एक बापट ।।
शेवटी सुरू होते UNIX,
HISTORY पासून होते सुरूवात ।
उलगडती Algorithms,
होते रोमॅन्टिक वाक्यांची बरसात ।।
कधी कौतुकाची थाप,
अन् टिंब टिंब टिंब तुन अनंत आशीर्वाद ।
शरण जाती मग सारे,
System ला अन् सरांना निर्विवाद ।।
प्रत्येक Concept साठी,
असते आयुष्यातील एक कथा ।
fork नंतरचे exec सांगी,
गिटार खाजवणाऱ्यांच्या बापाची व्यथा ।।
critical section म्हणजे,
बँकेतून आलेल्या फोनवरच बोलणं ।
त्यात आलेला interrupt,
म्हणजेच आतून बायकोचं कोकलणं ।।
रंगून जाती यात सारे,
पठडीतील नाही ही शिकवणी ।
जशी तुक्याच्या मुखाने,
ऐकावी अजरामर अभंगवाणी ।।
जसे कुरुक्षेत्री अर्जुनास,
गीता रहस्य उलगडी चक्रधर ।
तसेच सर्व विद्यार्थ्यांस,
UNIX मधुन होई साक्षात्कार ।।
मिळवू असेच ज्ञान सुक्ष्माचे,
टाकूनी आपल्यातले स्थूल ।
देऊ खरी गुरुदक्षिणा,
ठेवून त्यांच्या मार्गावर पाऊल ।।
घडवू आपल्यातील शिक्षक,
वाढवूनी ज्ञानभंडार हे विपूल ।
मिळूनी आपण सारे,
अखंड चालवूया हे गूरूकूल . . .

17


Rameshwar Kawale

UNIX 2015

शिक्षक : विद्यार्थ्यांनो, तुम्ही Engineering ला admission कशासाठी घेतलात..?
विद्यार्थी : सर, आम्हाला नवीन technology शिकण्यात interest होता म्हणून..
शिक्षक : साफ खोटं. तुम्ही admission यासाठी घेतलंत कारण तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे. आणि हेच सत्य आहे. आपल्यातल्या प्रत्येकाने उच्च शिक्षण हे आणखी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठीच घ्यावे.
हल्ली बर्याचश्या शाळा, कॉलेजांमधला हा नेहमीच संवाद. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे ठासून भरलं जातं की, त्यांचा शिक्षण घेण्यामागचा केवळ उद्धेश नोकरी मिळविणे हाच आहे. कोणीही विद्यार्थीदशेत असताना ओल्या मातीसारखा असतो, तर शिक्षक व आईवडील हे त्या कुंभारासारखे. बिचारी ओली माती तसाच आकार घेत जाते जसा एक कुंभार तिला देत असतो. आम्हाला लहानपणापासूनच शाळा,कॉलेजात अन घरी शिकवलं जात की ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स तोच सगळ्यात हुशार. ज्याला जेव्हडे चांगले मार्क्स, त्याला तेव्हडी चांगली Company मिळणार. अशा परिस्थितीत आम्हा विद्यार्थ्यांना कमी कष्टात उत्तम मार्क्स मिळविण्यासाठी एकच मार्ग सापडतो अन तो म्हणजे रट्टा मारणे. रट्टा मारून चांगले मार्क्स घेतलेला हा विद्यार्थी शेवटी एक विद्यार्थी न राहता बनतो फक्त एक यंत्रमानव.
बरं, अश्या यंत्रमानवांचं आमच्या शिक्षकांना खूप कौतुक. कंपन्यांमध्येही या यंत्रमानवांना भारी मागणी. तसंही, आजकालच्या IT क्षेत्रातील नोकऱ्या ह्या नोकऱ्या न राहता बनल्यात फक्त गुलामगिरी. आणि आपली आजची शिक्षण पद्धती असे गुलाम बनविण्यात आता चांगलीच पटाईत झालीये.
लोकमान्य टिळक एकदा बोलले होते की आपल्या शिक्षण पद्धतीतून नुसते नोकऱ्या मिळविण्यासाठी धडपडणारे गुलाम तयार न होता राष्ट्रप्रेमाने भारलेले युवक तयार व्हावेत. त्यांचे हे विचार ऐकल्यानंतर मला आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीची कीव करावीशी वाटते. राष्ट्रप्रेमाने भारलेले युवक तर सोडाच पण साला कोणी या देशात थांबायला देखील तयार नाहीये. जो तो आज बाहेर जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळविण्याची भाषा करतोय. देशातील घडामोडी अन देशासमोरील समस्या यांच्याशी कोणाला काही घेणदेणंच राहिलं नाहीये. आज प्रत्येकजण देशाच्या system ला शिव्या घालताना दिसतो. पण या system मध्ये जाऊन हे सगळं बदलण्याची कोणाचीही इच्छा दिसत नाहीये.
या सगळ्या परिस्थितीसाठी आजचा शिक्षक हाच बऱ्याच अंशी जबाबदार आहे. जर सगळ्या देशाला बदलण्याची ताकद कोणा एका व्यक्तीकडे असेल तर तो म्हणजे शिक्षक. एका शिक्षकाने ठरवलं तर कौटिल्यासारखा तो एका संपूर्ण राष्ट्राचं निर्माण करू शकतो.
जेंव्हा इंग्रज लोक भारतात आले तेंव्हा त्यांनी आपल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला होता. त्यांच्यातल्याच एका Lord Macaulay नावाच्या गोऱ्या साहेबांचं हे वाक्य – “जर भारताला गुलाम बनवायचं असेल, तर सगळ्यात आधी भारताच्या शिक्षण पद्धतीला गुलाम बनवायला पाहिजे.” Macaulayism नावाने ही policy प्रसिद्ध आहे. आज इंग्रजांना देशातून जाऊन 65 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय. पण आपली शिक्षण पद्धती आजही त्यांचीच गुलाम बनून राहिली आहे.
अशा वेळी कोणीतरी एक शिक्षकच (डाॅ. गोखले सर) ‘Undoing Lord Macaulay’ नावाचं Mission हाती घेतो अन स्वतःच्या शिकवणीतून आणखी असेच शिक्षक तयार करण्याची भाषा करतो तेंव्हा कुठेतरी मला आशेचा एक किरण नजरेस पडतो.

16


सचिन भद्रशेट्टे

UNIX 2016, RTR 2017

दोन शब्द कालच्या सेमिनार बद्दल

नमस्कार सर,
मला कालच्या कॉम्पुटर Fundamentals बद्दल थोडासा Share करायचं आहे.
काल सेमिनार ला माझ्या सोबत अजून ३ जण होते. तिघेजण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड चे होते. त्यांना मी आपल्या सेमिनार बद्दल काय वाटलं असं विचाले असता त्यांनी मला काही अशी प्रतिक्रिया दिली.
१. Pawan Sangale, (Second Year, BE – CS), M S Bidve Engineering college Latur.
हा माझ्या जवळच्या मित्राचा लहान भाऊ, तो सतत मला काही ना काही pudhil शिक्षणाबद्दल विचारात असतो. आपला सेमिनार तारीख ठरली न मग मी याला कळवले कि सरांचा सेमिनार आहे, न मग मी आपल्या सेमिनार ची लिंक पाठवलो, बाकी यायचा न यायचा निर्णय हा त्याचा होता, पण त्याने आपल्या site through गेल्यावर यायचं ठरवलं.
सेमिनार च्या पहिल्या दिवशी, सेमिनार सुरु होण्या आधी सकाळी त्याने मला त्याच्या सोबत चा किस्सा सांगितला, झालं असं कि त्यांना एक विषय शिकवायला मॅम होत्या, त्यांच्या एक टॉपिक नव्हता समजला तर याने त्यांना डायरेक्ट क्लास मध्ये सगळ्या समोर बोलला कि मला काहीच नाही समजला वगैरे (याने जास्त प्रयत्न pn केले नव्हते तो विषय समजण्या साठी).
पण आपला सेमिनार अटेंड केला न मग त्याला त्याने केलेली चूक समजली. त्याने फक्त एका वाक्यात मला बोलला कि आता कुठ्लापण विषय नाही समजला असं बोलायचंच नाही, जेवा असं बोलू तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचं “तू स्वतः किती प्रयत्न केला ते समजून घ्यायला?”. कालचा सेमिनार त्याच्या साठी Life चा Turning पॉईंट होता.
२. Vaibhav Ghatkar (Third year electrical, Babasaheb Ambedkar Technical Univercity, Lonere)
खरतर याला कॉम्पुटर बद्दल काहीच जास्त माहिती नाही न जास्त आवड पण नाही, हा माझ्या मित्राचा मित्र, नंतर आमची मैत्री झाली. याला याच्या मोठ्या भावा साठी सेमिनार ची माहिती हवी होती, कारण याला माहित होत कि मी आपल्या Unix Chya क्लास ला येतो. म्हणून मग मी आपल्या सेमिनार ची लिंक याला पाठवली, काही कारणांमुळे bhawa ला तर जमाल नाही पण याने पूर्ण site वाचली न मग ठरवलं कि यालाच तो सेमिनार करायला हवा. तो आला , सेमिनार अटेंड केला, न त्याला खूप आवडला, खूप काही गोष्टी ज्या कधीतरी ऐकले होतो त्याला क्लिअर झाल्या त्याला.
त्याने जात जात एक वाक्य बोलला “कॉम्पुटर च्या गोष्टी तर शिकलोच पण कुठलाही विषय, त्याला कसा शिकायचं हे मी शिकून जातोय”.
त्याने अजून एक mazya बोलला कि “तू दिवसभर ऑफिस करून आल्यावर पण क्लास करतो, मग थकत का नाही हे आत्ता समजलं.”
३. माझा लहान भाऊ राहुल भद्रशेट्टे, तोच जो Bsc Electronics, malloc function न लिहिलेला. खरंतर त्याने अजून एकपण C program नाही लिहिला. त्याला C शिकायचं होत पण मला समजत नव्हतं त्याला शिकवायला कुठून न कस सुरु करू. पण मग Unix Batch जॉईन केलो न मला थोडाबहुत सुचायला लागलं कि कस न कुठून सुरु करू ते, न त्यात मग आपला हा सेमिनार ची date fix झाली, त्याला मी त्याच नाव Enroll केलो, कारण मला माहितीय कि त्याला तुमच्या मार्गदशनाची गरज आहे. तुम्ही जे संस्कार आमच्यावर करताय ते त्याला मिळणे गरजेची आहे. न नक्की काल तेच झालं. मला काल ते जाणवला. काल त्याने आल्यावर मला स्वतःहून विचारला कि सांग आता CD boot कशी करायची, सुरुवात त्याने केली न मी मदत केलों, न मग नंतर मी त्याला दाखवली कि बूट option कुठे असतो. काल त्याला दिशा भेटली कि काय करायचं न काय नाही करायचं. सुरुवात तर झालेली मला दिसत आहे. आता तो दिवा तेवत ठेवायची जीम्मेदारी मझी न मी ते करतो सर पूर्ण.
काल माझ्या लहान भावाला सोबत घेऊन आलो न मला त्याला थोडा जवळून ओळखायचा चान्स भेटला.
तुम्ही या तिघांच्या समोर एक Role model म्हणून थांबलात हे जाणवलं मला काल.
मी ज्या उद्देशाने या तिघांना बोलावले होतो तो उद्धेश पूर्ण झाला. म्हणजे सुरुवात झाली हे नक्कीच. याना अजून तुम्ही जे संस्कार आमच्यावर करताय त्या संस्काराची गरज अजून खूप आहे, पण तीघे pn पुण्या बाहेर राहतात म्हणून थोडावेळ थांबावं लागेल यांना.
चौथा मी स्वतः सचिन भद्रशेट्टे (मी Sunbeam कराड, August 2012 चा विद्यार्थी), मी इतके दिवस कॉम्पुटर फील्ड मध्ये काम करतो पण खूप काही dots काल जुळल्या माझ्या. मी गोष्टी match करायला शिकतोय. मला खरतर सांगायचं झालं तर मला सतत पडणाऱ्या प्रश्नच उत्तर mla भेटल्या, एखादा प्रोग्रॅम रन केल्यावर तो CPU पर्यंत कसा पोहोचतो हे मला Kal समजला. बिट म्हणज काय असत हे समजल्यावर लाज वाटली मला कारण मी काम करतोय कॉम्पुटर मध्ये न मला हि गोष्ट माहित नव्हती. माझी चूक हि होती कि मी fundamentals सोडून labour वर्क करत होतो. मी नक्कीच हि गोष्ट सुधारिणं. Kal दोन दिवसात khup काही अशे incidents झाले ज्यामुळे मला स्वतःला सुधारायची गरज आहे हे समजलं. न मी नक्की सुधारिणं. मला माझ्यात होत असलेले सकारात्मक बदल हे मला जाणवत आहेत. तुम्ही सांगितल्या पासुन JAVA API documentation रेफेर करतोय, त्याची मजा खरंच वेगळी असते हे समजलं. प्रयत्न करतोय कि StackOverflow कमीत कमी वापरेन. न एक दिवस बंद करिन. ना इलाजाने कधी कधी वापरतो (सवय झालेली), काम लवकर डिलिव्हर करायचं असत म्हणून. पण तीपण सवय बंद होईल लवकरच. आता जर कधी ओपन केलीच ऑफिस मध्ये तर मनात ek भीती असते कि सर कुठून पाहत तर नाही ना. मला बुक्स वाचण्याचा खूप जास्त कंटाळा होता व आता हळू हळू तीपण सवय लागत आहे. मला kharach खूप छान वाटत आहे हे माझे बदल पाहून. सर कधी चुकलं तर तुम्ही माझा नक्की कान ओढा. मला माझे शाळेतील शिक्षक आठवतात. मला परत शाळेत gelyachi फीलिंग येते.
माझा दिवसभराचा थकवा उडून जातो क्लास मधील तुमचा पहिला शब्द सुरु होतो तेवा. माझ्या ऑफिस मधील मित्र पण म्हणतात कि कसा काय तू क्लास करतो दिवसभर ऑफिस झाल्या नंतर मग मी त्यांना म्हणतो, “तू भी आजा, तुझे पता चलेगा”.
“जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही” हे खरंच समजायला लागलं सर. मी नक्की त्या दिशेने माझे प्रयत्न शिरू ठेवेन.
जेवा पण Unix क्लास मध्ये प्रश्न पडतो तेव्हा मी स्वतःला समजावतो “Don’t panic, everything will be clear in future”.
काही लिहिण्यात माझी चूक झाली तर मला माफ करा.
आपला आज्ञाधारक,
सचिन भद्रशेट्टे

