माझ्या सर्व भूतकालीन / वर्तमान कालीन / भविष्यकालीन विद्यार्थ्यांना विनंती वजा सूचना :
इथे ज्या विद्यार्थ्यांचे अनुभव वा अभिव्यक्ती आपण ऐकणार / पाहणार आहात, त्यांनी ते COVID-19 सारख्या परिस्थितीमध्ये शक्य असतील त्या तांत्रिक मदतीने audio किंवा video स्वरुपात record केले आहेत. त्यामुळे ते quality ने परिपूर्ण असतीलच असे नाही. त्यांच्यामध्ये noise, audio आणि video artifacts असू शकतात. तरी पाहणा-याने त्यातल्या भावनांना महत्त्व द्यावे, अडचणींना नाही.
कित्येक विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना गळा दाटून आल्यामुळे ‘शब्द न सुचणे’ वा ‘शब्द न फुटणे’ असंही घडलेलं आपल्या निदर्शनास येईल, तरी ते समजून घ्यावे.
यापुढेही ही परंपरा अशीच चालू राहील. प्रेक्षक विद्यार्थ्यांनी त्यातील भाषा व तांत्रिक अडचणींकडे टीकाकाराच्या चष्म्यातून न पाहता, स्वतःचा शैक्षणिक प्रवास असा किंवा याहून उत्कट अनुभवाचा कसा होईल, याकडे जास्त लक्ष द्यावे.
– डॉ. विजय दत्तात्रय गोखले
समर्थ रामदास म्हणतात “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.”