गोखले सरांसाठी”च”

डॉ. विजय गोखले सर….
ज्योतिष, वैद्यकशास्त्र आणि संगणक- शास्त्र ही तीनही क्षेत्रे पादाक्रांत केलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व !!!
त्यांच्या विषयी “आहेत बहु, होतीलही बहु परि या सम हा ” ही उक्ती लागू पडते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य केवळ शिकवण्यापुरते मर्यादित नसून , विद्यार्थी सर्व अंगांनी कसा घडेल याकडे त्यांचे जातीने लक्ष असते. विद्यार्थ्यांना स्वतःचीच उदाहरणे देऊन त्यांना अधिकाधिक ज्ञानार्थी बनवणे यात त्यांचा हातखंडा आहे. “सर्व विषयांतील ज्ञान हे परस्पर संलग्न असते” हे विधान ते “कोणताही” विषय शिकवताना पटवून देतात. त्यांचे संस्कृत-प्रचुर मराठी आणि विषयाच्या अनुषंगाने येणारी सुभाषिते तासामध्ये कंटाळा येऊ देत नाहीत. काही मार्मिक विनोद सांगण्याची “नेमकी वेळ” (TIMING ) मुलांचा हशा मिळवून जाते. त्यांचा तास हा जणू काही एखाद्या कीर्तनाचा उत्तर-रंग भासावा इतका रंगत जातो.
त्यांच्या नाटक, संगणक प्रणाली,…… या क्षेत्रांबद्दल बोलण्यासारखे आणि लिहिण्यासारखे इतके आहे की सर्व लिहित बसलो तर कळ-फलकावरील ( KEYBOARD ) सर्व अक्षरे टंकलेखन (TYPING ) करून करून पुसली जातील पण गोखले सरांची महती वर्णन करून होणार नाही.

If you don’t get the meaning of some marathi words, feel free to ask me 😉 🙂

Form : Unmesh Joshi
unmesh.joshi126@gmail.com