15


ओंकार शिंदे

UNIX 2015, WinRT 2016, RTR 2017

जेव्हा मी क्लास बद्दल ऐकलं तेव्हा मी engineering च्या शेवटच्या वर्षाला होतो आणि मला माहित होत की माझे engineering चे तिन्ही वर्ष वाया गेले आहेत, तरी नशीब डिप्लोमा झाल्यामुळे काहीतरी कोडींग ची सवय होती. आणि तेव्हापासून मग मी competitive programming सुरु केली. सुरुवातीला जरा खूपच अवघड वाटायची. पण नंतर आवडायला लागली पण वर्षभरानंतर मला कळलं की माझी प्रोग्रेस खूपच slow आहे आणि त्याचा कारण हि समजलं. कारण फक्त एकच होतं माझं प्रोग्रामिंग च “बेसिक”. आणि मग जाणीव झाली की आपलं बेसिक खूपच weak आहे. मग सुरु झालं की एक चांगल पुस्तक शोधायच ज्यानेकरून Data structure आणि algorithms चांगला होईल. शोधायला हि जास्त वेळ नाही लागला कारण algorithm म्हंटलं कि एकच दादा पुस्तक डोळ्या समोर येतं आणि ते म्हणजे (Introduction to Algorithms by Thomas H. Corman, Charles E. Leiserson, Ronald L. Rivest, Clifford Stein) तेव्हा मला Thomas H. Corman ह्या एकाच ऑथर चे नाव माहित होते. त्याचे रिव्हिव नेट वर बघितले सर्वांनी लिहिलं होता की पुस्तक जरा समजायला अवघड आहे पण भारी आहे. पण ठरवलं होतं की Basic पासून करायचा तर अवघड पासूनच करू, मग काय घेतला पुस्तक पहिला Sorting चा chapter सोपा वाटला कारण ते आधी पासून माहित होता म्हणून, पण नंतर नंतर आपोआप मी त्या पुस्तकापासून लांब राहायला लागलो. स्वतःला काहीतरी कारणं देत मी ते पुस्तक टाळायला लागलो. कारण एवढ्या जाड पुस्तकाची सवय नव्हतीच कधी.
तेव्हा समजला हे पुस्तक वगैरे आपल्या कडून काय होत नसतं. आणि आता ह्यावर क्लास हा एकमात्र उपाय. हे मी सगळं माझ्या एका मित्रा बरोबर शेअर करायचो. तोही माझ्या सोबत डिप्लोमा ला होता आम्ही दोघांनी एकत्रच प्रोग्रामिंग सुरु केली होती. त्याचीही परिस्तिथी माझ्यासारखीच होती कारण तोही engineering लाच होता. त्यालाही माझा मुद्दा पटला. मग तेव्हा आम्ही ठरवलं की क्लास लावायचा. Engineering करून तशीही वाट लागलीच होती म्हंटलं कुठे तरी क्लास लावून जॉब साठी काहीतरी तयारी करून ठेवू. ह्याला योगायोग म्हणावा कि काय माहित नाही पण ह्या क्लास लावायच्या काळातच त्या मित्राने UNIX च्या क्लास बद्दल सांगितले. त्याने हेही सांगितले की क्लास खूप भारी दिसतोय कारण ऍडमिशन साठी स्टुडंट्स पहाटे पासूनच लाईन लावतात. हे मी अस काहीतरी पहिल्यांदाच ऐकलं होतं आणि हे त्याला त्याच्या मित्राने सांगितलं होतं. मग त्याने मला UNIX च्या ड्राफ्ट ची लिंक शेअर केली. खरंच सर तो ड्राफ्ट खूपच भन्नाट होता आणि तो ड्राफ्ट पूर्ण वाचून झाल्यावर मी त्याला लगेच कळवले कि मी क्लास जॉईन करतोय. आणि आम्ही तीघांनी क्लास जॉईन करायचा ठरवलं.
मला तारीख नीट आठवत नाही आहे पण ६-१२-२०१५ तारीख हीच असावी आम्ही तिघं ऍडमिशन साठी आनंदाश्रम मध्ये आलो. तिथे आमची मॅडम शी ओळख झाली. मग मॅडम ने सगळे भारी नियम सांगितले. तो उठाबाश्या वाला तर खरंच खूप भारी होता. एकंदरीत सरांच्या त्या ड्राफ्ट आणि क्लास च वातावरण बघून काहीतरी वेगळं आणि भारी शिकायला मिळणार होता हे नक्की. आणि मॅडम खरंच तुमचा स्वभाव खूपच गोड आहे. आणि तो हसरा चेहरा मी कधीच विसरणार नाही. ऍडमिशन करून आल्यावर माझी क्लास च्या पहिल्या दिवसासाठी उत्सुकता खूपच वाढली आणि तो दिवस आला, ड्राफ्ट मध्ये लिहिल्या प्रमाणे पहिले ६ लेक्चर सर introduction घेणार होते. सरांच पहिलं लेक्चर ऐकलं आणि अक्षरशः मी सरांच्या प्रेमात पडलो, काय होते ते लेक्चर आजही ते लेक्चर ची रेकॉर्डिंग ऐकली कि अंगावर काटा येतो. अश्याच एका लेक्चर मध्ये सर सांगत होते की त्यांना त्यांच्या आयुष्यातलं प्रोग्रामिंग च पहिलं पुस्तक एका देवमाणसाने दिलं आणि त्यानंतरचा हे सरांचा ते वाक्य, तर वाक्य असा होतं “तुम्हाला सांगू देव असा भेटतो. ह्या जगा मधे देव आहे की नाही असा प्रश्न जेजे विचारतात आणि जेजे नास्तिक लोकं आहे ना त्यांनी हे जाणावा कि देव सोंडेत किंवा हत्तीच्या काना मधे नाही आहे, देव मारुतीच्या शेपटीत नाही आहे, देव तीन तोंडाच्या दत्तात नाही आहे, देव हा कुठेतरी माणसातच आहे, माणसातलाच एखादा दुसऱ्याला मदद करण्यासाठी म्हणून स्वतःच्या बेंबीच्या देठापासून काहीतरी करतो तेव्हा त्याला देव म्हणतात.” आणि हे माझं आजचं वाक्य “देव खरंच आहे” मला सरांच्या आणि मॅडमच्या रूपात मला देव भेटले. आणि त्या देवाकडून मी दैवी UNIX, Win32, COM आणि WinRT शिकलो हे माझं खरच सौभाग्य आहे.
मग काय सुरु झाला UNIX, UNIX च्या रूपात सर आमच्यावर संस्कार देत होते आणि आम्ही ते घेत गेलो. “Files have spaces and processes have life.”, हे एक वाक्य महान UNIX बद्दल सर्वकाही सांगून जातं. सर UNIX शिकवत असताना सर कधी कधी movies ची नांव सांगतात, सर म्हणतात की ह्या movie मधलं हे हे बघा तुम्हाला हे अजून चांगलं कळेल. ती सगळी नावं मी लिहून घ्यायचो आणि घरी आलो की डाउनलोड ला लावायचो. आणि मग जसा वेळ मिळेल तशी बघायचो. खरं सांगतो सरांनी जेवढे movies सांगितले होते त्यापैकी बोटावर मोजण्याइतपतच मी बघितले होते. आणि मग तेव्हा तेव्हा मी विचार करायचो कि मी नक्की एवढ्या वर्षे केला काय..!! आणि मग मी गप्प बसायचो. अश्या प्रकारे UNIX चा क्लास संपला मग मी सरांंकडे Win32, COM आणि WinRT शिकलो. ते हि भन्नाट शिकलो, specially COM शिकायची वेगळीच मजा आहे. ह्या वेळेसही सरांनी movies सांगितल्या त्याही मी डाउनलोड करून ठेवल्यात पण बघायचा काही अजून योग आला नाही कारण UNIX एक प्रकारे ठीक होता पण Win32, COM आणि WinRT करून झाल्यावर कळलं की करण्यासारखं खूप खूप काही आहे. तेव्हा ठरवलं की हे एक एक करून एकदम परफेक्ट करायचा आणि मग मी लगेच Petzold ऑर्डर केली आणि लगेच चालू केली. UNIX झाल्यामुळं जाड पुस्तक कसं वाचावं हे एकदम उत्तम कळले आहे आणि सर पण होतेच कि, सरांनी Win32 एवढं मस्त शिकवल्यामुळे काहीच अवघड जात नाही आहे. आणि आता तर पुस्तकांबद्दल तर अजून खूपच उत्सुकता वाढली आहे आणि त्याचे एकमेव कारण आहे “OpenGL”. खरंच Vikas Kamble ह्यांनी त्यांच्या एक्स्प्रेशन मधे खूपच छान शब्दांत OpenGL Seminar चे वर्णन केले आहे. OpenGL Seminar Part 1 मध्ये शेवटी सर त्यांचे OpenGL चे डेमो दाखवतात. ते डेमो पाहिल्यावर भारावून जाणे काय असतं हे तुम्हाला स्वतः कडे व आजुबाजू ला बसलेले तुमच्या मित्रमंडळी ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळेलच. सरांनी शेवटचा “Resort(Ocean)” च्या डेमो मध्ये kitaro च “Sundance” हे अप्रतिम music वापरला आहे. आजही जेव्हा मी ते music हेडफोन लावून ऐकतो तेव्हा तो “Resort(Ocean)” चा demo सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जश्याचा तसा आजही माझ्या डोळ्यादेखत येतो. ह्याचबरोबर Fundamental आणि Multi-OS सेमिनार मधेही खूप काही शिकायला मिळालं.
तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला हि असेल की मी सुरुवातीला माझ्याबद्दल का लिहिलंय, त्याच एकमेव कारण आहे बदल, ह्या एका वर्षात माझ्यात झालेला बदल, अभ्यासातलाही आणि आयुष्य कसं जगायचं ह्याचाहि. जर भविष्यात time travel हि कल्पना शक्य झाली तर मी पहिले भूतकाळात जाऊन सरांसोबत ज्योतिष पासून पुढे सगळं शिकीन. २०१६ हे वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि अविस्मरणीय राहील. खरंच माझं आयुष्यं सार्थक झालं. आता इथून पुढे आयुष्य जगण्यात वेगळीच मजा येईल. माझ्या destiny मध्ये पुढे काय आहे माहित नाही पण माझ्या destiny मुळे मी सरांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला भेटले म्हणून मी तिचा सदा ऋणी राहील.
Thank you so much sir पुस्तक कशी एन्जॉय करायची हे शिकवल्या बद्दल
Thank you so much sir आम्हाला कॅन्सर पासून मुक्त केल्या बद्दल
Thank you so much sir आमचं अंधत्वपन दूर केल्या बद्दल
Thank you so much sir आम्हाला आयुष्यात पुढे जगण्यासाठी एक कारण दिल्याबददल
.
.
.
Thank you so much sir.
And finally a quote by Frank Zappa,
“So many books, so little time.”

14


Vikas Kamble

UNIX 2011, WinRT 2016, RTR 2017, RTR 2018 – as a Group Leader

OpenGL seminar

” हाय कंबख्त तुने पी ही नही ।”
मी सुद्धा हे ऐकून चकित झालो ! हा डायलॉग कुणाला कळणार नाही असे खूप कमीच लोक असावेत पण चकित होण्याचे कारण म्हणजे हा डायलॉग, हे वाक्य “सर” बोलून गेले!! (इथे पट्टीच्या तळीरामला वाटेल सर पण ?) हो सर पण, पण सरांची नशा आहे OpenGL ची !!
प्रत्येक OpenGL सेमिनार मध्ये लाईन बाय लाईन कोड घेऊन सुद्धा, होणारे चमत्कार डोळ्यांनी पाहून सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांनी ते कोड एकदा सुद्धा केले नाही अशांसाठी सर बोलले,
” हाय कंबख्त तुने पी ही नही ।
६ वर्षानंतर उपरती झाली, सरांच्या Win32 SDK, COM, WinRT च्या क्लास ला ऍडमिशन घेतली. बरं मग ६ वर्षे काय केले ? ६ वर्षांपासून मी एका नामांकित कंपनीमध्ये Software Quality Assurance Engineer म्हणून काम करतो आहे. अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा कानडे वाड्यामध्ये आमची यूनिक्स ची बॅच नुकतीच संपली होती, आणि कॉलेज च्या कॅम्पस तर्फे मला जॉब मिळाला हे सांगायला व सरांचा आशीर्वाद घ्यायला मी व माझे काही मित्र गेलो, तेव्हा सर म्हणाले होते की, “खूप छान कंपनी आहे, मिळालेल्या संधीचे चीज कर !”.
आमचे पोट पाणीच मुळात Visual Experience वर चालते, Direct3D, OpenGL, Vulkan, CUDA हे आमच्या रोजच्या दिवसाचे काम, कारण आमच्या कामाचा मूळ गाभा ग्राफिक्स ड्राइवर टेस्टिंग, सोबत गेम टेस्टिंग, अँप्लिकेशन टेस्टिंग जे जे ग्राफिक्स ड्राइवर वर अवलंबून आहे ते ते सर्व आमच्या कामाच्या भाग.Direct3D, OpenGL आणि आता आलेले Vulkan, या टेक्नोलॉजिचा वापर करून तयार केलेले गेम्स इतके सुंदर आणि विलोभनीय की आपल्याला हे खेळायला मिळते, त्याच्यावर काम करायला मिळते हेच आमचे समाधान !!
याचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच आणि अशा परिणामांमध्ये ६ वर्षे सपासप निघून गेली. बर काम तर काम, पण त्याचे दणकून पैसे पण मिळतात. तर अशा गोड भोपळ्यामधे आमचे बी खुशालपणे जगत होते. पण कुठून तरी कळाले की Python शिकून घेतले पाहिजे, म्हणून योगेश्वर सरांकडे क्लास लावला आणि मग उमजले आपला Win32 चा पार्ट बाकी आहे तो पूर्ण करायलाच हवा आणि ऍडमिशन घेतली.
क्लासला जायला सुरु केल्याने आणि पुन्हा त्या वातावरणमध्ये परतल्याने मस्त वाटत होते. अशाच जून जुलै च्या दरम्यान कळाले की सरांचा OpenGL चा सेमिनार ३ पार्टस मध्ये होणार असून, पहिला पार्ट ऑगस्ट मध्ये आहे! आणि वाटले की चला आपल्या कामाशी संबंधित आहे तर आपण हे केलेच पाहिजे!
आपण गेली ६ वर्षे जे काम करतोय त्याबद्दल शिकायला मिळणार त्यामुळे अजून छान वाटले, आणि झालेल्या आनंदात एक ना अनेक प्रश्न मनात आले , आणि असा भास झाला कि सर आपल्याला विचारत आहेत,
“लेका तू गेली ६ वर्षे या ना त्या कारणाने या टेकनॉलॉजिच्या संपर्कात आहेस, तुला का वाटले नाही,
की ही सुंदर गेम, हे सुंदर एप्लिकेशन, कशी डेव्हलोप केली असेल?, काय नेमके आतमध्ये चालू असेल?,
हे आपल्याला पण करता येईल का?”
असे म्हणतात, भले बाहेर तुम्ही कसेही डिप्लोमॅटीक किंवा डिफेन्सिव्ह उत्तर देऊन ती वेळ निभावून नेऊ शकाल पण मनामध्ये आपलेच मन आपल्याला उत्तर देऊन टाकते आणि आलेले उत्तर होते
“सर कधी गरजच पडली नाही, रोजच्या कामामध्ये आणि मिळणाय्रा पगारामध्ये एवढे सुस्त आणि आळशी आम्ही कधी झालो याचा थांगपत्ता लागलाच नाही”. आणि मनातल्या मनात लाज वाटली!!
६ ऑगस्ट २०१६ ला सरांच्या पहिला सेमिनारचा पहिला दिवस!!
सेमिनार सुरु झाला. सरांची खासियत ही की सर सर्वांना आधी एका समान स्तरावर आणतात.
त्या अनुषंगाने सरांनी शून्यापासून सुरुवात केली, अगदी GPU म्हणजे काय पासून ते Direct3D, OpenGL, CUDA, Vulkan या प्रत्येक टर्मिनॉलॉजिची ओळख करून दिली. कंपनी मध्ये रोज हे शब्द कानावर इतक्या वेळा जाऊन सुद्धा त्यांचे नेमके अर्थ त्याचा इतिहास असे किती रामायण आणि महाभारत त्या शब्दांमागे आहे हे त्या दिवशी समोर यायला लागले आणि आपोआप एक गोष्ट मानाने इमॅजिन केली,
“खचाखच भरलेला दरबार, सभामंडपाच्या बरोबर मध्यभागी “द्रौपदी” आणि तिचे होणारे वस्त्रहरण”. इथे फक्त “द्रौपदी” च्या जागी मी आहे आणि आपोआप माझे वस्त्रहरण होत आहे असे वाटू लागले. रोजच्या आयुष्यात “य” वेळेला येणारे शब्द त्यांचे अर्थ आज सेमिनार मध्ये मला समजत होते आणि मी सो कॉल्ड नामांकित कंपनीमध्ये ६ वर्षे त्या गोष्टीच्या संपर्कात आहे आणि ते कमी की काय, मला त्याचे पैसे पण मिळतात”!!!
“आपण करत असलेले काम, आपल्याला असलेले ज्ञान आणि आपल्याला मिळणारे पैसे याचे काहीच गणित लागले नाही त्या दिवसापासून पुढे!”
जसे द्रौपदीच्या वस्रहरनावेळी “कृष्णाने” तिची लाज राखली, आमच्यासाठीचा कृष्ण म्हणजे “सर”!!! एका अर्थाने झाले ते बरेच झाले, निदान आपण किती पाण्यामध्ये आहोत हे समजले. शाळेमध्ये असताना भूमिती हा विषय इतका आवडीचा नव्हता, पण जेव्हा “OpenGL मध्येसुद्धा त्रिकोण हेच बेसिक युनिट आहे हे जेव्हा पहिल्या सेमिनार मध्ये समजले, तेव्हा उमजले त्या भूमितीय आकारांची महती किती आहे!!”. झाले, भूमितीशी मैत्री करायची ईच्छा झाली
शाळेमध्ये कागदावर त्रिकोण काढला की झाले, पण इथे कॉम्पुटरला, त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये त्रिकोण काढायला सांगणे किती दैवी आहे हे अनुभवले.
फक २ दिवसांमध्ये शिकून, जेव्हा तुम्ही स्वतःच्या कॉम्पुटर वर “फिरणारी ती चहाची किटली” पाहता, तेव्हा होणार आनंद आणि अनुभूती ही शब्दात मांडण्यासारखी नाहीच मुळी. घरी जेव्हा असे काही मी २ दिवसामध्ये शिकून करून दाखवले, तेव्हा त्यांचा “आ” वासने साहजिकच आहे, कारण त्यामागची ताकद आणि प्रेरणा आणि २ दिवसांमध्ये हे घडवून आणायची किमया सरच करू शकतात आम्ही मात्र नाममात्र!! कारण यामागचे खरे किमयागार सर आहेत!!:)
पहिल्या सेमिनार च्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या टप्प्यामध्ये सरांनी तयार केलेली अँप्लिकेशन्स एक एक करत दाखवायला सुरुवात केली. प्रत्येक अँप्लिकेशन टाळ्यांची दाद घेऊन जात होते. टाळ्यांसोबतची बाहेर पडणारी unique expressions सुद्धा लक्षात राहावीत एवढी त्या डेमोज नी बाजी मारली.
आणि असे करता करता शेवटचा डेमो लाँच करण्याआधी काउन्ट डाउन सुरु झाले, एक, दोन, साडे माडे…… हृदयाची धक धक प्रत्येक काउन्ट नंतर १० पटीने ने वाढत होती, एवढ्यात सर बोललें “तीन” ……… …….. ……… …….. …….. …….. …….. हा तो हार्ट बिट चा शेवटच्या १० मिनिटांचा भाग.. समोर जे काही चालू होते ते पाहून इतके सुन्न प्रसन्न आणि शांत झाले होते वातावरण, की टाचणी पडली तरी आवाज यावा!!!!!
आणि १० मिनिटानंतर कर्कश्श आवाज झाला आणि मी त्या सुखदायक trauma मधून अचानक भानावर आलो, “पाहतो तर सर्व विद्यार्थी उठून उभे राहून जोरदार टाळ्या वाजवताहेत आणि मला जाणवले मीच एकटा बसून आहे, आणि उठून मी सुद्धा त्या गजरामध्ये सामील झालो…अद्भुत होते जे काही पाहिले ते…
सर्वात प्रोत्साहनात्मक बाब आपल्या सर्वांसाठी हीच आहे की हे सरांनी स्वतः तयार केले आहे आणि हे करण्याची कुवत आणि ताकद पुढल्या दोन टप्प्यांमध्ये होणाय्रा सेमिनार नंतर तुमच्यामध्ये सुद्धा येईल हे जेव्हा सरांनी सांगितले तेव्हाच मनाने ओढ घेतली की कधी पुढचे दोन सेमिनार होणार?.
उजाडला दुसय्रा सेमिनार चा पहिला दिवस, म्हणजे: २६ नोव्हेंबर २०१६.
सरांची एक ही सुद्धा खासियत आणि कला आहे की जेवढा विषय कठीण तेवढाच तो सोपा करून सर सांगतात. पुन्हा शून्यापासून पुढच्या पायरीला “सर्वांना” घेऊन जाणे काय असते आणि ते किती हातोटीने आणि सहजगतीने सर करतात हे पहिल्या दिवशी (दुसय्रा सेमिनार च्या पहिल्या दिवशी) पाहायला भेटले. कारण ज्यांनी ज्यांनी Win32 SDK सरांकडून आधीच शिकले होते त्यांच्या साठी, सर जे सांगत होते ते आधी एकदा तरी हे कानावरून गेले आहे हे नक्कीच त्यांना आठवत असणार, त्यातलाच मी पण एक. पण खरे सांगू? जितके छान मला आधी समजले होते त्यापेक्षा छान आणि स्वच्छ त्या दिवशी समजले. आणि सर जो श्लोक नेहमी कुठेही शिकवत असताना उच्चारतात “भावाभ्यासशीलनम सतत क्रिया:” तो आठवला आणि किती सार्थक श्लोक आहे याची प्रचिती सुद्धा आली
एखाद्या खोल विहिरीमध्ये उतरताना कशाचा तरी आधार घेत घेत आपण हळू हळू एक एक पाऊल काळजीपूर्वक टाकत असतो, इथे पडायची भीती सुद्धा असते, उतरण्याची ईच्छा आणि रोमांच सुद्धा असतो पण सर्वात महत्वाचा असतो तो आपण घेतलेला आधार! जर तो आधार कमकुवत असेल, तर नाकातोंडात पाणी जाणे अटळ ! असाच अनुभव येत होता जेव्हा “Windowing शिकत होतो”. “Windows मधल्या Windowing ला” पुन्हा एकदा एन्जॉय केले, पण जेव्हा “Linux वरचे Windowing सुरु झाले तेव्हा “सर” हाच तो काय आधार ज्याने नाकातोंडात पाणी जाऊ दिले नाही.
स्फुरण म्हणजे काय असते हे आपल्यापैकी प्रत्येकाने, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गज व्यक्तींनमध्ये वेळोवेळी पहिले आहे.
सेमिनार च्या दुसय्रा दिवशी “स्फुरण” म्हणजे काय असते याचा अनुभव आला “Linux चे Windowing” शिकताना!!!
सलग २-३ झाले, कुठेही न थांबता सर “Native Windowing on Linux व त्यामधला OpenGL चा part line by line” समजावून सांगत होते.
सरांच्या energy ने परमोच्च सीमा कधीच गाठली होती, किती सांगू आणि किती नको अशी झालेली स्थिती आणि परमोच्च सीमेवर पोचलेली energy या द्वंदवामध्ये सेमिनारच्या शेवटी शेवटी सरांची अवस्था म्हणजे,
“नवजात बालकाला” नुकताच जन्म देऊन “धादांत मोकळ्या” झालेल्या आईसारखी झाली होती.हो ही स्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवली.प्रसूतीच्या नानाविध कळा सोसूनसुद्धा, चेह्य्रावरचे “मोकळे झाल्याचे”समाधान, आपण एका जीवाला जन्म दिल्याचा पराकोटीचा आनंद, तिच्या थकलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा लपून राहत नाही, अशीच होती सरांची सेमिनारच्या शेवटी शेवटी ची अवस्था!!
फरक एवढाच होता की आईला ९ महिने आपल्या जीवाचे दोन जीव होऊन सर्व काही करावे लागते, इथे सरांनी जवळ जवळ १२ वर्षांनपेक्षा जास्त काळ OpenGL मध्ये व्यतीत करून मग कुठे ह्या सेमिनार चा जन्म झाला.
सर नेहमी उदाहरण देतात त्याप्रमाणे “अग्निपथ (अमिताभ बच्चन अभिनित) मध्ये अमिताभ गुंडांशी मारामारी करून शेवटी ज्या थकव्यामुळे त्याला नीट उभे सुद्धा राहता येत नसते, असा सरांचा अग्निपथ आम्ही पाहिला OpenGL च्या रूपात.” आणि जाता जाता सरांच्या या स्पिरिट ने २६/११ च्या स्पिरिट ची सुद्धा आठवण करून दिली आणि दोघांच्या स्पिरिट ला मनोमन सलाम ठोकला.
७-८ जानेवारी २०१७ मध्ये “OpenGL सेमिनार पार्ट-३” झाला!
पूर्ण सेमिनार मध्ये आणि सेमिनार नंतरसुद्धा उपयोगी पडेल असा मंत्र सरांनी दिला, मग त्याला संजीवनी मंत्र म्हणा, कानमंत्र म्हणा किंवा दैवी मंत्र म्हणा, ज्याचा जप जोपर्यंत OpenGL मध्ये तुम्ही असाल किंवा OpenGL शिकणार असाल तर नेहमी कामास येईल तो म्हणजे
” DO IT YOURSELF”!!
या भागामध्ये पहिल्या दिवसापासून दुसय्रा दिवशीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत “OpenGL” ची काय ताकद आहे, काय आवाका आहे आणि सर म्हणतात त्याचप्रमाणे काय काय मॅजिक आपण करू शकतो याची प्रचिती माझ्यासकट सर्वांनाच आली असणार.
पहिल्या दिवसाची सुरुवातच आमच्याच मित्राने तयार केलेल्या सुंदर कलाकृतीने झाली.
सर म्हणतात त्याप्रमाणे “OpenGL Coding ची सवय आणि जोडीला कला (ज्याला जी उपजत वरदान असते)” अंगी असणे म्हणजे दुग्धशर्करायोगच !!!!
पण कोडींग ची सवय आणि कलेची साधना आणि संगोपन तितकेच महत्वाचे !!
भाग-१ मध्ये काढलेले त्रिकोण चौकोन, मग त्यांना दिलेले रंग, texture आणि सर्वात शेवटी तयार केलेली चहाची किटली यामध्ये आपण केलेले कष्ट त्यामानाने किंवा OpenGL कोडींग च्या मानाने कमी होते. कारण आतमध्ये काहीतरी होतेय, फक्त एवढेच आपल्याला माहित होते पण काय होतेय अरे खरेच काय काय होतेय हे भाग-३ मध्ये पहिले. भाग-१ खरोखरच ट्रेलर होता आणि भाग-३ म्हणजे पूर्ण सिनेमा !!
एक त्रिकोण काढायला आपल्याला काही लाईन्स चा कोड पुरेसा होता भाग-१ मध्ये पण भाग-३ मध्ये एवढे नक्की समजले की सिस्टिम च्या जवळ जातोय आपण, सिस्टिम आपल्यासाठी केवढ्या गोष्टी करू शकते, तिची ताकद काय आहे आणि त्या ताकदीचा किती नजाकतीने आपण वापर करून घेऊ शकतो.
जी नजाकत “किटली चे झाकण उघडताना” सर्वांनी अनुभवली.
OpenGL हा एक समुद्र जर म्हटले आणि अशा समुद्रामध्ये पोहायचे असेल, तर पोहायचे कसे आणि त्यासाठीची सर्व पूर्वतयारी सरांनी सेमिनारच्या
भाग-१ आणि भाग-२ मध्ये करून घेतली होती, आणि आता शेवटचा टप्पा होता तो भाग-३. भाग-३ झाला आणि सरांनी आपले काम पूर्ण केले, आपल्याला आलेल्या अडचणी, डोळ्यासमोर येणारा अंधार, त्या “अंधाराचे सुद्धा प्रकार” सरांनी सांगितले, कारण त्यांचे साक्षीदार सर स्वतःहोते !!
आता आपण समुद्राच्या मध्ये आहोत (कारण भाग-१, भाग-२ करून झाले आहे ना आपले ?), एकदा का समुद्रामध्ये पडलो आणि आपला मार्ग आपणच शोधला तरच आपण तरुन जाऊ आणि किनाऱ्यावर पोहचू, नाहीतर आहेच मग नाकातोंडात पाणी आणि “OpenGL समाधी”..
अशी ही OpenGL ची नशा ३ भागामध्ये (पेग) सर्वांना चढावी हीच सदिच्छा ! आणि सरांना म्हणावे लागू नये:
” हाय कंबख्त तुने पी ही नही ।”

