गुरु कसा असावा?
असा प्रश्न विचारण्यात आला.
काय द्यावे उत्तर हेच कोण उमजे ना.
गुरु कुठला असावा?
असा प्रश्न विचारण्यात आला.
काय करू देवा वाचा कोणाचीच फुटेना.
मग एके दिवशी भेटली एक व्यक्ती,
आणि मग सुचली एक युक्ती.
गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा.
गुरु म्हणजे आसमंत सारा.
गुरु उन्हात सावली.
गुरु साक्षात माउली.
संस्काराचा पाया आई घरात उभारी,
तोच करी भक्कम गुरु ज्ञानाच्या द्वारी.
आई आपल्या देते दाणा हा टिपायला,
म्हणे दाणा देयील बळ उद्या आकाशात उडायला.
गुरु हेच तर करी,फरक करू नका काही.
मग गुरूंनाच आपण आई का म्हणू नाही?
गुरु म्हणजे आरसा असावा , खरं तेच सांगणारा,
गुरु म्हणजे देव मानवा, जनास आवडणारा .
गुरु म्हणजे माणूस जाणावा हाडा मांसाचा,
माणसातल्या देवाशीच गुंफण घालणारा .
मी पाहिलंय मझ्या गुरूंना प्राण पणान शिकवताना,
हसत मुखाने सहन करतात ते खूप मूक यातना.
ठेवा थोडी जाण त्या महान माणसाची,
जो काळजी करत नाही त्या कपाळावरच्या दवबिंदू पुसण्याची,
गुरु समवेत वसते सरस्वती ठायी ठायी,
अर्पिते ह्या ओळी फक्त आपल्या सरांच्या पायीं.