13


Pranav Vaikar

UNIX 2015, WinRT 2016

जागरूक ज्ञानमंदिरामधला अनुभव

मी पाहिले सरांना पहिले UNIX seminar मधे , मी सहज आलो होतो सोनाली madam(eaglet) मध्ये ऐकले होते म्हणून. मला तेंव्हा एकच tension होतं की माझे पैसा वाया जातो की काय ? कारण मी त्याच्याआधी एक कॉलेज मध्ये सेमिनार केला होता ज्यामध्ये माझे एक हजार वाया गेले होते . सर आले आणी त्यांनी सांगितलं की, “मी तुमचा एक पैसा वाया जाऊ देणार नाही,तुम्हाला कॉलेज मध्ये लुबाडतात,त्यामधला मी नाही”. नंतर जे सर शिकवायला लागले आणी ज्या energy आणी प्रेमाने ते शिकवत होते, ते पाहून मी भारावून गेलो .
मग मी computer fundamentals आणी multi os सेमिनार केले आणी ठरवलं की राहिलेले unix class ला जाऊन शिकायचं. माझ्या सख्या बहिणीचं लग्न होतं 8 december ला आणी घराचे नको म्हणत असून सुद्धा मी ६ डिसेंबर ला admission घेतली . पहिले ६ lectures मध्ये आयुष्य कसही असलं तरी आपण प्रयत्न करून ते बदलु शकतो हे मूल्य मी शिकलो .
‘ संस्कार फक्त घरात मिळतात बाहेर कोणीपण तुमची काळजी करत नाही ‘ असं आपण ऐकतो पण ह्या क्लास ला येऊन समजलं की संस्कार तेथे मिळतात जेथे तुमची काळजी करणारे लोकं असतात . थँक यु सर .
मी UNIX 2015 मध्ये सरांकडून शिकलो की —
१. अभ्यास म्हणजे काय आणी तो कसा करावा .
२. Knowledge is inter -related & how to see the relation.
३. आपला मुद्धा कसा मांडावा. (presentation skill–class केल्या नंतर public speaking course ची गरजच नाही )
४. Technology वर प्रेम करा .
५. मातृभाषेमधून शिका आणी समजुन शिका. (११ आणी १२ वी मध्ये english medium असल्यामुळे जे मी विसरलो होतो, System च्या ओघात)
मी WinRT पण लगेच join केला. त्यामध्ये मी coding कसे करायचे ते शिकलो. मला COM खुप आवडलं. प्रत्येक COM component मी खूप enjoy केला. Coding enjoy करणे हे एक अमूल्य गिफ्ट मला सरांमुळॆ मिळाल.
मला .NET , JAVA , WinRT architecture ही lectures अगदी लाख मोलाची वाटली. (one of the Best lectures, i ever attended ).
मला coding आवडले होते आणी Unix मध्ये मी coding केले नव्हतं, पण मला योगेश्वर शुक्ल ह्यांचं Unix lecture आवडलं होतं. मग मी योगेश्वर सरांकडे LSP join केला. मला LSP किती भारी आणी deep आहे ते समजलं. योगेश्वर सरांची coding style आणी त्यांची practice आणी सखोल अभ्यास पाहून मी आजही थक्क होतो. थँक यु सर फॉर LSP .
मी Kenstar मध्ये interview दिला.job हा quality checking साठी होता मुख्यत्वे एका Mechanical engineerसाठी .
माझा interview खूप छान झाला. सरांचा rule आहे -‘ Never forget the basics ‘. ह्याचा मला खूप फायदा झाला.
मला सगळे प्रश्न basics मधले विचारले(११ आणी १२ physics).नंतर सगळे mechanical चे प्रश्न सुरु झाले.
कलासमध्ये जीवन दादा कडून ऐकले होते की आपल्याला जे येते तिकडे interview घेऊन जायचा. मग मी interview SAP आणी electronics कडे नेला. मला SAP ERP आणी database वर प्रश्न विचारले. मी सगळ्यांची छान उत्तरं दिली.त्यांनी मला Quality checking+ IT असा job दिला. माझी बोलण्याची आणी समजावून सांगण्याची पद्धत, जी मला सरां कडून मिळाली त्यामुळे, ४ B.E. Mechanical engineer ऐवजी माझी निवड झाली.
आज मला सरांमुळे Y.D. असून सुद्धा engineer नसतानाही माझा पहिला job आहे. सरांचे संस्कार हे computer नाही तर कुठल्याही फील्ड मध्ये कायमचं उपयोगी पडतात. ह्या ज्ञानमंदिरामध्ये राहून मी खूप काही शिकलो. सर तुमच्याकडून जे काही शिकलो त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
थँक यु सर .
थँक यु.

12


अथर्व पाठक

WinRT 2016, UNIX 2016, RTR 2017 – as a member as well as a Group Leader

आनंदाश्रम, मध्ये होणारं गुरुकुल पद्धतीचं शिक्षण बघितलं, आणि गोखले सरांची त्यांच्या Computers, UNIX किव्वा Open GL सारख्या कुलदैवातांवरची प्रचंड श्रद्धा बघितली, कि कोणताही माणूस अपोआप त्या गुरुकुलाचा भाग होतोच.
गोखले सरांकडे जाण्यापूर्वी, आईक्लं होतं कि ते Unix, Win 32 SDK-.NET-WinRT, etc शिकवतात. नंतर कळाल कि ६ फ्री lectrures आहेत Unix-२०१५ Batch च्या आधी, आणि नेमकं हे कळाल पहिल्या Free lecture च्या दिवशी, मग २ मित्र(यज्ञेश आणि गौरव) म्हणाले सर एक नंबर शिकवतात, काहीही कर पण तू येच. म दुसर्या दिवसापासून जायला लागलो, फ्री Lectures संपायच्या आत ठरलं होतं, क्लास join करायचाच. नंतर शेवटच्या दिवशी Admission घ्यायला गेलो, भली मोठ्ठी रांग लागली होती! मग ६ पैकी ५ दिवस आलेल्या लोकांची रांग लागली, आता श्रेणिक (माहित नसलेल्या लोकांसाठी- सरांचाच एक विद्यार्थी(Admin)) आला आणि त्यांनी announce केलं- “तुम्ही line केली आहेत, त्यात १२-१५ लोक आहात. जागा फक्त ७ आहेत, काय करूयात? आपापसात ठरवून काही जण back-out करताय का चिट्ठी टाकून निवड करूयात?” अर्थातच, चिट्ठ्या टाकण्यात आल्या, त्यात काही Admission मिळाली नाही. पण एकंदरीत Rules आणि ते पाळण्यासठीची शिस्त बघून मलाच सरांना request करावीशी वाटली नाही(उलट बरं वाटलं कि आज सुद्धा कुठेतरी शिस्तीत आणि Fair admissions होतात बघून). नंतर काय, नंतर निमुटपणे घरी गेलो- No Arguments. मग दर सोमवार मंगळवार बुधवार यज्ञेश, गौरव, आणि क्षितिजा बरोबर चर्चा. बरं, चिट्ठी टाकल्यावर आमच्या मित्र मंडळींपैकी फक्त क्षितिजा ला admission मिळालेली.
म एक दिवस माझ्या हाताला “The Art Of UNIX Programming” by Eric Steven Raymond-हे पुस्तक लागलं. ते पुस्तक वाचायला सुरवात केली, आणि UNIX Culture, Philosophy, Basics, आणि इत्यादी अनेक गोष्टींचा एक सारांश मिळाला. म म्हटलं कि पुढच्या वेळी जाताना अजून वाचून जाऊ, काही कळाल नाही तर विचारू, (कारण शेवटी मास्तरांकडे कोरी वही नेताना सुद्धा गृहपाठ करून जायला हवं कारण तरच प्रश्न पडणार, आणि मग उत्तरं मिळणार).
मग हळू हळू सरांना किव्वा madam ना सहजच भेटायला, काही Doubts आले तर विचारायला, कधी सरांनी बोलावलं तर, अश्या अनेक कारणांसाठी मी क्लास संपला कि सरांना जाऊन भेटायचो, सगळेजण भरपूर गप्पा मारायचे, प्रश्न-उत्तर व्हायची, Computer GK तर काही विचारू नका!- मी So-called BE-(IT) करत असूनही आयष्यात कधी न आईक्लेल्या पण प्रचंड महत्वाच्या गोष्टी मी रात्री १०.३० ते १२.३० ह्या वेळेत शिकलोय(अजूनही शिकतोय). सरांना किव्वा madam ना भेटलो कि का कुणास ठाऊक खरोखर खूप बरं वाटतं, दोघेजण आगदी आपुलकीनी विचारतात- काय चालू आहे सध्या, बरा आहेस का, कोडींग करतोयस का, astronomy बद्दल असो, photography असो physics असो iucaa असो किव्वा आणखीन काही अक्षरशः refresh व्हायला होतं.
एखाद्या विषयाचा Curriculum चा भाग म्हणून Hollywood किव्वा Bollywood movies सांगणारे सर मी तरी पहिल्यांदा पहिले आहेत.
गोखले सरांकडे क्लास लावला कि UNIX philosophy च्या काही गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या:
१) Do One Thing, Do it Well,(सरांचं Classic उदाहरण- राग मारवा!)
२) Keep It Simple(Never Forget the basics, the world works on Fundamentals)
३) Create Software Leverage (Let your code speak for you)
अजून लिहिण्यासारख्या माझ्याकडे अक्षरशः हाजारो ओळी आहेत, आणि त्या सुद्धा कमी पडतील एवढे अनुभव आणी एवढं Knowledge रोज मिळतं! सरांनी केलेल्या Explanations आणि ते करण्यासाठी केलेल्या (Computer – Human Anatomy – Movies) – मधल्या comparisons वरती अखंड पुस्तक लिहिता येऊ शकतं!
______________________________________________________________
तर, असाच एक दिवशी क्लास नंतर सरांनी announce केला कि आता मी Undoing Lord Macaulay नावाचा सेमिनार वेग-वेगळ्या कॉलेजेस ला घेणार आहे, त्यानंतर तो सेमिनार आमच्या कॉलेज (Modern College of Engineering) ला सुद्धा, झाला. सगळीकडे सेमिनार Housefull आणि HIT! झाला.
परंतु XYZ हे एकमेव कॉलेज असं होतं, कि जिकडून सरांच्या त्या सेमिनार चा Indirect feedback किव्वा त्याला Indirect seminar after-effect म्हणूया, तो negative आला.
Negative म्हणजे काय?- सर बर्याचदा चालू शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं, त्यासाठी जबाबदार व्यक्तींची टक्केवारी सांगतात. त्यात ते ५०% शिक्षक जबाबदार असतात असं सांगतात. तर त्यापैकी त्या XYZ कॉलेज च्या शिक्षकांना ते न पटल्याने, आणि विद्यार्थ्यांकडून देखील सेमिनार नंतर त्या कॉलेज च्या शिक्षकांना थेट किव्वा काही प्रमाणात उद्धटपणे प्रश्न विचारले गेल्याने त्यातले काही शिक्षक रागावले, आणि शिक्षा म्हणून त्यांना Written Assignments वगरे प्रकार करायला लावले. “तुम्हाला एवढं कळतं ना आमच्यापेक्षा जास्त, म तुमच्या assignments तुमच्या तुम्ही करा!”- अशी उत्तरं शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळायला लागली. “ते कालचे सेमिनार मधले सर किती मस्त समजावून सांगत होते, तुम्ही तसा का नाही सांगत समजावून?”- असे प्रश्न शिक्षकांना आल्यावर त्यांनी अजूनच Strictness वाढवला.
हे सगळ सरांपर्यंत यायला बरेच दिवस लागले, पण शेवटी indirectly का असेना त्यांच्या कानावर हे आलं.
त्यावर सर खूपच निराश झाले आणि त्यानंतर ज्या ज्या कॉलेजेस मध्ये सेमिनार झाले त्या कॉलेजेस च्या सर्व विद्यार्थ्यांना सरांनी एक दिवस meeting साठी बोलावले, आणि सरांनी विचारलं- “XYZ कॉलेज मधला हा अनुभव बघता, आपण हा सेमिनार बंद करायला हवा का?” प्रत्येकनी आपापली मतं मांडली अर्थातच सगळ्याचं म्हणणं होतं कि सेमिनार चालू राहावेत म्हणून,
मी सुद्धा माझा मत मांडलं, थोडा मोठं आहे, पण म मी सरांना email लिहिली,
email चं Subject होतं- Undoing Lord Macaulay का बंद करू नये!?
E-Mail पुढीलप्रमाणे:-
Hello Sir,
खालील Email मी अगदी बोली भाषेत आणि मोबाईल वर लिहिली आहे, काही चुकले असेल तर sorry!
आज XYZ कॉलेज चा फिडबॅक खुपच धक्कादायक होता. पण सर खरं सांगायचं तर Undoing Lord Macaulay सेमिनार संपल्यावर एखाद्याला जी जाणीव होते आणि जे Self Evaluation होतं ते बहुदा एखद्या Psychiatrist कडे जाऊन सुद्धा होत नसेल. (सेमिनार ऐकणारे आणि असा feedback देणारे बहूतेक दगड असावे)
मी तुम्हाला पहिल्यांदा Unix च्या 6 फ्री lectures पैकी च्या दुसऱ्या दिवशी ऐकलं आणि आईशप्पथ सांगतो घरी गेल्या गेल्या कॉम्पुटर चालू केला आणि ठरलं कि तुम्ही केलंत त्याच पद्धतीनी ‘0’ पासून start करायचं!
मला Engineering मनापासून करायचं होतं. पण एकंदरीत कॉलेज ची परिस्थिती बघून mood off झाला आणि परीक्षेपूर्त अभ्यास करून बाकी उद्योग सुरु केले(Rifle Shooting, Tabla, Astronomy, Photography, Travelling, Trekking)
Unfortunately Unix ला admission मिळाली नाही त्यामुळे क्लास मध्ये काय शिकवतात आणि कसं शिकवतात काहीच माहित नव्हतं.
यज्ञेश, गौरव, क्षितिजा दर सोमवार, मंगळवार, बुधवार क्लास संपला कि आज काय शिकवलं आणि कसलं भारी शिकवलं एवढं सांगायचे.
मं तुम्ही एक दिवस क्लास मधे “मी येत्या काही दिवसात Sinhgad कॉलेज ला Undoing Lord Macaulay चा सेमिनार घेणार आहे” असं announce केलंत. त्यादिवशी यज्ञेश, क्षितिजा, गौरव भेटले आणि माझं ठरलं, आपल्या कॉलेज मध्ये Seminar arrange करायचाच!!!(27 underline :D)
दुसऱ्या दिवशी Principal Madam च्या Cabin मध्ये Astromedicomp.org वरचा तुमच्या Bio-Data ची Printout घेऊन गेलो.
मॅडम म्हणाल्या त्या तुम्हाला ओळखतात, तुमचा विद्यार्थी(योगेश्वर शुक्ल) आमच्याच कॉलेज ला शिकायला होता म्हणुन. मग तर अजूनच उत्तम होतं!
मॅडम ना सांगितल्यावर त्या लगेच हो म्हणाल्या. मग संध्याकाळी तुम्हाला भेटायला आल्यावर सगळं ठरलं तुमची availaible dates आणि conditions ची e-mail वाचली आणि बरं वाटलं. मॅडम च्या pc वर दुसऱ्या दिवशी email open केली तुम्हाला reply आणि phone केला आणि शेवटी Finalize झाला seminar.
आणि बहुदा मी Rifle Shooting and Tabla- Intercollegiate, Nationals आणि International competitions, मुळे असलेला रेग्युलर Defaulter(In terms of Attendance),
आणि DRDO आणि IUCAA project intern म्हणून select झाल्यामुळे आणि त्यांच्या बर्यापैकी ओळखीचा झाल्यामुळे त्यांनी खरोखरंच seriously घेतलं माझं म्हणणं आणि immideately main auditorium available करून घेतलं!
मग प्रत्येक IT Computer आणि ENTC च्या वर्गात जाऊन आम्ही फक्त तुमचा Bio-Data वाचून दाखवला आणि मुलांना फक्त एकच guarantee दिली कि तुम्ही एकदा Seminar Hall मधे येऊन बसलात कि तुम्ही कितीही ठरवलं तरी तुम्हाला उठून जायची इच्छा होणार नाही.
मोकळे कागद आणि पेन Registration साठी म्हणून प्रत्येक वर्गात वाटले.
आईशप्पथ Expected नव्हतं पण दोन्ही दिवस मिळून 415 Registrations आली!!!
Principal madam नी तोपर्यंत मुलांना Insist/Compulsary न करता कधीच एवढा Response बघितला नव्हता.
मला सांगायला अभिमान(+आश्चर्य) वाटतो कि आम्ही आपला सेमिनार Compulsary नाही असं वाक्यं सर्वात आधी announce करून नंतर माहिती देऊन सुद्धा सेमिनार ला, 380 Engineers+Staff येऊन बसले होते. अगदी शेवटपर्यंत!
यापूर्वी Walter Lewin नावाच्या MIT मधल्या Professor चा “For the Love of Physics” नावाचा Video, youtube वर बघून मी Physics च्या प्रेमात पडलेलो.
आणि Undoing Lord Macaulay सेमिनार ऐकला, Open GL चा demo बघितला आणि डोळे लक्खं उघडले!
Inspiration असेल किव्वा post seminar effect असेल, मी घरी आल्यावर सलग 8 तास computer वर बसून नुसता वाचत बसलेलो.
एका डॉक्टरांना हा विषय वयाच्या 30 व्या वर्षी शिकता येतो आणि मी engineering ला असून तुम्ही सांगितलेल्या seminar ची माहिती नवीन वाटते हे अक्षरशः लाज वाटण्यासारखं होतं!
पहिल्यांदा कळलं, नुसताच BE (Information Technology) चा course करतोय, Information चा काही पत्ताच नाहीये.
नंतर Fundamentals, OS चे Workshops केले आणि अक्षरशः वेड लागलं! आम्ही किती तुच्छ आहोत ह्याची जाणीव झाली आणि खरोखरच्या अभ्यासाला सुरुवात झाली. सेमिनार च्या आधी सुद्धा माझी झोप 5 तास असायची, फक्त झोपायच्या ऐवजी Astronomy+Photography+Tabla+Trekking करायचो
आणि ते नसेल तेव्हा Movies/Games खेळायचो, आता त्यातले 4-5 तास Computer आणि Coding ला Dedicate करतो आहे. DRDO कडून बक्षीस मिळालेला Intel IOT किट, C-C++ programming शिकतोय. मोकळा वेळ मिळाला कि computer वरती Arkham Night/Prince Of Persia सारखे गेम्स नं खेळता Renderman सारख्या Softwares ना install करून त्यांच्या बरोबर खेळायला लागलो आहे!
DSDT मध्ये changes करून Hackintosh install करण्यासाठी Laptop वर अक्षरशः दिवसभर घालवतो आहे! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला आता हे सगळं आवडतंय!
(सर, खरोखर सांगतो, आईला अजून पण विश्वासच बसत नाहीये कि मी computer वर बसून, अलीकडे अभ्यास सुद्धा करतो म्हणून!)
Sir All the credit goes to You and Undoing Lord Macaulay Seminar.
मी UGC च्या Meet ला Professors समोर आपल्या Initiative ची announcement केली आणि सेमिनार हॉल मधला प्रत्येक माणूस Dias वरचा माझा Laptop Wallpaper नीट वाचायला लागला.
““I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in the country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation.”
-Thomas Babington Macaulay(मुद्दामहून Lord लिहिलं नाही, अखेर Queen नि बहाल केलेली पदवी आहे आणि ती हि Britain च्या, आता भारतातल्या BrExit ला ६९ वर्ष झाली) ”
Presentation झाल्यावर मला 3 feedback मिळाले.
1) डॉ.काळे,Ex. Director ISRO-Banglore,
म्हणाले “मी पण पुणेकर आहे, Fegusson College ला मी Physics केलं, Coep ला M.Tech केलं आणि कामानंतर रिटायरमेंट घेऊन पुण्यात आलो, एखद्या पुणेकर शिक्षकाला एखादा एवढा उत्तम Free initiative घेताना बघून खूपच बरं वाटलं,
2),3)डॉ.केंभावी, Ex. Director Iucaa आणि डॉ. Ananthkrishnan, ex.director, GMRT, TIFR ह्या दोघांनीसुद्धा मनापासून कौतुक केलं initiative चं.
(एकीकडे इतक्या मोठ्या लोकांनी इतक्या Humility ने तुमचा सेमिनार न ऐकता सुद्धा, फक्त आपली सेमिनार पूर्वीची 1 SLIDE बघून, इतका Instantaneously इतका मनापासून चांगला feedback दिला,
तर XYZ कॉलेज च्या शिक्षकांनी seminar ऐकून काहीच उपयोग नाही झाला!-हे पाहून लगेच तुमचं वाक्यं strike होतं-“लगेच कळतं कुठून आलात ते”)
इतकं भारी वाटलं ना सर! Pune University च्या building मधे उभं राहून, चालू शिक्षण पद्धतीने किती नुकसान होतंय, आणि ते निस्तारण्यासाठी, एवढा मोठ्ठा initiative कसा चालू झाला हे सांगितल्यावर, हा feedback मिळाला तेव्हा!
हा सेमिनार ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर असलेले आम्ही 10 Engineers तर नक्की तुमचे विद्यार्थी झाले आहोत आणि आता Cancer होईच्या आत बाहेर पडायला सुरवात करायला लागलो आहोत हे मात्र नक्की.
मी, यज्ञेश, गौरव, निखिल, गायत्री, अदिती, सलोनी, ऐश्वर्या, आणि आमचे 2 शिक्षक(कुणाल सर, मानसी madam) हे already तुमचे विद्यार्थी झालो आहोत.
सेमिनार नसता झाला तर वरील पैकी एकही engineer मार्गी लागणं अशक्य होतं.
सर, मी तर अभिमानाने सांगतो कि मी -डॉ. Engineer. गोखले सरांचा विद्यार्थी आहे आणि आमचे सर Cancer Specialist आहेत.
(सर अगदी खरं सांगतो, “मला MIT(Massechusets) ला admission मिळाली” हे सांगायला जसं भारी वाटेल तितकंच भारी मी गोखले सरांकडे आता Win32 SDK शिकातोय हे वाटतं)
सर Please सेमिनार बंद करू नका(आम्ही खरंतर सेमिनार मुळेच तर सुधारलो/जागे झालोय).
सर तुम्ही काहीही(कोणताही विषय) आणि कितीपण वेळ(overnight सुद्धा) शिकवलात तरी मी त्या क्लास चा विद्यार्थी Fix आहे एवढं नक्की!
email ला सरांचा reply आला,
Hello Atharva,
You are such a type of genuine student for whom a teacher like me, is feeling proud to say : I WAS WRONG.
I should not even think of closing it. It won’t stop. Students like you will not let it stop.
God bless you.
Dr. Gokhale Sir
हे वाचलं आणि खरोखर खूप बरं वाटलं!
(खरंतर मी सरांना फक्त वरची mail पाठवली, आणि madam म्हणाल्या आपण हि Expression tab वर टाकूयात, म्हणून email पूर्वी थोडा संदर्भ लिहिला..)

11


Ramij Mirza

DESD 2016

*** विजय असो ***

डॉक्टर आहे ज्योतिषी आहे, त्यात कंप्यूटर चा भर.
खरच पुण्याई आमची, लाभले आम्हास गोखले सर.
लार्ड मैकॉले च्या शिक्षण प्रणालीला झुगारुन, शिकवनि तुमची समाज कार्य.
अर्जुन तयार होतील पुन्हा,आहे आमच्या कडे द्रोणाचार्य.
शिक्षणानि डॉक्टर आहेत, पन कंप्यूटर चे तुम्ही तज्ञ.
शिकवले तुम्ही खूप काही, ज्या पासून आजवर होतो अनभिज्ञ.
नाही माहित तुमच्या बद्दल तुम्हालाच सांगणे, आहे का योग्य.
श्रीकृष्णालाच भगवतगीता सांगणे, आहे खरच अयोग्य.
कष्ट तुमचे ऐकून, मनाला एक धक्काच बसून जातो.
खरच वाटते आता पर्यंत आम्ही, गोट्याच खेळत होतो.
शिक्षण हे उदर निर्वाहाचे उपाय होते आमच्या साठी.
पण त्या मधील गोडवा तुम्ही रुजवला आमच्या पाठी.
जॉब शोधायला आलो होतो, पण एक मार्ग सापडला आहे.
कॅन्सर चे ते सेल आता आम्हाला, तुमच्या साठी संपवायचे आहे.
ज्ञानेश्वरच तुम्ही आमच्या साठी, शिकवण जणू ज्ञानेश्वरी आहे.
आम्हीच ते रेडे, जे जगा समोर तुमचे वेद वदविनार आहे.
जमेल का हो सर आम्हाला पण, तुमच्या सारख थेट.
बालगंधर्व जवळ होईल का आपली, रोल्स रॉयस मधे भेट.
आमचे सोडून आता, तुमचेच स्वप्न पूर्ण करावेसे वाटते.
आयुष्यात आजवर काहीच केल नाही, अश्रू मनात दाटते.
पण सुरवात करू आता जोमाने, झाल नाही जास्त लेट.
विश्वास आता एकच, knowledge is interrelated .
प्रकृति जपा सर , आयुष्यात तुम्हास कोणतेहि दुःख नसो.
शिक्षण प्रणालीचा तुमच्या, संपुर्ण जगभर विजय असो.

10


Jeevan Gaikwad

UNIX 2014, WinRT 2015, RTR 2017 – as a member as well as a Group Leader

राग मारवा : SDK COM आणि UNIX

सर, तुम्हाला आठवतंय लास्ट UNIX batch(२०१४) संपताना तुम्ही सांगितले होते, UNIX उत्तम शिका , बाकी कुठलाही विषय अवघड जाणार नाही कारण OS ही आई आहे आणि तीच मूळ असल्याने ती सर्व विषयांना स्पर्श करते मग ते networking असो वा cloud असो. यामुळे हे कुठेतरी मनात पक्के बसले होते कि आपल्याला UNIX उत्तम करायचे आहे आणि ती नीट समजून घेण्यासाठी programming सुद्धा आले पाहिजे.
कंपनीत एक दीड वर्ष काम करताना तुम्ही सांगता तसा तंतोतंत अनुभव आला होता. UNIX शिकताना आपल्या क्लास चे छान,पवित्र वातावरण आणि दिवसभर कंपनी मध्ये काम करताना येणारा कामाचा load आणि वेगळे वातावरण, अशा दोन वातावरणा मध्ये सांगड घालताना अभ्यास काही होत नव्हता आणि frustration येत होते. M.E. ,M.Tech करावे असे आतून वाटत नव्हते कारण UNIX आणि आपले seminars वरून हे लक्षात आले होते, कि आहे त्याच degree चे आपल्याला नीट येत नाही , अजून मोठ्या degree चा शिक्का लावून घेऊन so called master म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे.
मग करायचे काय, UNIX आणि तुम्ही सांगितलेली पुस्तके वाचण्याची तीव्र इच्चा होतीच , यावरच विचार करत असताना, कंपनीच्या study leave ची facility माहित झाली आणि सुट्टी घेऊन तुमच्या कडे उत्तम शिकायचे हे पक्के केले .
योगायोगाने आमच्या कंपनीतला प्रोजेक्टही संपत होता. घरच्यांशी सुट्टी घेऊन अभ्यास करण्याबाबत बोललो आणि manager शी बोलून ३ महिन्यांच्या सुट्टी साठी apply केले. सुट्टी grant झाली आणि आपली UNIX batch संपली आणि सुट्टी सुरु झाली. सुरु झाल्या झाल्या लगेच सुट्टी बद्दल तुम्हाला अशाच एका mail वरून या सांगितले होते. एकदा कट्ट्यावर सागर गांधी तुम्हाला म्हटला होता ,सर , याने क्लास साठी सुट्टी घेतली आहे . तेव्हा तुम्ही त्याला म्हटले होते , तो बोलणारा नाही तर करणारा आहे. हे ऐकून मला अभ्यासासाठी अजून हुरूप आला होता.
सुरवातीला ३ महिन्यान मध्ये बाक चे prerequisites बाक झाल्यावर 😁 , सुमिताभा दास आणि W Richard Steven करण्याचा प्लान होता. सुमिताभा दास करत करत बुक शेवटच्या २ system programming चे chapters करत असताना हे लक्षात आले कि आपल्याला C सुद्धा revise म्हणा वा परत नीट शिकावे लागणार आहे हे लक्षात आले. हे करत असतानाच घरी घरी होतो आणि आपला क्लासही सुरु नव्हता, या काळात motivation कमी झाले होते आणि असे वाटायला लागले होते के कधी एकदा आपला SDK चा क्लास सुरु होतोय तुम्हाला भेटून पुन्हा त्या वातावरनात येतोय.
१५ जून ला आपला क्लास सुरु झाला आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला पाहून आणि ऐकून पुन्हा motivation १००% झाले. तुम्ही सांगितले कि SDK ,COM ला आपल्याला C आणि Balgurusammy पर्यंतचे C++ येणे आवश्यक आहे. Stevens लाही C लागणारच होते. तुम्ही पुस्तके पण सागितली होती. त्यानुसार पहिल्यांदा K & R घेतले करायला. तुम्ही म्हणता तसे पुस्तक जेवढे छोटे तेवढे समजायला अवघड याची प्रचीती K & R मधील exercises नुसत्या वाचताना आली. K & R चा १ पास जमेल तेवढ्या exercise करून पाहिल्या. याचा उपयोग Petzold वाचताना आणि आपल्या क्लास मध्ये शिकताना झाला.
पुढे लगेच Balagurusamy करायला घेतले आणि ते पूर्ण केले. हे technical reading सुरु असताना अवांतर वाचनाचा भाग म्हणून तुम्ही आणि madam नी suggest केलेले अप्रतिम “Atlas Shrugged” मराठीतून वाचले. या पुस्तकातून आपल्या कामातील excellence महत्व नव्याने समजले आणि मनात जास्त मुरले. पैसा कमवावा तर तो या मार्गाने आणि याचे ज्वलंत उदाहरण तुमच्या रूपाने समोर होतेच.
हे करता करता ३ महिन्यांची सुट्टी केंव्हा संपत आली हे कळले पण नाही. सुट्टी तच हे उमगले होते ३ महिने पुरणार नव्हतेच. सुट्टी च्या शेवटी सुट्टी बऱ्यापैकी productive राहिली असे मला आणी luckily घरच्यानाही वाटले. सगळे ठीक होत आहे आणि आपण करू शकतो असे वाटल्याने हाच pace continue करण्यासाठी अजून ५ महिने सुट्टी वाढविली.
इकडे, माझे Balagurusamy पूर्ण झाल्यवर क्लास मध्ये COM सुरवात झाली होती. योग्य वेळ मिळत असल्याने Win३२ आणि COM चे प्रोग्राम पुन्हा पुन्हा करून पाहता आले आणि त्यांचे insights समजून घेता आले. COM सुरु असताना Dale Rogerson वाचले आणि तुम्ही घेतलेल्या प्रोग्राम्स शी map केले. या पुस्तका आणि आपल्या notes मुळे, आपला Exe Server चा प्रोग्राम चांगला समजून आणि त्यावर प्रोजेक्ट करता आला. हे सुरु असतानाच विश्वास पाटलांचे “महानायक” वाचले. WinRT चे प्रोग्राम करत असताना आणि आपली batch संपत असताना गोडबोले सरांचे बोर्डरूम पुस्तक वाचले.
आपली SDK COM ची batch संपत असतानाच समजले होते कि योग्य वेळ दिला तर गोष्टी छान शिकता येतात , hands on करता येते. याची पावती तुम्ही वेळोवेळी दिलीच होती. त्यामुळे एक समाधान वाटत होते. यामुळेच संधी असताना आपली बाक ची batch पुन्हा जॉईन करून चांगले शिकत येईल हे निश्चित केले.
याच काळात आपल्या योगेश्वर शुक्ल सरांची असेम्ब्ली च्या क्लास ची माहिती मिळाली. core नीट समजून घेण्याचे पक्के केल्याने मी त्यांच्या कडे असेम्ब्ली शिकायला माझी बहीण प्रभा सोबत जायला लागलो. असेम्ब्ली शिकताना जे काही internals चे “खूल जा सीम सीम ” झाले त्यामुळे खूपच भारी वाटत होते. Confidence सही वाढला . आणि तुम्ही म्हणतात तसे COM चे प्रोग्राम्स नीट केल्यावर बाकी कोणतेही प्रोग्राम्स अवघड जाणार नाही याची प्रचिती आली. असेम्ब्ली चेही प्रोग्राम्स मन लाऊन केले. वेळ देत आला आणि त्याचा खूप फायदा बाक पुन्हा नव्याने समजून घेताना झाला. योगेश्वर सर असेम्ब्ली उत्तम घेतात; खरच!.
SDK COM शिकताना , थोडेफार system प्रोग्रम्मिंग करताना हे लक्षात आले होते कि एकदा language च्या syntax चे barrier cross झाले कि ready -made APIs वापरणे सोपे आहे. आपल्या प्रोजेक्ट/प्रोग्राम मध्ये जान आणणारे काही आहे तर ते algorithms. Data structures आणि algorithms चे महत्व पटल्यावर ते शिकायचे ठरविले. योगायोगाने योगेश्वर सरांनी DS and adv. algorithms ची batch असेम्ब्ली च्या parallel सुरु केली होती. पहिली वाहिली batch. मी ती पण जॉईन केली.😁
आत्ता एकावेळी ३ क्लास्सेस सुरु झाले होते. आपला बाक, असेम्ब्ली आणि algorithms. हे सगळे नीट शिकायला वेळ तर द्यावा लागणार होता . आणि आत्ता पर्यंत घेतलेली सुट्टी मला लोकांसाठी higher education सारखी आणि मला engineering पुन्हा नीट करायला लागल्यासारखी सारखी वाटू लागली होती. हे ३ क्लास्सेस नीट जमविण्यासाठी, उरले सुरलेले कंपनी चे सुट्टी चे लिमिट वापरून अजून ४ महिने म्हणजेच एप्रिल end २०१६ पर्यंत घेतली .
बाक च्या क्लास वरून आल्यावर क्लास मध्ये तुम्ही घेतलेले वाचायचे आणि इतर वेळ हा असेम्ब्ली चे आणि DS चे algorithms implement करण्यात द्यायचो. DS शिकत असताना योगेश्वर सरांनी computer science, वेगवेगळ्या scientists,universities आणि त्यांचे चालणारे research बद्दल सांगितले. एक वेगळेच field open झाले आणि technology ची backbone समजली . Computer science आणि engineering मधील खरा फरक मला तेंव्हा कळाला.
Algorithms चे analysis शिकत असताना mathematics चा science मधील अमुल्य वाटा आणि mathematics चे महत्व तुम्ही OpenGL ने दाखवून दिलेच होते पण इथे गाडी अडल्यासारखे झाले आणि पुन्हा सगळे गणित नव्याने शिकावे असते प्रकर्षाने वाटू लागले.त्यानुसार analysis साठी लागणारे सरांनी सांगितलेले Discrete mathematics by Rosen चे पुस्तक आणले पण आणि सुरूही केले. पण limited सुट्टी आणि maths ला लागणारा वेळ विचारात घेता , थोडा practical विचार करून ते पुस्तक तिथेच थांबविले पण नंतर भविष्यात ते पुन्हा सुरु करून व्यवस्थित वेळ देण्याचे ठरविले आहे.
त्यानंतर मी भर हा Data structures आणि त्यांचे algorithms implement करण्यावर दिला. हे करत असतानाच शिकलेले algorithms पैकी Binary Search Tree चा, शिकलेले Win३२ वापरून त्याचे traversals आणि operations graphically animation ने दाखाविणारे application, C वापरून तयार केले आहे.
याच application चे extension म्हणून असा प्रोजेक्ट आपण C++ वापरून बनवू कि जो real world data होल्ड करेन e.g. employee records आणि त्याचे operations visually दाखवेन . असा generic बनवू कि तो कोणत्याहि क्लास चा object होल्ड करेन आणि नंतर कोणत्याही tree चे implementation त्या मध्ये add करता येईल असे architecture ठेवू. या प्रोजेक्ट ची development सुरु आहे.

आत्ता आपली बाक ची batch आणि सुट्टी संपत आली आहे. आपल्या event चीही तयारी सुरु आहे .आपल्या event नंतर लगेचच म्हणजेच २ मे ला कंपनी जॉईन करायची आहे. या १ वर्षाच्या सुट्टीत बऱ्याच गोष्टी शिकलो जरी असलो तरी त्या गोष्टीं मला पूर्ण वेळ देऊन अजून न्याय देता आला नाही असे मला वाटते. तुम्ही मला सांगितलेल्या सगळ्या assignments लक्षात आहेत आणि मी त्या पूर्ण करणार आहे. सुट्टी होती तोपर्यंत सगळे जमू शकले पण माझी खरी परीक्षा कंपनीत काम करून आणि आपल्या क्लास चे वातावरण नसतानाही अभ्यास, प्रोग्रम्मिंग सुरु ठेवण्यात आहे. १ वर्षा मध्ये जे काही शिकलो, अनुभवले त्यावरून motivation आत्ता matured झाले आहे असे मला वाटते. त्यामुळे पुढची परीक्षा तुमच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली मी नक्की पास होईल अशी प्रबळ आशा आहे.
या सुट्टी मध्ये मी technical बरोबरच बऱ्याच इतरही खूप गोष्टी शिकलो. घरच्यांना वेळ देता आला. अवांतर वाचता आले . सुट्टी च्या निर्णयामध्ये आणि काळात प्रभा चा खूप support मिळाला . मला तर असे मनापासून वाटते कि एखाद्याने MS वा higher education करण्यापेक्षा पूर्णपणे २ वर्ष तुमच्याकडे,योगेश्वर आणि पियुष सिरांकडे शिकावे. २ वर्षा नंतर जेव्हा तो बाहेर पडेल तेंव्हा त्याला भविष्यात उत्तम काम करताना आणि पैसे कमविताना कसलीही अडचण येणार नाही. मला तुम्ही SDK च्या batch ला सी. रामचंद्र आणि पंडित वसंतराव देशपांडेचे या दोघांना त्यांच्या गुरुंनी शिकविलेला एकच राग म्हणजे; मारवा चे दिलेले उदाहरण आठविते. मी तसाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे तुम्ही दिलेले ज्ञान आणि संस्कार आम्हाला भावी आयुष्यात कुठेही कमी पडून देणार नाही.
तुम्ही म्हणतात तसे आपल्या मुलांना स्वतःच शिकवा. मग ते आपोआपच उत्तम घडतील. हे मुल्य आणि basics पक्के असण्याची जाणविलेली गरज याची सांगड म्हणजे मुलांसोबत तुम्हीही सगळे शिका. सगळे पुन्हा करणे आत्ता शक्य वाटत नसले तरी मुलांसोबत त्यांच्या pace ने आधी तुम्ही शिका मग त्यांना शिकावा. दोन्हीही फायदे होतील.
मला हे पक्के उमगले आहे तुम्ही म्हणता तसे, एक चांगले शिक्षकच चांगले शिक्षक आणि चांगले पाल्य तयार करू शकतो.सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही योगेश्वर शुक्ल आणि पियुष सारखे उत्तम शिक्षक तयार केले आहे.मस्त शिकवितात ते. मलाही शिकवायला खूप आवडेन. पण अजून मी शिकविन्याच्या योग्य झालो नाही असे मला वाटते. अजून खूप काही शिकायचे आहे. पण back ऑफ द mind मध्ये teaching करणे हे पक्के झाले आहे. हळू हळू त्याची सुरवात कंपनी,अभ्यास आणि बाकी गोष्टी manage करून करायची आहे.

मला तुम्हाला हे सगळे सांगायचे होते पण असे वाटायचे कि मी हे करतोय, ते करतोय असे सांगण्या पेक्षा आधी काम,results मग बडबड. त्यामुळे मी सुट्टी मध्ये केलेले थोडेफार कोडींग चे output दाखविल्यावारच सांगू असे वाटायचे पण आपल्या event च्या आधी हे results हे कंपनी मध्ये काम करता करता केलेले नसून सुट्टी मध्ये शिकता शिकता केलेले आहे हे आधी सांगणे जास्त गरजेचे वाटले. मला तुम्हाला सुट्टी वाढविल्याचे late सांगितल्याची खंत मनात आहे. पण तुम्हाला न सांगून, तुम्हाला सांगण्यागोग्य बनण्यासाठी मी पुश करत होतो/असतो. कट्ट्यावर मी योग्य वेळ शोधत होतो but मला ती मिळत नव्हती. म्हणून मेल वरून बोलायचे ठरविले .कदाचित, एवढे सगळे कट्टयावर बोलता आले नसते.
एकंदर हे सगळे पाहता , मला पुढच्या वाटचाली साठी मला मार्गदर्शन करा कि ज्यामुळे माझ्या हातून चांगले काहीतरी घडेल आणि तुमचा अजून स्नेह लाभेल.

आपला,
जीवन

9


Ashutosh Wakhure

UNIX 2015

आनंदाश्रमी | पाहिला मी गुरु |
आनंद अंतरु | धन्य झालो ||

देवाचिये पायी | ठेविला मी माथा |
अरे जगन्नाथा | दाविली वाट ||

अवघे आयुष्याचे तप | अज्ञान-असत्य संताप |
उरी लागे जरी धाप | न थांबवेना तुम्हाला ||

आशीर्वाद तुमचा बोध तुमचे | अनुभवाचे बोल तुमचे |
ज्ञान-सज्ञान सखोल तुमचे | प्रयत्ने चालू वाट अवघी ||

तुम्हीच आमचे प्रेरणास्थान | ऐकता तुम्हा हरपते भान |
आमच्या जीवनाची तत्त्वकमान | आता आम्हा न रोके कोणी ||

मास्टर अन मास्तर | ज्ञानविश्लेषक प्रखर |
आणला बहुजीवनास बहर | ज्ञानवलयाने तुमच्या ||

विद्यार्थी व्हावे शिक्षक | परि शिक्षक सदा विद्यर्थ्यक |
दंभ नसावा नाहक | क्रीयेवीन कुणाला ||

आम्ही चुके लगेचि टाप | गुणार्थक करिता थाप |
निश्चय अन कष्टाचे माप | घेउनि चाली सदैव ||

कशी मायाळू माउली | जणू ‘सरां’ची सावली |
ती कधीना खचली | पाठीशी उभी खंबीर ||

भावनेचे बंध | भाषा नसे बांध |
ज्ञानगुरुबंध | नकळत बोलती ||

नका पाहू तुम्ही | त्यांस भिंगातुनी |
हे येरागबाळाचे काम नाही ||

मराठी हि माझी सर्व भाषा सामावती |
हसती खेळती सर्व भावंडा संगती |
बागडता तुम्ही मराठी मातीत |
नका घालू तिला असे हो मातीत ||

नाव करुनी वजा | फक्त विद्यार्थी समजा |
घेतो आता रजा | भावपुष्प समर्पुनी ||

| गोखले सरांस प्रणाम |

8


Sopan Patil

SDK 2012, UNIX 2013

7


Anonymous

माझ्या ‘Expression’ ला सुरू करण्यापूर्वी , तुम्हाला एक प्रश्न कदाचित पडला असेल की या Expression ला नाव का नाही? म्हणजे कोणी लिहिलंय हे सगळ्यांना का दाखवलं नाही? तर त्याचं उत्तर तुम्हाला Expression मधील घटना वाचत असताना आणि संपल्यावर नक्कीच मिळेल. अजुन एक म्हणजे, खाली लिहिलेल्यापैकी अनेक घटना कदाचित तुम्हाला काल्पनिक वाटतील आणि ते वाटणं साहजिकच आहे कारण माझ्या घरच्यांना आणि मलाही याबद्दल आश्चर्यच वाटतं. पण यातला एकही शब्द काल्पनिक नाही. तसं असतं तर माझ्यासारख्या ‘शून्या’ चं ‘Expression’ या ‘AstroMediComp’ वर आलंच नसतं.

तर सुरवात करतो….

गोखले सर माझ्या आयुष्यात 2010 साली म्हणजे 5 वर्षापूर्वी आले पण फक्त ऐकीव रूपात. साक्षात दर्शन झालं खूप उशिरा 2014 ला. म्हणजे 2010 ते 2014 ते माझ्या आयुष्यात होते, पण द्रोणाचार्यांसारखे. (शिष्याचा अंगठा कापून घेणारे द्रोणाचार्य नव्हे, तर एखाद्याच्या आयुष्यात फक्त अस्तित्वाने प्रकाश आणणारे द्रोणाचार्य). काय आणि कसं झालं सांगतो.

मी आमच्या भागामधे एका बर्‍या कॉलेज मधे BCS केलं (CET मधे कमी मार्क्स पडल्यावर लोक म्हणतात BCS करावं). जे केलं ते रडत खडत म्हणजे काठावर पास होत, backlogs ठेवत, कॉप्या वगैरे करत. दर आठवड्याला एखादा पिक्चर बघायचा, इकडे तिकडे भटकायचं यात दिवस घालवले. (माझं Love Marriage आहे, त्याची सुरवात पण तिथूनच झाली म्हणजेच त्यातही बराच वेळ घालवला ,अगदी सर म्हणतात तसं ‘Passionately’, असो) म्हणजेच काय तर BCS ला admission घेऊन आपल्याला पुढे काय करायचंय याचा कुठलाही पत्ता नव्हता. पुढचं सोडा, ‘IT’ या क्षेत्रात नेमकं काय करतात हे तेव्हा माहीत नव्हतं, त्या क्षेत्रात आपल्याला job करायचा असतो हे माहीत नव्हतं. तिथे C, C++ वगैरे languages मधे ‘programming’ करायचं असतं हे माहीत नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं. (जर कोणाला असं वाटत असेल की कॉलेज ने हे सगळं सांगितलं नाही का? तर मला वाटतं हा प्रश्नच invalid आहे atleast BCS पुरता. कारण तिथे ‘C’ FY ला आणि त्याची ‘Toolchain’ TY ला शिकवली जाते. आणि तरीही कॉलेज ने सांगीतलंच तरी ते ऐकायला आम्ही कॉलेज मधे असायला पाहिजे ना? पुन्हा असो) आणि त्यामुळे C, C++ या दैवी languages मी 8 वी, 9 वी च्या इंग्लीश-मराठी सारख्या शिकलो (म्हणजे पेपर झाल्यावर त्यांचा, आपला काय संबंध? या अविर्भावात) याचा परिणाम जो व्हायचा होता तोच झाला. BCS चा माझा result असा लागला.

C – 34/80 (Passing – 32)
C++ – 16/40 (Passing – 16)
Data Structures – 11/40 म्हणजेच Backlog (Passing – 16), आणि दुसर्यांदा 16/40 (काठावर पास).

बरं, तरीही या सर्वांची लाज नाही वाटली. कारण यावर आपलं भवितव्य अवलंबुन आहे हे माहीतच नव्हतं. TY ला project (उचललेला) आणि practicals चे मार्क(कॉपी केलेले) यांनी तारलं आणि पास झालो. आता confusion, MCS(2 वर्ष) की MCA(3 वर्ष). असंही, लवकर शिक्षण पूर्ण करून काय करणार होतो आणि कुठल्यातरी बाजूला ठाम असावं म्हणून MCA करायचं ठरलं, खरं तर BCS चा portion MCA च्या FY ला पुन्हा असतो, तेवढंच जरा सोप्प जाईल(??) हे पण एक कारण .(अस वाटलंच कसं तेव्हा हे मला आत्ताही नाही कळत).

मग बाकीच्या मित्रांबरोबर आमच्या कॉलेज ची आणि पुण्यातल्या एका नामवंत कॉलेज ची MCA ची entrance exam दिली. आणि पुण्यातल्या त्या कॉलेज ची entrance exam पास झालो.(तो पूर्णपणे मटका होता, Maths च्या सगळ्या 20 questions ला ‘c’ हाच option लिहिला होता). त्या कॉलेज मधे शेवटून दुसरं admission भेटलं.

MCA-FY(2010) ला असताना ‘Railway Station’ ला जुन्या कॉलेज ची एक मैत्रीण भेटली आणि गोखले सरांचा माझ्या आयुष्यात ‘पहिला’ प्रवेश झाला. तिने बोलता बोलता मला सरांविषयी सांगितलं, ती सरांची student नव्हती म्हणजे तिने जे ऐकलं होतं बाहेरून, ते ती मला सांगत होती. मला एवढं कळालं की असा असा एक कोणीतरी ग्रेट माणूस चांगलं शिकवतो, 4 च तास झोपतो वगैरे वगैरे अनेक गोष्टी समजल्या (Astro आणि Medi तेव्हा कळालं नव्हतं, फक्त Comp समजलं). त्या दिवशी एका न पाहिलेल्या व्यक्तीविषयी मनात आदर निर्माण झाला. मात्र त्या व्यक्तीकडे शिकायला आपण पण जावं कधीतरी अशी इच्छा मनात नाही आली, तसा विचार पण तेव्हा नाही आला. कारण तशी शिक्षणाबद्दलची मानसिकताच अजुन तयार झाली नव्हती, अजुनही मी माझ्याच दुनियेत होतो. तुम्हाला खोटं वाटेल, मला viva ला question विचारला होता की ‘structure हा कुठला datatype आहे?’ मला हे ही माहीत नव्हतं की structure ‘datatype’ आहे पण question च तसा असल्यामुळे हे कळालं की structure ‘datatype’ आहे पण मी उत्तर दिलं होतं ‘माहीत नाही’. आणि ती viva होती MCA ची, म्हणजे मी C language दोनदा शिकूनही मला हे येत नव्हतं. असो, तर त्या मैत्रिणीशी बोलताना न पाहिलेले सर माझ्या आयुष्यात आदराने आले आणि फक्त आले. पुढची काही वर्ष काहीच झालं नाही.

पुण्यात शिकायला आल्यावर अभ्यासाची maturity यायला लागली होती. कारण पुण्यात शिक्षणाबद्दलची जागृती बरीच होती. MCA ला आम्हाला WIN32-SDK विषय होता (2011). त्या विषयासाठी वर्गातल्या काही मुलांनी क्लास लावला. तो क्लास म्हणजे ‘गोखले सरांचा क्लास’ हे जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या डोक्यात ‘त्या’ मैत्रिणीने सांगितलेलं सगळं पुन्हा आलं आणि मला पण क्लास लावायचाय असं मी त्या मुलांना सांगितलं पण ‘admissions full’ असं कळलं. म्हणजे माझी ती संधी गेली. नंतर UNIX च्या बाबतीत (2012) ही हेच झालं. तेव्हा मला खरं तर खूप उशिरा कळालं होतं आणि तरीही चुक माझीच होती कारण उशिरा कळूनही मी थोडा निवांत राहिलो. आणि batch full झाली. ती पण संधी गेली. म्हणजे आता सरांचा क्लास लावण्याचा संबंध संपला असं वाटलं कारण एकदा कॉलेज संपल्यावर कोणी क्लास का करेल? असं तेव्हा वाटायचं. आणि म्हणून मी सरांचा नाद सोडला.

SY Second Semester (2013) ला असताना ‘placement’ चं वादळ आलं. चर्चा व्हायला लागल्या. मी त्यात कुठेच नव्हतो. कसा असणार? अजूनही “ ‘if’ च्या खालचा सगळा code हा ‘if’ चाच असतो जोपर्यंत ‘else’ येत नाही तोपर्यंत” असं मानणारा मी कसा काय या वादळात अडकणार? आपण आपलं बाजूला राहिलेलं बरं. (‘else’ पुढे आलाच नाही तर? असा प्रश्न पडण्याइतकीही अक्कल नव्हती) वाचून हसायला येत असेल ना? मला ही येतंय पण लाजिरवाणं. आता प्रचंड लाज वाटते पण दुर्दैवाने तेव्हा वाटत नव्हती. निघालीच आहे लाज तर MCA चे marks पण सांगून टाकतो.

C – 40/100 (Passing – 40)
C++ – 54/100 (Passing – 40)
Data Structures – 49/100 (Passing -40)

असो, placement चं वादळ अजुन जवळ येत असतानाच, कोणीतरी ‘पियुष सर’ असा मुलगा placement साठीचे क्लासेस घेतो असं मुलांकडून कळलं. हे ज्याने आम्हाला सांगितलं त्याला माझा मित्र असं बोलला होता की ‘कोण पियुष?’, ‘असले placement चे कुठे क्लासेस असतात का?’, ’जे आम्ही 6 वर्षात नाही शिकलो ते तो आम्हाला 4 महिन्यात शिकवणार का?’ आणि हे सगळं मला ही पटलं तेव्हा. (हे लिहिताना पण त्रास होतोय आता, पण तेव्हा बोलताना नाही झाला). हे बोलल्यावर मुलांनी हे सांगितलं की ‘पियुष हा गोखले सरांचा विद्यार्थी आहे’, आणि त्या दिवशी गोखले सर आयुष्यात पुन्हा आले. मी पियुष सरांचा क्लास लावला.

आता सगळंच वेगळं घडलं, खूप आहे पण छोटं करून सांगतोय.

मी पियुष सरांकडे ‘Pre-Placement’ ची बॅच लावली(2013). त्याच्या पहिल्या lecture ला सरांनी ‘Toolchain’ शिकवली. तेव्हा पहिल्यांदा कळलं की C language मधे लिहिलेला एखादा program नक्की काय करतो. नंतर HARDDISK, RAM बद्दल कळलं. त्या दिवशी मला toolchain ने अक्षरक्ष: वेड लावलं. आयुष्यात पहिल्यांदा मला अभ्यासाबद्दलचे प्रश्न पडायला लागले कारण मी विचार करायला लागलो. मला सगळंच आवडायला लागलं, सरांनी ‘C’ साठीचं पुस्तक सांगितलं ‘Programming in C by Ajay Mittal’. मी ते वाचायला घेतलं. मी ‘C’ खरच तेव्हा पहिल्यांदा करत होतो. मला ‘C’ प्रचंड आवडलं. मला ‘C’ ने झपाटलेलं असतानाच एक आयुष्याला वळण देणारी घटना घडली.

कॉलेज नामांकित असल्यामुळे placement साठी कंपन्यांची कमी नव्हती. पण criteria मधे बसत नव्हतो. त्यातही माझी एका ‘No criteria’ वाल्या PHP च्या कंपनी मधे placement झाली (कंपनी आता बंद पडली). मला PHP पण येत नव्हतं. Interview मधे मला hobbies विचारल्या, मी ‘Reading books’ सांगितलं. त्यांनी मला पुस्तकांविषयी विचारलं. मी त्यांना ‘छावा – शिवाजी सावंत’ पूर्ण सांगितलं हिंदी मधून. त्यांना मी सांगितलेली ‘छावा’ कादंबरी आवडली आणि माझी placement झाली. मला अजूनही हसायला येतं त्या interview विषयी. आणि मी तरीही ती कंपनी join केली, त्याची कारणं अनेक होती, त्यातल महत्वाचं कारण असं की मला माझ्यावर विश्वास नव्हता.

कंपनी ने आधी सांगितलं होतं की PHP मधे ‘development’ चं काम मिळेल पण दिलं मात्र WordPress वर वेबसाइट चा UI बनवण्याचं काम. माझा ‘C’ चा अभ्यास आणि सरांचा क्लास चालूच होता. मी ‘C’ मधे बुडत चाललो होतो, जस जसा ‘C’ बद्दलचा आणि स्वता:बद्दलचा विश्वास वाढत चालला होता तस तसा मी कंपनी मधे अस्वस्थ होत चाललो होतो. कारण कंपनी चं काम म्हणजे Photoshop software वापरल्यासारखं काम होतं. मी ते उत्तम करत होतो. माझं कौतुकही होत होतं. कॉलेज मधेही कंपनी ने माझ्या कामाविषयी सांगितलं होतं. पण मी खुश नव्हतो. दिवसा दिवसाला ‘C’ बद्दल कळत होतं आणि दिवसा दिवसाला माझी अस्वस्थता वाढत होती. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी होत होतं. ‘Frustration’ या शब्दाचा अर्थ पुरता कळत होता.

शेवटी माझी मन:स्थिती इतकी वाईट झाली की मला आता हे कोणाशी तरी बोलणं आणि मार्ग काढणं भाग होतं, जीव गुदमरत होता रोजच. तेव्हा तोच एक माणूस मला आधार वाटला. ‘पियुष सर’. मी हे सर्व पियुष सरांना सांगितलं mail वर (माहीत नाही मला भीती वाटते ग्रेट लोकांसमोर बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची). त्यांनी मला फोन केला, विचार करून निर्णय घ्यायला आणि कॉलेज च्या ‘placement coordinator’ शी बोलायला सांगितलं. माझा निर्णय झाला होता त्यामुळे विचार करण्याचा प्रश्न नव्हता. मला बेरोजगार राहिलेलं चालणार होतं पण मला आता ‘C’ सोडून काम करायचं नव्हतं.

13 ऑगस्ट 2013, सोमवार, मी ऑफीसला न जाता आमच्या placement coordinator ला माझा निर्णय सांगायला कॉलेज मधे गेलो. कॉलेज च्या gate पासून ते त्या व्यक्ती च्या cabin पर्यंत जाताना मला कंपनी न सोडण्याचे अनेक सल्ले भेटले काही मित्रांकडून, कॉलेज ने दिलेली कंपनी सोडणे हे त्यांच्यासाठी धक्कादायक होतं कारण त्याचे परिणाम माझ्यासकट सर्वच जाणून होते. शेवटी मी त्यांच्या cabin मधे गेलो. बाहेर आलो ते 3 तासांनी. ते 3 तास मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही… त्या 3 तासात माझा प्रचंड अपमान झाला. आतमधे ती व्यक्ती, आमचा CR, त्याचा मित्र असे 3 जण होते. मी माझं मत सांगितल्यानंतर ती व्यक्ती खूप काही बोलली, ‘ज्या C मधे तुला काम करायचंय त्यात तू BCS आणि MCA ला काठावर पास आहेस कळतंय का?’, ’कितीतरी students ना जॉब मिळत नाही म्हणून माझ्याकडे येतात, रडतात आणि तू हातातला सोडतोय.’, ‘तू स्वत:ला फार शहाणा समजतोस का?’, ‘तुझी लायकी आहे का?’ या आणि अशा अनेक वाक़यांमधे ती व्यक्ती आणि बाकीचे दोघं माझ्याशी बोलत होते आणि मी फक्त भरलेल्या डोळ्यांनी एवढंच म्हणत होतो की ‘मला त्या कंपनीमधे काम करायचं नाही.’ शेवटी तेच थकले. मला मूर्ख ठरवून मोकळे झाले. आणि मला 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊन application द्यायला सांगितलं की ‘कॉलेज ने दिलेली placement मी सोडत आहे, इथून पुढे कॉलेज मला placement देणार नाही, याला मीच जबाबदार आहे’.

हे सगळं होऊन 3 तासांनी जेव्हा बाहेर आलो तेव्हा कुठेतरी आधीचा confidence गेल्यासारखा वाटला कारण एवढा आणि अश्या शब्दांत अपमान झाला नव्हता कधी, आणि ‘ती व्यक्ती’ बोलली ते सगळंच खोटं होतं असं ही नाही. आणि खरंच मी चुक करतोय की काय असं वाटायला लागलं. आणि असं वाटणं हे तर अजुनच वाईट होतं. आधीपेक्षाही वेगळ्या अवस्थेत मी गेलो. बाहेर मला सगळ्यांनी कंपनी सोडू नको असा सल्ला पुन्हा दिला. मी आतून पूर्णपणे हललो होतो. मला एकच प्रश्न होता की जे मला वाटतंय की मी हे करू शकतो ते मी खरच करू शकतो का? म्हणजे हा confidence आहे की over-confidence?

शेवटी मी पियुष सरांना फोन करून भेटण्याची विनंती केली आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता भेटायला गेलो. जेव्हा सर भेटले तेव्हा 5 मिनिट मी फक्त रडलो, मला शब्दच फुटत नव्हते. नंतर त्या दिवशी cabin मधे जे काही झालं, मला नेमकं काय करायचंय हे सगळ सरांना सांगितलं. तेव्हा सरांनी मला पाठिंबा दिला. आणि सर आधार देताना एक वाक़य बोलले की “तू हे नक्कीच करू शकतोस, आणि तू कंपनी सोडतोय याचं वाईट वाटून घेऊ नकोस, तू ‘XYZ’ सोडून आलाय, ‘PQR’ सोडून आला नाहीयेस“. त्या दिवशी अचानकपणे ‘PQR’ माझं स्वप्न बनलं. आणि मी पेटलो.

कॉलेज मधे मला कंपनी सोडल्याबद्दल ‘त्या’ व्यक्तीकडून, काही मित्रांकडून टोमणे मिळत होते, काही मित्र ‘त्या व्यक्ती’ च्या भीतीपोटी माझ्यापासून लांब गेले. इकडे माझा ‘C’ चा अभ्यास मी त्या घटनेनंतर एक महिन्यात बर्‍यापैकी केला. ‘C’ इतकं आवडलं होतं की मला आता हे कोणाला तरी सांगावंस वाटत होतं. योगायोग असा, मी सहज माझ्या एका मैत्रिणीला mobile chat करताना ‘C’ कोणालातरी सांगण्याची इच्छा बोलून दाखवली. लगेच तिने मला विचारलं की “माझ्या बहिणीला शिकवशील का, ती BCS 1st Year ला आहे?” मी बोललो चालेल, मी तिच्या घरी जाणार होतो शिकवायला. 2 दिवसांनी मला कळलं की तिच्या बहिणीच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना पण शिकायचंय. मग माझ्या घरी यायचं ठरलं. आणि आमच्या घरी 28 सेप्टेंबर 2013 ला 8 मुलींची ‘C Batch’ चालू झाली. मला त्या बॅच कडून खूप शिकायला मिळालं. त्यांच्या त्या basic doubts मुळे आणि सगळ्याच बॅच मुळे. मी ‘C’ नंतर ‘Data Structures’, ‘C++’ चा अभ्यास केला. आणि त्या आणि त्यांच्या reference ने आलेल्या मुलांना मी ते ही माझ्यापरीने शिकवलं. त्यांना ते आवडलं. त्यांना मी गोखले सरांचे, पियुष सरांचे अनेक संस्कार देण्याचे प्रयत्न केले. अजूनही मी गोखले सरांचा student बनलो नव्हतो, ते माझ्या आयुष्यात होते पण त्यांना अजूनही पाहिलं नव्हतं. कारण ‘C Batch’ चालू झाल्यानंतर 2 महिन्यांनी मला मुंबई ला ‘C Developer’ असा जॉब मिळाला. मी तिकडे होतो. पण गोखले सरांबद्दल सगळीकडून ऐकायलाच खूप मिळालं होतं, त्यामुळे संस्कार कळत चालले होते. त्यांचे वेध आणि वेड दोन्ही लागले होते.

मधल्या काळात मी आणि होणार्‍या बायकोने सरांचे ‘Computer Fundamentals’ आणि ‘OS seminar’ केले PVG(2014) ला. तेव्हा त्यांचं साक्षात दर्शन पहिल्यांदा झालं, मी देव ’याची देही, याची डोळा’ पाहिला, पण लांबून. आणि आता जवळून देव पाहायचा होता. देवाकडून आयुष्य शिकायचं होतं. आणि UNIX-2014 लावायचा निर्णय घेतला.

मुंबई ला Monday-Friday जॉब आणि Saturday-Sunday घरी येऊन क्लास. असं 1 वर्ष चाललं. पण नंतर त्या दगदगीमुळे शरीराने साथ दिली नाही, आजारी पडलो. आणि मुंबई चा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला दुसरा जॉब हातात नसताना. January,2015 ला मी परत तो जॉब सोडून येणार होतो आणि गोखले सरांची ‘UNIX-2014 Batch’ चालू होणार होती 15 December, 2014 ला. मला पहिले 6 lectures ऐकायचेच होते आणि ते ही LIVE (recordings मधून नाही). कारण माझी priority आधी सर आणि मग UNIX अशी होती. फक्त याच कारणासाठी मी तेव्हा क्लास लावला नाही. वाईट खूप वाटत होतं म्हणजे मीच माझ्या मित्रांना भांडून भांडून पाठवलं होतं सरांकडे ‘UNIX-2014’ ला आणि मलाच जमणार नव्हतं. पण 1 वर्ष माझ्याच्याने थांबवणार नव्हतं. ते पाय मला जवळून पाहायचे होते. मी ‘WinRT-2015’ लावायचा निर्णय तेव्हाच घेतला. मला खरच Win32, COM, WinRT शिकायचं नव्हतं, मला फक्त सरांना ऐकायचं होतं आणि खरच मी तेच केलं. मी इतकं नाही शिकलो. मात्र मी सरांना खूप ऐकलं. पण मी शिकणार नक्की.

January, 2015 ते March, 2015 मी घरीच होतो. तेव्हा फक्त अभ्यास आणि क्लासेस चालू होते. मार्च मधे मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. मला ‘PQR’ मधे जॉब मिळाला. खूप आनंद झाला.

बस, इतकंच.

सध्या सरांचे संस्कार घेण्याचे, इतरांना देण्याचे प्रयत्न करतोय. ज्या विषयात माझे स्वत:चे backlogs होते, काठावर पास होतो तेच विषय आता शिकवताना आनंद आणि भरून पावल्यासारखं वाटतं. जी जागृती ते विषय शिकताना मला मिळाली नव्हती ती जागृती आता प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला खोटं वाटेल, जसं नाटकाच्या रंगमंचावर जाण्याआधी प्रत्येक नट त्याच्या त्या कर्मभूमीच्या पाया पडतो, तसं मी क्लास मधे येऊन शिकवण्याआधी पाया पडतो तेव्हा ते या माझ्या आयुष्यातल्या ग्रेट लोकांना असतं. आणि हे गोखले सरांना पाहिलंही नव्हतं तेव्हापासून. सरांनी दिलेल्या संस्कारांना मी कधीच विसरू नये, सरांना जसा शिक्षक अपेक्षित आहे तसं बनता यावं यासाठी असतं. मुलांच्या feedbacks मधे जेव्हा गोखले सर, पियुष सर यांची नावं येतात, त्यांच्या ‘मास्तर’ ला शिकवल्याबद्दल ते जेव्हा यांचे आभार मानतात तेव्हा वाटतं किती सुंदर झालंय हे सगळंच.

शेवटी मॅडम विषयी च्या ‘Expressions’, त्यांच्याविषयीचा वेगळाच आदर वाटतो. Admission च्या वेळी त्या जेव्हा म्हणतात ‘ये बाळा, तुझं नाव?’ तेव्हा त्यांच्या ‘बाळा’मधे ‘आई’ जाणवते. आणि एवढा मोठा ‘वटवृक्ष’ त्यांनी ज्या लिलयेने सांभाळलाय त्याला सलाम. सरांचे आणि मॅडमचे पाय जर माझ्यासमोर एकाच वेळी आले तर मी मॅडम च्या पाया आधी पडेल, कारण आमच्या सरांच्या पायांचं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी मॅडम च्या पायांची साथ महत्वाची होती आणि आहे. हे सगळेच ‘THE GREAT’ आहेत.

फक्त मॅडम विषयी एक तक्रार करायची होती, ती तक्रार ‘बाळाच्या’अधिकाराने तुमच्या समोरच सांगून टाकतो मॅडम ना, ‘लहान तोंडी मोठा घास’ पण राहावत नाही कारण कदाचित तुमची मतं आणि माझी तक्रार same असतील.

मॅडम, तुम्ही माझ्याशी पहिल्यांदा जेव्हा बोललात तेव्हा असं म्हणाला होतात की “अरे का सरांना ‘देव’ बनवता? जरा ‘माणूस’ म्हणून जगुद्या की.” खरं तर असं म्हणून, इतकं मोठं मन करून तुम्ही पुन्हा देवाच्याच रांगेत जाउन बसता. तरी मॅडम, माझे काही प्रश्न आहेत.

1. मला जेव्हापासून कळलंय तेव्हापासून मला हा प्रश्न पडलाय की “एखाद्या माणसाच्या हातात Computer क्षेत्रात पहिलं पुस्तक ‘The C programming language by K&R’ पडतं जे सगळ्यात अवघड मानलं जातं, ते तो वाचतो, वाचून त्याला ते समजतं, बर फक्त समजतच नाही तर ते वाचून ‘C Language’ वर प्रेम होतं (!), प्रेमच नाही तर पुढचं पण शिकू वाटतं, आणि फक्त वाटतच नाही तर तो माणूस खरंच पुढचं सगळं शिकतो. आणि धक्का म्हणजे हे सगळं करणारा माणूस ‘’डॉक्टर(माणसांचा)”, “ज्योतिषशास्त्री”, “नाटककार”, “आणि अजुन बरंच काही”. हे सगळं ‘दैवी’ नाही का वाटत? बर तरी मग आम्ही त्या ‘माणसा’ ला ‘देव’ का नाही म्हणायचं?

2. एखादा माणूस संकटात असेल तर तो आधारासाठी शेवटी देवाचा धावा करतो, मग त्याला आत्मबळ येत, देव त्याच्या पाठीशी आहे हे त्याला जाणवतं, त्या जाणिवेने तो त्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, आणि बाहेरही येतो. आणि त्याचं आयुष्य सुंदर बनतं. याहून वेगळं देव असं काय काम करतो? काहीच नाही. तर मग हेच आणि असंच काम जर एखादा ‘माणूस’ आम्हा विद्यार्थ्यांसाठी करत असेल तर आम्ही त्याला ‘देव’ का नाही म्हणायचं?

थांबतो,
2010 पासून सरांबद्दल फक्त ऐकलं होतं आणि चरणाशी गेलो मात्र 2015 मधे, याचा खेद वाटतो. आणि उशिरा का होईना पण ‘देव पाहिला’याचा आनंद ही वाटतो.

धन्यवाद.
एक शून्य.

6


Sayali Shenolikar

UNIX 2012, SDK 2013, WinRT 2014

मी पहिल्यांदा  class ला २ वर्षांपूर्वी आले. बऱ्याच लोकांकडून  ऐकलं होतं आपल्या class बद्दल . बाकी classes तसाच हा class! एवढी लोकं वेड्यासारखी ह्या class बद्दल का बोलतात हे कळायचं नाही . त्यात रात्रीचे timings आणि admission ला एवढी गर्दी ! Doubt होता की एवढं काय special आहे !

Admission झाली . पहिले lectures ऐकले . सरांची story ऐकली . सर नेहमी स्वतःची आणि त्यांच्या students ची story सांगतात . ते ऐकून समजले की  इथे marks, merit, placement ह्यापेक्षा knowledge , कष्ट आणि hands-on जास्त महत्वाचा आहे

मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी शिकले . Academics सोडून singing ,dancing ,harmonium, कविता लिहणं असे बरेच काही उद्योग केले . पण ते म्हणतात ना Jack of all trades and the master of none, तसं झालं होतं . सरांकडे बघून आश्चर्य वाटतं की एकच माणुस एवढं सगळं कसं काय करू शकतो .मला आठवतंय class च्या पहिल्या दिवशी घरी येऊन मी आई बाबांना म्हणले होते की “मला सरांसारखे वेडे व्हायचे आहे ….”
हे वाक्य (class मधील लोकं सोडून) कोणाला कळणार नाही . पण एखाद्या विषयाचं वेड लागणं काय असतं हे सरांनी शिकवलंय … Consistency शिकवली,
Computer वर प्रेम करायला शिकवलं …कष्टाला काहीही limit नसते हे ही शिकवलं  ….Academics बरीच लोकं शिकवतात , अभ्यास कसा करायचा हे सरांनी शिकवलं…. अभ्यासामध्ये येणारी मजा आता कळायला लागली . …शिकावं कसं आणि शिकवावं कसं हे class मध्ये येऊन समजलं….

सरांचा graphics चा demo बघितला . Computer Graphics हे एक Huge field आहे, आपणही हे करू शकतो हे माहितच नव्हतं .
सरांना मी सांगितलं , मला पण graphics शिकायचं आहे . मी ते करू शकते का नाही , हे मला माहित नाही . पण सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला  this was my motivation and my confidence. आपल्या गुरूने आपल्यावर विश्वास दाखवला ह्यापेक्षा मोठं कुठलंही award नाही ..!!!

जेव्हापासून class बरोबर attachment झाली आहे , तेव्हापासून एक hidden इच्छा / aim आहे … सर जेव्हा त्यांच्या students बद्दल बोलतात  , तेव्हा त्यांनी माझं नाव अभिमानाने  घ्यावं …. one day he should be proud of me…

फक्त सरच नाहीत तर class मधील students कडून सुध्दा खूप काही शिकायला मिळालं . मला आठवतं job नवीन नवीन चालू झाला होता .. आपल्याला काम छान जमतंय ह्याचा थोडा आनंद होता . class मध्ये सगळ्यांशी ह्याबद्दल बोलत असताना एका senior student नी आठवण करून दिली “काम छान चालू दे ,पण अभ्यास सोडू नकोस ,आणि कशाचाही गर्व होऊन देऊ नकोस “. “विद्या विनयेन शोभते” ह्याचे live examples class मध्ये रोज बघायला मिळतात!

class आणि सरांबद्दल ऐकून , सरांना भेटून माझे आई वडील खूप convinced होते . आता कोणासमोर सरांचा विषय निघाला तर आवर्जून सांगतात की “त्या class मध्ये एक चांगली पिढी घडत आहे . “

सरांना कधी Thank-you नाही म्हणू शकत . पण त्यांचासाठी एवढं नक्की करेन  – No Copy-paste, Hands-on आणि  कष्ट !!!
He has inspired us, given us the wings to fly and strong roots to stand on…
I am proud and happy to be his student and lucky to be part of this unique family!!!

5


Rupesh Shingavi

UNIX 2005 , SDK 2006

सरांच्या क्लास मध्ये Unix & Windows OS चे knowledge  मिळवण सोपं आहे, Technical doubt solve करण तर खूप सोप आहे , पण सरांन बद्दल express करण खुप अवघड आहे , कारण विषय खुप भावनिक आहे.

मी एक शिक्षक आहे, मी एक कष्टाळू developer आहे, माझ्या family साठी एक जबाबदार व्यक्ती आहे , या सर्व गोष्ठी एकाच वेळी करता येतात , ते फक्त सरांच्या संस्कारामुळेच. मला लहानपनापासून शिकवण (Teaching ) बदल खूप भीती होती  कारण लहानपनापासून आभ्यासाची (study) आवड नव्हती आणि लहानपनापासून stammering चा patient असल्यामुळे , लोक हसतील याची भीती होती.

मी एका सधन व्यापारी family मध्ये जन्माला आलो परंतु अचानक प्रतिकूल परस्थिती निर्माण झाली आणि BCS नंतर, २००५ साली पुण्याला येवून जॉब (Job ) करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश communication skills आणि technical knowledge शुन्य असल्यामुळे कुठेच जॉब मिळाली नाही. आयुष्यात ज्या गोष्टी ची सर्वात जास्त भीती होती तिच गोष्ट संधी म्हणून स्विकारली होती , ती म्हणजे ,Seed Infotech मध्ये शिका आणि कमवा (Learn & Earn )  या तत्वावर Teaching चा जॉब मिळला होता.

याच काळात मला सरांच्या क्लास बदल कळाल आणि मी २००६ च्या Unix batch ला admission घेतलं आणि आयुष्यात नकळतपने शिक्षणाची (Education ) ची सुरवात झाली.
“If  you can not avoid your rape then enjoy it ”
“नंगे से खुदा भी डरता है! ”
“खुद गब्बर!”

असे सरांचे विचार मनात खोल परिणाम (impact ) करायला लागले आणि आयुष्यात प्रतिकूल परस्थिती चे रुपांतर अनुकूल परस्थिती करण्याचे धाडस प्राप्त झाले .  याच मुळे मला ८ ऑगस्ट २००८ ला  Cybage मध्ये Win३२ SDK आणि COM वर जॉब मिळाला आणि आयुष्याची प्रगती सुरु झाली.सरां च आणि त्यांच्या विद्यार्थी च नात खूप वेगळ आहे , कितीतरी वेळा सर स्वप्नात पण येवून शिकवतात किवा Technical knowledge वाढण्याचा दम देतात. हा माझा personal अनुभव आहे.

जॉब मिळाल्या पासून दर १ किवा २ महिने झाले कि मला अस वाटत कि आता आयुष्यात जास्त शिक्षणाची गरज नाही किवा स्वत:ला Update करण खूप अवघड आहे ,  अस वाटलं कि मी मास्तरला भेटतो , त्यांना मनातील स्थिती काहीच  न सांगता त्यांच्या संपकार्त २०/३० मिनिटे क्लास सुटल्यानंतर घालवतो. यामुळे  मनाला खूप ऊर्जा (Inspiration) मिळते आणि आपली लायकी  स्वत:ला छान पणे कळते त्यामुळे पुढचे २/३ महिने खूप चांगला Technical  / Non Technical आभ्यास होतो.  हीच Practice मी २००८ पासून करतोय आणि पुढेही करणारच.

सर जितकं चागलं Unix आणि Windows Operating Systems शिकवतात त्याच्या पेक्षा जास्त चागलं जीवनरुपी (Life) Operating System (LOS) शिकवतात. पहिल्या ३ lectures मध्ये सर फक्त या LOS बद्दल सांगतात. सरांच्या स्वभावा प्रमाणे , ते पहिले Hands-On करतात आणि नंतर शिकवतात. हिच Technique ती LOS शिकवताना सुद्धा वापरतात.

अथक परिश्रम, चिकाटी आणि नैतिकता हे सरां चे आवडते विषय(Subjects). या विषयांना बद्दल खुप Theoretical (संस्कार) आणि Piratical  knowledge असल्यामुळे ,  सरांनी मेडिकल (Medical), नाटक (Theater),  ज्योतिषी (Astrology ) आणि कॉम्पुटर (Computer) असे खूप अवघड Live Projects, from the scratch पूर्ण केले आणि यशस्वीपणे  Life Operating System वर Deploy केले.

या सर्व अनुभवामुळे सर Life Operating System अतिशय प्रभावीपने शिकवतात आणि ठामपणे सांगतात: “Knowledge is inter related “.

4


Bidyut Mondal

CDAC , UNIX 2009, SDK 2010

Back in 2009 I asked a question to one of my teacher, sir I want to learn Linux and for that, should I attend Dr. Vijay Gokhale’s class. I got a reply and it changed my entire life.
“Knowledge or so called GYAN can be acquired from any source where whether it would be Google, Textbook, Newspaper, any articles, etc. but if you are looking for a person as a source for your knowledge then acquire that person’s experience which he acquired during his/her learning phase, that will help you for the rest of your life”
CDAC from SUNBEAM
During my DAC course tenure at Sunbeam, one day we received a notice which stated that “Today entire day there will be no lectures, hence students are requested to continue with their backlog assignments. Dr. Vijay Gokhale will continue his lecture at 2:00AM to 4:00AM, Attendance is compulsory.”
We were caught up with mixed feelings, where every day we use to have 12-13 hours lab and lectures without single day off and no lecture for the day made us happy but at the same time lecture at 2:00 AM that sounded something unusual. We spent our whole day by bit of studies, playing cards and sleeping. Since attendance was compulsory, we proceeded to the lecture hall though we were quite sleepy.
At 2 AM a gentleman entered lecture hall and started testing portable mic, holding it near to his neck via saying some words. “Meri aawaz pauach rahi hai akhari bench tak”. This was his first ever heard voice and I believe the same for most of his students. Sir started his session with a question, why you people are here? What you wanted to achieve from CDAC?
As a CDAC enthusiast, we all student answered in a chorus that we are here for “JOB”. Followed by our answer an opportunity came into picture. That gentleman said that I Dr. Vijay Gokhale, Technical Director of 3 organisation makes an announcement that whoever gives answer to my 3 question I’ll hire him/her right away and those question will be from your favourite book i.e. “Let Us C by Yeshwant kanetkar 3rd edition”. Unfortunately / Unluckily or whatever word we can think but we failed to grab this opportunity. That means no job before even completing CDAC for which we have joined CDAC. It is my misfortune that I forget those question by I remember a bit topics from where these question were asked. One question was asked from file handling and those section we even don’t dare to touch when we read this book as we give up.
Later on as session proceeded I came to know that if a man can read some subjects by himself and that to so well that he started not only mentoring three companies but also teaching. Kindly forgive me for my last sentence, as I believe for teaching we need more knowledge that mentoring companies or to perform some job. Gradually we all student felt like being skinned. That lecture made us realised deep within that we didn’t knew much about computers and computer programming was far beyond our knowledge, though we had covered most of the DAC course syllabus.
After these accidental events, life took a turn and got me back on track. I got placed from CDAC campus, attended sir’s Unix and Windows classes, learnt life and technology in parallel and most important “Got a habit of reading and having my own library, both digital and hard copy”. Today as I am completing more than 6 years in IT industry, and when I look back and I see if those accidents wouldn’t happened into my life I wouldn’t be here.
Sir it’s my honor to call myself as student of Dr. Vijay Gokhale and my fortune to have you as my TEACHER. Thanks for being my teacher and you thought me my most important lesson in my life.
There are only two sides: The GOOD and The BAD,
The day anyone differentiates between them and stick with “THE GOOD” then you are educated, civilised, human being.

3


Siddharth Manoj Bhise

WinRT 2014, UNIX 2014

Some things are difficult to be expressed. Not one but many reasons can constitute the causes of its difficulty level. As of now, when I am trying to precisely define the moment/moments, where I got involved and attached to our Gurukul, I can feel my mind oscillating between “finding the right words for expressing, keeping the intensity intact” and “what exactly to say! There’s just so much!!”. Finally, keeping that aside, just being honest, genuine.
So I would like to share some of my ‘random’ thoughts as clearly as possible without defeating the purpose and at the same time, the intensity of the feelings behind. Why random? Because I just have a lot of things and this topic is very much larger than the medium of expression for me.
I first time met (saw) Sir when I attended the OS seminar, back in 2012 September. I was in a very disturbed state of mind back then as it had just been a month since my father left us after a 45 day long hospitalisation. All those who can relate to any such event or witnessed anything of this sort can easily understand that sudden realisations, huge sense of guilt and moreover, relations turning ugly with some relatives, some friends, are a common phenomena after such kinds of catastrophe. It was that phase of mine; first of its kind in my otherwise highly protected and safe life.
I still clearly remember the feeling I had at the end of the 2nd day of the seminar. The feeling that out of the few things in my life that felt meaningful, this was indeed one.
I saw the same state machines later on as anyone who comes across Sir for the first time would see. Talking to each person you know about Sir and his diverse work. Another common experience, that I can guarantee many of us have had while talking to other people, is that nobody believes us the way we intend them to. Every person tries to grasp and contain Sir as per his/her capability of reasoning and understanding. For instance, “Itna sab kuch aata he toh idhar kya kar rahe he woh?”, “Your Sir is a really good orator, he knows how to hold people.”, the best one, “There are already so many OS out there. Why is your Sir re-inventing the wheel?” etc. Obviously this led to arguments. Eventually I stopped talking when one day, Sir told us in Gurukul that don’t do anything of this kind. But the good that I could extract from this is that I have enough data and I have mined it enough to compel myself to never think this limited about anyone; and I also got a confirmation and felt happy that I don’t think so shallow. Again, this opening of the A20 gate of my thoughts happened here, at our Gurukul.
Later that year, 2012, I couldn’t get admission for Unix as for some reason I had to go out of town, similar for the next year. In these 2 years, personal circumstances had taken a toll on my mental well-being so much, that I was seeking medical help. I remember switching to 5 different doctors, spending considerable amount of money on things that shouldn’t have been there in the first place, adding more to the inexplicable guilt and misery, and soon I found myself resorting to the bad elements of the society for mental peace.
Finally I joined the Gurukul in 2014. The first 6 days, the overall atmosphere and the intense positive energy that I felt and still increasingly feel, is the reason that helped me off those bad elements, got me rid of the medical aid, in the course of time, of course. All this because of just one person and his genuine genuine hard work, Gokhale Sir. I remember, I would come home and make my sister and mother listen to the recordings of the first 6 days. The major change in my personality that I have felt is that I want to study now. As if my education phase has just begun. Of course, it will be a gradual process, but I know I have a better direction than before, better aims as well.
This, I can say, is one of the central reasons for my emotional connect with our Gurukul. Sir’s philosophy, hard work, determination, fighting spirit is something that is unbelievably genuine.
Another reason why I feel it is mandatory for me to be in the vicinity of Sir is to maintain and not lose my motivation and the new-found genuineness amid the typical industry rat race participants. Again, not going to get started on the technical benefits since our life and time is limited. Only Google and our Gokhale Sir have answers to all the questions, and Google is a search engine so not all the answers of Google are of its own.
Sir has set an example that sheer hard work and passion can lead you to unimaginable heights.
But all in all, to summarise, these are some of the reasons why I feel connected to Gurukul and Sir.
Please bear in mind that these are just some thoughts that I could think of as some of the prominent reasons for the emotional connect. The list doesn’t end here. For me, it is like God took away one of the most influential factors, entities of my life and provided me with another, making sure that there’s someone to provide direction to my otherwise direction-less and absolute random living. I am aware I have failed to give justice to many other factors. But to conclude, I would like to thank Gokhale Sir and his family for the real selfless deeds that they have been doing all these years. Probably even they might not be having a precise, up to the mark idea of how much they have been helping others, in not just one, but many many facets of life

2


Vitthal Agav

SDK 2013 , UNIX 2013 ,Win RT 2014

माझा पहिला परदेशी अनुभव…

वाचकांसाठी एक विनंती – हे माझ पाहिलं लेखन आहे यात नक्कीच बर्याच व्याकारणी चुका असतील. तर सांभाळून घ्या आणि मनातल्या मनातच हसा. तर मी आता सुरु करतोय …..

मला या वर्षी पहिल्यांदा परदेशात जाण्याची संधी मिळाली. लहान पणा पासून इतरांकडून म्हणजे कधीही परदेशात न गेलेल्या लोकांकुडून ऐकून ऐकून मनात परदेशाची एक वेगळी virtual image सर्वांच्यात मनात तयार होते तशी माझ्याही मनात एक image होती Hollywood movies मध्ये पाहिलेल्या इमारती, रस्ते, तिथली माणसे त्यांचा बोलण्याचा accentetc.  जाण्या आधी सर्व तयारी वगेरे झाली, दोन दिवस आगोदर गोखले सरांना भेटलो आणि सांगितले कि मी UK ला चाललोय. मग सरांनीही madam ना आणि कट्ट्या वरील इतर लोकांना सांगितले मग या सर्वांचा आणि घरच्यांचा निरोप घेऊन विमान सुरु केले. मुंबई पासून जवळ जवळ साडे नऊ तास विमान प्रवास करून Heathrow या लंडन च्या विमान तळावर येवून पोहोचलो. तिथे एक जन Apple च्या TAB वर MR.Vitthal Agav (Ipaccess) असे लुहून उभा होता त्याचे नाव Richard Chaklin. मग त्यानेमाझ्या बग्स उचलून बूट मध्ये टाकल्या, डिक्की ला ती लोकं बूट असे म्हणतात मग BMW या कार मध्ये त्याने मला माझ्या room वर सोडले. एकंदरीत Apple च्या TAB ची नावाची पाटी आणि BMW आणि सुटा बुटातला driver पाहून मलाखूप मोठ्या Company चा मालक असल्यासारखे वाटले.

पहिले एक दोन दिवस तिथल्या वेळेशी adjust होण्या साठी गेले. office च्या पहिल्या दिवशी manager ने सर्वांची ओळख वगेरे करून दिली आणि काम सुरु झाले. तिथे गेल्यानंतर मला पहिल्यांदा माणूस हा एक प्राणी आहे आणि तो बर्याच वेग वेगळ्या ठिकाणी वेग वेगळा आढळतो असे जाणवले, त्यांचे दिसणे त्यांची बोलण्याची पद्धत, accent पूर्ण पणे सर्व गोष्टी वेगळ्या होत्या. मला कुठे तरी नवीन ग्रहावर गेल्यासारखे वाटत होते.

तिथले लोकं बरोबर ९.३० ला office मध्ये यायचे आणि कितीही महत्वाचे काम असले तरी ६.३० ला manager सकट सगळे office च्या बाहेर. काम करताना कामच करणार कोणाशी जास्त बोलणार नाही. आणि जे काही problems असतील ते mangers शी बेधडक अन frankly share करणार. आणि ते कामा पेक्षा स्वतःच्या जीवनाला जास्त महत्व देतात.

एक आठवडा गेल्यानंतर weekend ला फिरने सुरु झाले. London मधली जवळ जवळ सर्व atractions पाहिली. मग Cambridge आणि Oxford हि दोन मोठी विद्यापीठे पहिली. Cambridge हि university एका नदीच्या कडेवर वसलेली आहे तिचे नाव Came river. याच नदीच्या नावावान्रून त्या शहराचे नाव Cambridge असे ठेवण्यात आले आहे. आणि या university ला main office वगेरे अशी काही भानगड नाही. या नदीच्या काठेवर एकूण ३२ महाविद्यालये आहेत त्या सर्वांना मिळून Cambridge University असे म्हंटले जाते.   तेथे काही Students tourist guide  म्हणून काम करतात, छोट्या बोटेत त्या नदीतून आपल्याला घेऊन जातात आणि सगळ्या महाविद्यालयाची  माहिती देतात. मग मीही ते केले, त्याने नाव वल्हवत वल्हवत बरीच माहिती सांगितली. Newton, Alan Turing, Byarne Stourstup अश्या बर्याच मोठ्या मोठ्या मोठ्या लोकांने कुठे अभ्यास केला ते दाखवले. मग थोडिशी घरच्यांसाठी shopping केली. मनात सरांना हि काही तरी इथले घेऊन जावे असे वाटले. मग सुरु झाला मातीचा शोध कारण सरांना आवडण्यासारखा आणि मला परवडण्या सारखा तो एकाच option होता. मग पुन्हा ३२ च्या ३२ महाविद्यालयांना प्रदक्षिणां घालून सुद्धा माती मिळाली नाही. मग एक आयडिया सुचली आणि मी त्या नदीची दगडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला कारण logically पहिले तर ती दगडे सगळ्या Colleges नाभेटून आलेली असतील. कारण सगळ्या colleges ना त्या नदीवर एक तरी gate आहे. मग शोधायला लागलो, शेवटी Kings College च्या गेट वर मला नदीची दगडे मिळाली आणि ती घेऊन घरी आलो.

नंतर बर्याच ठिकाणी गेलो आणि बर्याच गोष्टी पहिल्या पण त्याबद्दल सांगण्यापेक्षा मी तुम्हाला  एक भन्नाट किस्सा सांगतो. १५ ते २० दिवस झाल्यानंतर आम्हाला एक news कळली कि आमच्या office मधल्या जवळ जवळ ३० लोकांना company ने काढले होते आणि त्यांना तशी notice हे देण्यात आली होती. म्हणजे १ २ महिन्यात त्यांना त्यांचा दुसरे काम शोधावे लागणार होते. कारण माहित आहे का? कि company ने असे का केले .. कारण भारतातील कामगार त्यांना स्वस्तात मिळत होते म्हणून. आणि या लोकांना खूप पगार द्यावा लागत होता. आणि तिथे खूपच कमी कंपन्या असल्यामुळे job मिळविणे हि त्यांच्या साठी खूप मोठी स्पर्धा होती आणि त्यात भर म्हणजे nvidia ने त्याच दिवशी त्याच शहरातील ५०० लोकं काढली होती.  job गेलेल्या लोकांमध्ये काही भारतीय सुद्धा होते. त्यातला माझाच एक colleague जो दुसऱ्या team साठी काम करत होता त्याचाशी माझी चांगली ओळख झाली होती आमची काही कामे एकत्रच होत असल्याने आम्ही दोघे खूप वेळा एकत्र काम करायचो. job गेल्याचे समजल्यावर त्याने अभ्यास सुरु केला होता. तो या company मध्ये contract basis वर काम करत होता त्यामुळे तो खूप कमवत होता  कारण contractors ना इतर कामगारांपेक्षा ३ – ४ पट जास्त पैसे मिळतात आणि आता एकदम income बंद होणार आणि स्पर्धा आहे या भितीने तो अभ्यासाला लागला होता. आणि त्याने एक दोन interview हि दिले होते. आमची चांगलीच ओळख झाली होती त्यामुळे आता तो बर्याच गोष्टी माझ्याशी share करत होता, त्याचे interview आणि त्यात विचारलेले प्रश्न. असेच काही प्रश्न त्यांनी मला विचारले आणि मी उत्तरे दिली. मग आमच्या बर्याच गप्पा चालायच्या त्यात असेच बोलता बोलता एकदा मी त्याला गोखले सरांबद्दल सांगितले. त्याने सरांबद्दल site वरही वाचले. सरांची स्टोरी वाचून मग त्याने मला सरांद्दल बरेच काही विचारले नंतर त्याला काय वाटले काय माहित नाही त्याने मला त्याच्या स्वतःच्या office मधे बोलावले, त्याचे स्वतःचे registered office होते याच office through तो स्वतःच employee बनून आमच्या office साठी contract basis वर काम करत होताहे मला त्याने तिथे गेल्यावर सांगितले. तिथे तो एका मोठ्या chair वर तो बसला होता आणि त्याच्या समोरच्या छोट्या chair वर मी बसलो होतो, त्याच्या table वर let us c चे पुस्तक होते. त्याला हिंदी येत नव्हते कारण तो चेन्नई चा होता आणि मी माझ्या तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये त्याच्याशी बोलत होतो बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यात त्यांनी काही technical प्रश्न विचारले त्याची उत्तरे देताना मी थोडासा घाबारतच होतो कारण त्याचा एकूण experience हा १० वर्षांचा होता. आणि त्याचा एका दिवसाचा पगार माझ्या एका महिन्याच्या पगारा एवढा होता. आणि त्यात आता तो UK चा employee आणि नागरिकहि  होता. त्याने मला सांगितले कि त्याला एका interview एक प्रश्न विचारला गेला होता प्रश्न असा होता कि

#include<stdio.h>
#include<something.h>

void fun(int data){}

int main(){

printf(“Explain carefully.. Best luck”)
fun(10);
return 0;
}

या प्रोग्राम वर जास्तीत जास्त जेवढ्या वेळ बोलता येईल तेव्हड्या वेळ बोलून सगळ्या गोष्टी interviewer ला समजावून सांगायच्या होत्या अगदी compilation पासून ते प्रोग्राम run करून exit होईपर्यंत. आणि त्याने मला सांगितले की त्याने ५ मिनटात संपवले होते.आणि त्याने आता हे मला विचारले, मी हि घाबरलो होतो कारण हा प्रोग्राम explain करायला मला किती वेळ लागणार हे मलाही माहित नव्हते. कारण जास्त वेळ सांगायचे म्हंटल्यावर मला कदाचित UNIX मध्येहि जावे लागणार होते आणि मला माहित नव्हते याला किती माहित आहे ते, म्हणून सुरुवात करण्या पूर्वी त्याला मी विचारले sheik, Can I ask you some questions if you don’t mind? So I will get clear idea about what I should explainto you and what not. (त्याचे नाव sheik) मी घाबरत घाबरत विचाले, त्याने थोड्या संशयास्पद नजरेने माझ्या कडे पहिले. एक सेकंद विचार करून मला होकार दिला. मग घड्याळा कडे पहिले रात्रीचे ११.५० वाजले होते आणि झालो सुरु… Compilationपासून सुरु केले मग त्याला मध्येच काही प्रश्न विचारायचो का तर संग्याची गरज आहे का नाही ते पाहण्यासाठी. सगळ्या गोष्टी अगदी scratch पासून सांगितल्या. मग linker बद्दल बोलताना मी त्याला सांगत होतो कि linker takes the output of compiler (machine understandable code) and make that code understandable to operating system.  हे ऐकून तो थोडासा गोंधळात पडला आणि मला म्हणाला कि हे त्याने त्याच्या १० वर्षाच्या अनुभवा मध्ये कधीही ऐकलेले नाही. आणि कोणत्याच पुस्तकात हि पहिले नाही. तो म्हणाला त्याला एवढेच माहित होते कि linker फक्त libraries link करतो. मला संशय आला कि आता यालाच माहित नाही मग हा विश्वास ठेवतो कि नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर हि दिसत होते कि त्याला prove करून हवे आहे पण तो मला विचारात नव्हता. मग मीच त्याला विचारले Do you want to see that? तो पटकन हो म्हणाला. मग मी एक hello world program लिहिला. त्याचा gcc ला –S switch वापरून assembly code     दाखवला, (हे त्याला माहित नव्हते) त्यातला printf library function call सुद्धा दाखवला. मग तसाच assemblyमध्ये hello world program(wihout printf call) लिहिला आणि assemble करून त्याची flat binary pen drive च्या first 440 मध्ये dd ने writeकेली आणि run केली. नंतर तोच program linux वर run करायचा प्रयत्न केला चालला नाही. Windows वर पण चालला नाही. मग त्याला ते १००% कळले. पण एक नवीन प्रश्न आला 440 कुठून आले ? मग booting सांगितले. fundamental  च्या बर्याच प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर. आता तो वेडा झाला होता आणि काहीही मनाला येतील ते प्रश्न विचारात होता. आता तर तो म्हणाला मला काहीच येत नाही असे समज आणि उत्तरे सांग एवढेच नाही तर तो म्हणाला तू माझ्या chair  वर बस मी तुझ्या जागी बसतो आणि मला सांग (त्याच वाक्य – you deserve to seat on this chair), मी नाही बसलो पण मला जाणवले कि आता हा खाली आला आहे आणि माझीही भीती गेलीमग ह्याच प्रोग्राम वर booting, fundamental, compiling, linking, loading, process structure, stack segment, data segment, code segment, आणि बरेच काही अगदी त्याचा program च्या return 0 पासुन shutdown पर्यंत सुद्धा explain केले. Explanation संपले तेव्हा ३.३० झाले होते जवळ जवळ ३ तास ४० मिनिट त्याला समजावल्या नंतर मी त्याला म्हणालो कि मी याच्या पेक्षा जास्त वेळ नाही सांगू शकत पण आमचे सरांना कदाचित महिना पण पुरणार नाही.

यानंतर तर तो इतका वेडा झाला मला म्हणायला लागला (Man what your sir and you are doing in India, you deserve to work here or USA, you will earn more than India here) मग मी त्याला अजून बरच काही सरांबद्दल सांगितले (मी काय बोललो असेल तुम्हाला माहित आहे )मग तो थोडा शांत झाला. आणि म्हणाला कि तो या प्रश्नांची उत्तरे तो खूप वर्षां पासून शोधत होता पण कुठेच नाही मिळाली कुणीही सांगितली नाही आणि कुठल्याच पुस्तकात हि नाही. मग तो विचारात होता कि तुमच्या सरांना एवढे सगळे कसे येते, मी त्याला सांगितले कि सर एक न एक गोष्ट scratch पासून करतात, पुस्तकाला एकहि शब्द सोडत नाही. मग तो महाला how it is possible yarr, It will take hell lot of time.. When does he get that much time? हे हे same question again. मला आता यम व्हावस वाटत होत आणि चीत्रागुप्ताकडे (सरांकडे) त्याला घेऊन जावेसे वाटत होते. पण जरा आवरून मी त्याला परत सांगितले कि सर २० तास काम करतात. अन एक उदाहरण दिले, म्हणालो विहिरीला जर का काठा पर्यंत भरून वाहायचे असेल तर खालील सगळे खाच खळगे भरल्याशिवाय हे शक्य नाही कारण हवेतच काढावारती पाणी सोडले तर ते बद्कन खाली जाईल, आणि त्यात जर झय्रा वाटे थेंब थेंब पाणी येत असेल आणि तेही consistent  नसेल तर ते झिरपून जाण्याचीही शक्यता असते. तर मग झय्रा वाटे येणारे पाणी हे consistent  आणि किमान एवढे पाहिजे कि जेणेकरून पाण्याची level वाढत जाईल आणि शेवटच म्हणजे patience + confidence पाहिजे कि केव्हा तरी हे नक्की भरणार. तर नक्कीच ती विहीर काठा पर्यंत भरून वाहल. नंतर तो म्हणाला same like your sir you also never kept me unanswered . And you have enlightened my life, the questions I had, I was thinkinglike no one answers this type of question these all are assumptions. But you have answered me those question for which I was searching answers from so many years no one from this IT industry explained me in such great way.  मग १० वर्षे अनुभव असलेल्या आणि आपल्यापेक्षा ३० पटीने जास्त कमावणाऱ्या माणसाकडून  हे ऐकून अंगावर शहारे आले होते आणि मी त्याला फक्त एवढेच म्हनालो all credit goes to our Sir.

त्यानंतर तो मला जरा जास्तच respect देऊ लागला.  आता त्याचा माझ्याकडे बघण्याची आणि बोलण्याची पद्धत पूर्ण पणे change झाली होती. मी निघण्या आधी सात दिवस सरांनी मला दोन पुस्तके आणायला सांगितली होती कारण ती पुस्तके इथे मिळत नव्हती. तर ती पुस्तके घेण्यासाठी मी Sheik चेच credit card use केले होते, आणि ती पुस्तके त्याच्या नावाने आली होती तो त्यासाठी स्वतहाला खूपच भाग्यवान समाजात होता कि त्याच्या नावाने आलेली पुस्तके सरांकडे जातायेत. हा वरचा त्याच्या office मधला राडा निघायच्या दोनच दिवस आधी घातला होता. आणि दुसय्रा दिवसी मला निघायची तयारी करायची होती. तर तो स्वतःला खूप कोसत होता, कि मी जर आधीच याला हे सगळे विचारले असते तर मला याने खूप काही सांगितले असते. असो पण आता मला जायची तयारी करायची होती त्यासाठी मला bags भरायच्या होत्या, you can’t imagine त्याने काय केले असेल, त्याने मला न सांगता माझ्या room मध्ये येऊन bags pack करायला   सुरवात केली आणि मला बजावून सागितले.. तू मझ्या साठी खूप केले मला एवढे तरी करू दे. आता मलाच काहीतरी चुकल्या सारखे वाटत होते. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तो लवकर उठून मला निघायच्या आधी भेटायला आणि bye करायला आला होता.

आता एवढे सगळे वाचल्या नंतर तुम्हाला वाटेल कि हा विठ्ल्या खूपच भारी माणूस आहे कि काय पण तसा गैर समाज कृपया करून घेऊ नका. वर जी काय इज्जत मिळाली त्याच पूर्ण श्रेय डॉ विजय गोखले सरांनाच जाते. rather त्यांच्या कष्टांना जाते.

Vitthal Agav.

1